शुक्रवार, १५ मे, २०१५

satisfaction.

" काय कशी आहे तब्येत ,बर वाटतय ना.?" मी बसता बसता विचारल.
" हो..थोडा आराम पडलाय आता."
" काय..??  कस काय झाल हे..?? " सगळेच विचारतात तसच मी विचारल.
" एका ठिकाणी एक्झिबीशनला गेलोलो , तिथे अर्धवट उघड्या ड्रेनेजमध्ये पाय अडकून (पायाकडे बोट करुन) या इथे नडगीच हाड क्रॅक झालय. "
" ओहहह ,मग आता किती दिवस चालनारये ही ट्रीटमेंट.??"
" या वेळेस जास्त वेळ लागेल."
" या वेळेस म्हनजे..??"
" हात-पाय मोडण्याचा मला बराच अनुभव आहे ,वयोमानानुसार हाडे ठिसूळ होतात."
" मग बिजनेसच कस काय चालत , तुम्ही अॅाफिसवर नसताना..??"
" आहेत माणसं , ते करतात हॅंडल. "
त्यांच्या मिसेस पाण्याचे दोन ग्लास घेउन आल्या , टी पॅाय वर ट्रे ठेऊन त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या आणि टी.व्ही च्या रिमोटचा ताबा घेतला.
आमच्या  गप्पा सुरु झाल्या,
सहजच मी त्यांना विचारल , " बोअर होत असेल ना..?? घरी कोण कोण असत.??"
" मी , मिसेस आणि आदिती ."
"तिघेच..??"
"तस , मी आणि मिसेस दोघेच असतो घरात , आदिती ( मिसेस कडे पाहत) हिच्या बहिनीची मुलगी , 3 महिन्यांपुर्वी आलिये आमच्याकडे , कॅालेजला जाते. "
"तुमची मुल माझ्याएवढीच असतील ना..??"
"नाही , आम्हाला मुल-बाळ नाही."
च्याआयला , असली फालतू विचारपूस करुन उगाच एखाद्याच्या जखमेवरची खपली काढल्यासारख वाटल मला , माझी चलबिचल चालु झाली , कधी,टी.व्ही कडे , तर कधी फॅनकडे,,इकडे तिकडे नजर फिरउन मी खिशातुन मोबाइल काढला आणि मोबाइल मध्ये डोक खुपसल.

माझी चलबिचल कदाचित त्यांच्या लक्षात आली असावी.,काठीला धरुन,कसातरी तोल सावरत,,लंगडतच ते माझ्याशेजारी येउन बसले,,दोन मिनटे कहीच ते काहीच बोलले नाहीत,,तेवढ्या वेळात त्यांच्या मिसेस तिथुन उठल्या आणि बाहेर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या.,,,ते अजुनही शांतच होते,,मला तर आता खुप guilty वाटत होत..माझी आणि यांची चार-सहा महिण्यांपासुनची ओळख..

मी विचार करुनच हैरान झालो,,गेल्या 20-25 वर्षात यांना कित्तीतरी लोकांनी ज्यांना माहित नसेल त्यांनी मुलांबद्दल विचारल असेल , टोमने मारणारे वेगळेच  , पुरुषांच जाउद्या , ते वेळ मारुन नेतात , पण स्त्रियांची मानसिकता वेगळी असते ना.
.................आणि त्यात भरीत भर म्हनुन मीही तेच विचारल.

तेवढ्यात आदिती किचनमधुन चाहा घेउन बाहेर आली , समोर चहा ठेउन अगदी हक्काने तिने त्यांच्याकडे पाचशे रुपये मागितले,,
तिने पैसे घेतले , पाठीला सॅक अडकवली. Activa ला स्टार्टर मारला आणि गेटमधुन बाहेर पडताना कॅालेजला मी जातीये अस सांगुन गेली.

" आदिती आमच्याकडे रहायला आली तेंव्हा सुरवातीला महिनाभर बसने जायची कॅालेजला,,म्हनुन हिच्यासाठी Activa बुक केली,,हिच्या बर्याचशा  मैत्रिणी गाड्या घेउन जातात ना कॅालेजला." वगैरे , वगैरे ,वगैरे......
ते आदितीबद्दल अगदी कौतुकाने खुप काही सांगत होते.
 आणि मी नुसताच ऐकत होतो..

" घरात मुलं नसतील तर आम्हाला करमत नाहीं. नेहमीच कोण ना कोणतरी आमच्याकडे रहायला असतच ,नातेवाईकांची मुल आमच्याकडे येतात ,जमेल तितके दिवस राहतात ,शिकतात , Job करतात , सेटल होतात , निघुन जातात "

हे सांगताना त्याच्या चेहर्यावर खुप समाधान दिसत होत...
आणि शेवटी आयुष्यात हेच समाधान महत्त्वाच......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा