घरी कधी साधी पायपुसनी सुद्धा पायाने सरकवायची अक्कल नव्हती.एवढ्या दिवसात मला तर नाही आठवत कि , मी कधी बेडशीट बदलल असेल.चादरीच्या घड्या घालून ठेवल्या असतील.झाडून काढण,साफसफाई,कचर्याची गाडी आली कि कचरा फेकन ही सगळी काम करायला माझ्या अक्षरशः जीवावर यायच.
मला असच काहीच गरज नसताना बॅचलर रुमवर रहायची हुक्की आलेली.माझी खुप दिवसांपासूनची इच्छा होती. घरच्यांचा विरोध होता याला.स्वप्निलला तयार केल.त्याच्या घरुन पण विरोध होताच.
मग मोठ्या थाटात आम्ही शॅापिंगला सुरवात केली.
गाद्या,उशा,चादरी,बेडशीट्स्,चप्पल स्टॅंड,पायपुसन्या,केरसुनी,पाणी तापवायला हिटर आणि हंडा,अंघोळीसाठी बादली आणि एक मग,पिण्याच्या पाण्यासाठी माठ,कपडे वाळत घालायला स्टॅंड,हॅंगर स्टीक,साबन स्टॅंड,आरसा.
अजुन बरच काही .....
बाहेर जाताना एकदा किचनमधला नळ चालू राहिलेला..आख्खी रुम तुंबलेली..तिन्हीही गाद्या भिजलेल्या,उशा,बेडशीट्स् ,चादर,केरसुनी, माझे books भिजले,किचनओट्यावर ठेवलेल हॅंड वॅाच,हेडफोन, shaving machine भिजली..सगळ भिजून गेल..आणि त्यात नुकताच पाउस सुरु झालेला..त्यामुळे भिजून अवजड झालेल्या गाद्या जिन्यातच वाळत घातल्या.
किचनओट्यावर ठेवलेले लॅान्ड्रीचे कपडेसुद्धा भिजलेले. कसाबसा हॅंगरला अडकवलेला एक बरमुडा भिजायचा वाचला.लॅान्ड्रीमधून आनलेला आणि न्यूजपेपरमध्ये गुंडाळलेला एका लाइट-ग्रे कलरच्या शर्टवर भिजल्यामुळे पेपरची शाई means writing उमटलेले..तो शर्ट मी दोनदा try केलेला.
मज्जा आलेली तुंबलेली रुम आवरताना.
सुरवातीला खत्रुड म्हातारं वाटणार्या रुम-मालकाच खर रुप आम्हाला कळाल.नवख्या पोरांना त्याने त्याच्या बंगल्यात झोपायची विनंती केली..जॅाबमुळे दिवसभर बाहेरच असायचो.मग आमच्यासमोर गाद्या वाळत कोण घालणार हा मोठ्ठा धर्मप्रश्न पडला.अशावेळी स्वतःहून रुम-मालकीन मावशी आणि शेजारच्या आज्जींने खुप Co-Operate केल.
गाद्या वाळायला चांगले तीन चार दिवस लागले.तोपर्यंत झोपायला रुम-मालकाचेच अंथरुन पांघरुन वापरायचो.
खुप काही शिकायला मिळाल.
स्वतःचा टॅावेल,अंडरवेअर,बनियान,सॅाक्स् स्वतःच धुवायच.ते धुवायला पण इतका कंटाळा यायचा ना.
कपडे तर धुवता येत नव्हते मग कपडे धुवायला लॅान्ड्रीला असायचे.
नीट जेवलास का.झोपलास का..विचारायला कोणीच नव्हत.
रोज मेसवर जाऊन जेवायच.आम्ही त्यातल्या त्याच जरा चांगल्यातल्या चांगल्या मेसवर जाउन जेवायचो..
ताटात जे पडेल ते खायच.आळनी असो किंवा खारट असो.हे नको ते नको . घरी चालनारा शहाणपणा घरीच ठेवायचा.
मेसवरच जेवन घरच्या जेवनाबरोबर compare केल.आता मला खर्या अर्थाने घरच्यांची किंमत कळाली होती .
अजुन खुप काही ..about Financial
मी इथे माझा मोठेपणा नाही सांगतये पण आमचा जेवढा monthly खर्च होता ना.पेट्रोल,मेस,लॅान्ड्री,रुमभाड,अजुन इतर किरकोर वगैरे वगैरे त्या तेवढ्या खर्चात नवरा बायको आणि एक दोन मुले plus घरभाड आणि हा एवढा खर्च भागवणारी काही कुटुंब पाहीली..स्वतःला त्यांच्याबरोबर compare केल..माझी मलाच लाज वाटली.
त्या रुम-मालक काकांच्या विकलांग-वेडसर मुलाची आठवण येते कधी कधी.
त्याची अखंडपणे सेवा करणार्या त्या मावशी.....
त्यांचा मुलगा वयाने आमच्याएवढाच.एका बाजूला हसणारे-खिदळणारे आम्ही दोघे जन रुमपार्टनर्स आणि दुसरीकडे तो त्यांचा वेडसर-विकलांग मुलगा.हे चित्र पाहुन काय वाटत असेल त्या आईला , दुर्दैव किती मोठ पहा ना.
मनोमन वाटायच आम्हाला कि तो मुलगा नॅार्मल असायला हवा होता.
जास्त नाहीं पण 2-3 महिने राहिलो रुमवर. नाही जमल आम्हाला.रुटीन सेट नाही झाल ; पण खुप काही शिकायला मिळाल.मला खर्या अर्थाने जबाबदार्यांची जाणीव झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा