बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

बोहोनी

वॅावSSSS , खरच किती pretty वाटत ना आपण कोणासाठीतरी Lucky Person असल्यावर.

हायवेवरच्या एका निरा आणि सरबताच्या टपरीवर एकदा सरबत पिलेला.१० रु झाले.मी १०० ची नोट दिली.त्याच्याकडे सुट्टे नव्हते.
माझ्यासमोर गल्ला रिकामा करुन केविलवान तोंड करुन मला तो सरबतवाला विनवन्या करु लागला. " साहेब,बघा ना सुट्ट हायती का..?? बोहनीचा टाइम हाय."
मी त्याच्याकडे पाहून फक्त स्माइल केल,आणि त्याला विचारल , " किती झाले..?? "
" धा रुपये." तो उत्तरला.
मी सहज टपरीमध्ये डोकावल,मी येण्याअगोदरच नुकतीच त्याने टपरी उघडलेली. अजुन त्याची आवराआवरीच चाललेली.मीच त्याचा पहिला कस्टमर होतो.
अजुन त्याची घालमेल चालू होती.
" थोडा येळ थांबता का शेठ.मी म्होरच्या दुकानातन सुट्ट घिउन येतू."

शेवटी मला त्याची आगतिकता पाहून कसतरीच झाल.माझ्याशी तो शक्य तेवढ्या अबदीने बोलायचा प्रयत्न करत होता..कारण स्पष्ट होत.सकाळ सकाळी गिर्हाइकाबरोबर किरकीर व्हायला नको,पहिलाच व्यावहार उधारीचा नको.त्यामुळे दिवसभर धंद्याला नाट लागू शकते.

" एक आयडिया आहे ना राव." मी एकदम Excited होउन त्याला बोललो.
"आजिबातच सुट्टे नसतील तर ही शंभराची नोट तुमच्याकडेच ठेव. मी तासाभरात परत येउन माझे उरलेले ९० रुपये परत घेउन जातो."

१० रुपयाच्या सरबतासाठी मी त्याच्याकडे एक तासाच्या खोट्या बोलीवर १००रुपये ठेवले.एक तासानंतर मला तिथ येण खरच शक्य नव्हत.कारण मला त्या दिवशी खुप कामं होती.पुन्हा कधी त्या रोडने येण जाण होइल ते सुद्धा शक्य नव्हत.आणि कधी त्या रोडने गोलोच तर त्या ९० रुपयांची आठवण येइल कि नाही याचीची मला गॅरॅन्टी नव्हती. आणि मी तिथे नंतर कधीतरी गेलो तर तोच माणूस टपरीमध्ये असेल कि नसेल..??
किंवा मीच विसरलो तर..?? हे सगळ मला माहित असूनपण मी मुर्खासारखे तिथे ९० रुपये कुठल्या भरवशावर आणि का ठेवले हे माझ मलाच कळाल नाही.
माझ्यात व्यवहारिकपणा खुप कमी आहे याची मला जाणीव झाली.आणि इथुन पुढेही मी जर असाच ढिला हात सोडून मुर्खासारख वागलो तर माझी कध्धीच प्रगति होणार नाही.असे माझ्या खास मित्रांनी मला बोललेले शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले.

पण बाकि सरबत छान होता.कोल्हापुरात बागल चौकात एक सरबतवाला आहे.तिथे तीन वर्षांपुर्वी आम्ही सरबत पिलेला.त्याने एक वेगळाच फेव्हर शोधून काढलाय.लिंबू आणि कोकम मिक्स with सोडा..भारी लागतो.एकदा नक्की ट्राय करुन पहा..
मी तोच फेव्हर याच्याकडून घेतलेला.

असो....
काल दोन महिन्यांनंतर माझ त्या रोडने जाण झाल.का कुणास ठाउक पण सरबत प्यायची तीव्र इच्छा झालेली.त्याच टपरीसमोर थांबलो.टपरीतल्या माणसाने माझ्याकड पाहून मनमोकळेपणाने स्माइल केल.मी अॅार्डर द्यायला समोर जाणार तेवढ्यात माझा मोबाइल वाजला.बाजूला जाउन call receive केला.५-१० मिनिटे मोबाइल चालू होता.पुन्हा काउंटरजवळ गेलो.मला पाहून मी न सांगताच त्याने माझा आवडत्या फ्लेव्हरचा सरबत बनवलेला.त्याने अगदी आदरपूर्वक सरबताचा ग्लास पुढे केला.

त्याने मागच्या वेळेसचे १० रु आणि आत्ताचे १० रु या प्रमाणे मागील शंभराच्या नोटेमधले उरलेले ८० रुपये माझ्या हातावर ठेवत म्हनाला कि , " शेठ येत जावा कि असच अधन मधन बोहनीला."
मला जरा गोंधळल्यासारखच झाल.
" का रे..?? कशासाठी..?? " मी अच्छर्यचकित होउन विचारल.
" मागच्या टायमाला तुम्ही आलेला हिकड.त्यादिशी माह्या सगळा माल यक वाजूस्तवर संपला."
त्यादिवशी त्याच्या टपरीतली निरा एक वाजताच संपली.रोज पाच वाजता संपायची.सरबताची कस्टमर रोजच्यापेक्षा दुप्पट आले.त्याने पु्न्हा दुसर्या टपरीवरुन निरा मागउन घेतली.
एकंदरीत त्याला त्या दिवशी रोजच्यापेक्षा खुप फायदा झाला.

तिथुन निघताना मी खुप Happy होतो.
खर सांगू का..??
इतका आनंद मला जॅाब कन्फर्मेशनच्या वेळेस पण झाला नव्हता.
खरच खुप भारी and स्पेशल वाटत मला ज्यावेळेस माझ्यामुळे कोणीतरी happy असेल.

त्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मला असा खुप मोठा आर्थिक फटका वगैरे बसला नसता.मी ते ९० रुपये विसरुनसुद्धा गेलो होते.
त्यादिवशीच्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मी काय इतक मोठाही झालो नसतो.
पण फक्त ९० रुपयांतदेखील आपण दुसर्याला किती मोठ आनंद वाटू शकतो.याची मला प्रचिती आली.

सुख सुख आनंद आनंद आपण कशात शोधतो..??
इथे अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये तसेच इतरांच्या सुखात-आनंदात देखिल खुप खुप सुख-आनंद दडलेल आहे..तो मिळवता आणि वाटता आला पाहिजे....बस्स इतकच..

शेवटी शंकर-जयकिशनच एक गाण आठवल.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है
किसी की ...

(माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं ) \- (२)
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है

(रिश्ता दिल से दिल के ऐतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का ) \- (२)
के मर के भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है.

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

विधि-लिखित.

इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफर , डिपार्टमेंट चेंज या गोष्टी होतच राहतात.एखाद्या एम्प्लॅाइच डिपार्टमेंट चेंज झाल्यानंतर त्या एम्प्लॅाइला सगळ्या Formalities पुर्ण करुन नवीन डिपार्टमेंटला पाठवन खरच खुप डोकेदुखीच काम असत.काही जन समझदार असतात ते जातात.पण शक्यतो कोणी इतक्या सहज ऐकत नाही.मग कधी गोड गोड प्रेमाने बोलून,कधी धाक आणि कारवाईची भिती दाखऊन तर कधी जबरदस्ती करुन आणि प्रसंगी एम्प्लॅाइला मेंटली टॅार्चर करुन एम्पलॅाइजचे डिपार्टमेंट चेंज चे इश्शू H.R मोठ्या कुशलतेने हॅंडल करतात.

असच एका एम्पलॅाइची ट्रान्सफर अॅार्डर निघालेली. तो एम्पलॅाइ काही दुसर्या डिपार्टमेंटमध्ये जायल तयार होइना.बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट यांनी खुप समझावल त्याला ; पण तो नाही ऐकला.

आता ही केस टॅाप मॅनेजमेंटकडे गेली.सिनियर H.R मॅनेजर ने एम्प्लॅाइला सगळी परिस्थिति सांगितली.
नेमका मीच का या एम्प्लॅाइच्या प्रश्नावर उत्तर देताना H.R ने तुच कसा योग्य आहेस,तुझ्यातले प्लसपॅाईंट,तुझी कॅपेबिलीटी,म्हनुन तुझच कस ट्रान्सफरसाठी सिलेक्शन केल,सध्या तुझी त्या डिपार्टमेंटला कशी निकडीची गरज आहे या गोष्ठी H.R ने एम्प्लॅाइला अगदी तिखट मीठ लाउन गोड गोड बोलुन हरभर्याच्या झाडावर चढवले...
तरीही एम्प्लॅाइ ऐकेना.

शेवटी ट्रान्सफर वगैरे या गोष्ठी विधि लिखित कशा असतात याबद्दल H.R एम्प्लॅाइला श्रीकृष्ण जशी अर्जुनाला गीता सांगत असेल तशाच तत्वज्ञानाच्या सांगण्याच्या तोर्यात एक महाभारतातल example देउन सांगू लागला.
      परिक्षित नावाचा राजा होता.तो एकदा जंगलात शिकार करायला जातो.एका झाडाखाली महाऋषि सिमीका तपच्छर्येसाठी ध्यान लाउन बसलेले असतात.परिक्षित राजा त्या ॠषिंना ओळखत नाही.परिक्षित राजाला त्या ॠषिंची मस्करी करायचा मूड होतो.परिक्षित राजा एक मेलेला साप महाऋषि सिमीकांच्या गळ्याभोवती गुंडाळून ठेवतो.आणि तिथून निघून जातो.थोड्या वेळानंतर महाऋषि सिमीकांचा पुत्र श्रृंगी तिथे येतो.वडिलांची झालेली विटंबना त्याला सहन होत नाही.आणि तो शाप देतो कि ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या महाऋषि सिमीकांच्या गळ्यात मेलेला साप गुंडाळला असेल त्याचा सात दिवसांत सापांचा राजा तक्षक चावल्यामुळे मृत्यु होइल.

या शापाबद्दलची बातमी परिक्षित राजाकडे पोहचते.राजा खुप घाबरतो.पण राजपंडित राजाची समजूत घालतात कि सगळे ॠषि काही खरे नसतात.राजा तु निवांत रहा.आपण यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण करुन तुझा मृत्यु टाळू शकतो.राजा स्वतःला एका बंद रुममध्ये कोंडून घेतो.रुमला दरवाजे खिडक्या अशा बसवतो कि त्यातुन साप काय मुंगी सुद्धा आतमध्ये येउ शकत नाहीं.आणि आपल्या बाजूला सशस्त्र सैनिकांचा रात्ऱदिवस सतत जागता पहारा ठेवतो.अशाप्रकारे सहा दिवस पुर्ण होतात.यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण यातुन परिक्षित राजाच्या मनातले मृत्युबद्दलचे भय एव्हाना नाहिसे झालेले असते.आणि सातव्या दिवशी परिक्षित राजाला बोरं खायची इच्छा होते.सेवक रुममध्ये बोरांची टोपली घेउन येतात.बोर खात असताना एका बोरमध्ये राजाला एक छोटीशी आळी दिसते..ती आळी बोरामधून बाहेर पडते.थोड्या वेळात त्या आळीचा आकार हळूहळू वाढत जातो.आणि त्याचा तक्षक नाग बनतो.तक्षक नाग छोट्या आळीच रुप घेउन बोरातुन राजाच्या रुममध्ये आलेला असतो..नंतर त्या आळीपासुनच तयार झालेला तक्षक नाग परिक्षित राजाला चावतो.यातच परिक्षित राजाचा मृत्यु होतो.आणि मनातील मृत्युचे भय नाहिसे झाल्यामुळे नरिक्षात राजाला मोक्ष मिळतो.

परिक्षित राजाची गोष्ट संपल्यानंतर H.R पुन्हा मुळ मुद्द्यावर येतात.
हे बघ मित्रा...( श्रीकृष्ण स्टाइल )
हे ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्ठी विधि लिखित असतात रे..
आपण सगळे माध्यम आहोत.तो वर बसलाय ना तोच कर्ता करवता आहे.
माझच बघ ना. मी अगोदर अमुक तमुक शहरात अमुत तमुक ठिकानी होतो.आता इथ आलोय.
तु कितीही अडवण्याचा प्रयत्न कर.पण या घडणार्या गोष्ठी घडतातच.
एवढा मोठा कुरुसम्राट परिक्षित राजा आणि देव सुद्धा यातुन सुटले नाहींत तर तुम्ही आम्ही अतिसामान्य माणसं कोण..??
वगैरे.....वगैरे.....वगैरे.....

एवढी मोठी पुराण कथा आणि त्यातील परिक्षित,तक्षक,सिमिका ॠषि,श्रृंगी,विधि-लिखित,मोक्ष वगैरे सारखे अवजड शब्द ऐकून आता खरोखरच एम्प्लॅाइच डोक जड झालेल असत.त्याचबरोबर आपल्या विरोधालासुद्धा काहिच किंमत उरलेली नसून आता इथे आपली डाळ काही शिजनार नाही याचीही जाणीव एम्प्लॅाइला झालेली असते..एव्हाना एम्प्लॅाइ H.R कडे स्वतःहून ट्रान्सफर लेटर मागतो त्यावर मुकाट्याने सही करुन नवीन डिपार्टमेंटमध्ये जाण्याची मानसिक तयारी सुरु करतो.

अशा वेळेस बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट आणि टॅाप मॅनेजमेंट पुर्ण ट्रॅप लाऊन एकमेकांशी कनेक्ट राहुन मिळून शिकार करतात.H.R चे लोक एम्प्लॅाइला कन्व्हेन्स करताना काय काय सुपरलॅाजिक अकलेचे तारे तोडतील याचा काही नेम नसतो.कदाचित हे पुढील काळात एम्प्लॅाइसाठी मोक्ष वगैरे सारख्या फॅसॅलिटीज् सुद्धा शोधून काढतील.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

बेसिक कॅामनसेन्स & वेल एज्यूकेशन.

काहींना खुप अॅटिट्यूड असतो.माझ कधीतरी वर्षातून दोन तीनदा सिटी-बसने जाण येण होत.बसमध्ये असे काही महाभाग भेटतात ना कि डोक सुन्न होत.

एकदा हिंजवडी फेज-3 मधून घरी येत होतो.बस खचाखच फुल भरलेली आणि बरचशे लोक्स् उभे राहिलेले.माझ्याशेजारी एक आय.टी मधली मुलगी बसलेली.

आपण तिला सन्मानाने "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" म्हणूयात..

तिने स्काय ब्ल्यू कलरची जीन्स,पिंक कलरचा टी-शर्ट घातलेला.आणि कानात त्या पिंक टी-शर्टला मॅच होणारे झुमके पेंडंन्ट घातलेल,ब्युटी-पार्लरमध्ये जाऊन तीन चार हजार रुपये खर्च करुन तिने स्ट्रेचिंग केलेले केस मोकळेच सोडलेले.वार्याबरोबर तिचे केस माझ्या चेहर्यावर उडत होते.चेहर्यावर आणि पापनीच्या इथे कॅास्मेटिकचा थर दिसत होता. डोळ्यांवर तिच्या पर्सनॅलिटीला साजेसा असा नाजुक चष्मा होता. हातात अॅपल-आयफोन आणि कानात हेडफोन्स घातलेले..बसमध्ये इतक्या गर्दीत होणार्या घामाच्या वासमारीपासून तिने मारलेल्या परफ्यूममुळे माझ प्रोटोक्शन होत होत.

आम्ही दोघे उजव्या बाजूच्या जेन्ट्स् रोमध्ये बसलेलो.बसमध्ये खुप सारे जेन्ट्स् उभे होते.पण तिला कुणीच सीटवरुन उठवल नाही..बर्याचदा लेडिज सीटवर कोणी जेन्ट्स् बसल तर काही जणी खुन्नस देउन खुप अॅटिट्यूड दाखवतात..आणि अपमान करतात.
बसच्या पुढच्या दरवाजातून एक प्रेगनंट मुलगी आत आली.i think सातवा महिना असेल तिला..पाच दहा मिनीट ती उभीच राहिली.पण कुठेच सीट रिकामी झाली नाही.

तिने या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" कडे एक आशाळभूत आणि अपेक्षित नजरेने पाहिल..पण या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारख केल.समोर एक गरोदर मुलगी केव्हापासूनची उभी आहे. तिला आपण बसायला जागा द्यावी अस मला मनोमन वाटल. शेवटी मीच माझ्या सीट वरुन उठलो आणि त्या प्रेगनंट मुलीला बसायला जागा दिली.

अस म्हणतात कि एक स्त्रीच दुसर्या स्त्रीला समझून घेऊ शकते.किंवा स्त्रियांना एकमेकांच्या भावनांची कदर असते..मग या साध्या साध्या बेसिक कॅामनसेन्सच्या आणि माणूसकीच्या गोष्ठी या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल"ला का महत्त्वाच्या वाटत नसतील..??
मग या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने इतक "शिक्षण" घेऊन नक्की काय शिकल..??
हिच्यापेक्षा गावाकडच्या अशिक्षित अडानी अनपड पोरी लाखपट भारी.

रिअल हिरो

शाळा सुटतानाची वेळ.

बाहेर गेटसमोर चकचकीक कपडे घातलेले पालक उभे,प्रत्येक जण महागड्या कार घेऊन आलेला,काही बायका पण कारमध्येच with driver,किंवा कमीतकमी Activa तर असतेच असते..एकंदरीत सगळ्या पालकांची पर्सनॅलिटी एकदम "रिच".

प्रत्येक जन आपापल्या मुलाला-मुलीला घेऊन पार्किंगच्या दिशेने चालत असतो..एकाच वेळेस सगळ्या कार बाइक्स् बाहेर पडल्यामुळे सगळ ट्राफिक जॅम होत.

त्या ट्राफिकमधून मळक्या कपड्यातला एक माणूस.चेहर्यावर दाढीचे खुंट वाढलेले,पायात तुटकी चप्पल घातलेली,आपल्या मुलीला सायकलच्या नळीवरच्या छोट्याशा सीटवर बसऊन इतक्या ट्राफिकमधून वाट काढत जात असतो.

पण खर सांगू का..??

मला तर तोच माणूस " रिअल हिरो " वाटतो.

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

जीवनाबरोबरची लढाई.

मी एकदा ट्रॅक्टर ट्राय केलेला.मागे ट्रॅालीपण होती.ट्रॅक्टरच्या स्टिअरींग व्हीलपाशी हाताजवळच अजुन एक एक्सिलेटर असतो..इंजिनच RPM वाढवण्यासाठी.हव तेवढ सेट करायच.इंजिन बंद नाहीं पडत...

अस काहीस कार ला पण हव होत.एखाद्या मोठ्ठ्या चढणावर थांबाव लागल तर पुन्हा कार फर्स्ट गिअरवर पुढे घ्यायला खुपच कष्ट पडतात ना.
 .....आणि अशावेळेस पेट्रोल कार असेल तर मग वाटच लागली.अगोदर माझ्याकडून हमखास गाडी बंद पडायची.आणि मागे मागे यायची.
मला बिच्चार्या हॅंडब्रेकचा पण म्हणाव असा उपयोग करुन घेता येत नव्हता.एक पाय ब्रेकवर ठेउन मग क्लच अर्धवट सोडून लगेचच ब्रेकवरचा पाय चपळाइने काढून अॅक्सीलेटर देउन गाडी पुढे घ्यायला सुरवातीला मला जमतच नव्हत..पॅरलल पार्किंग शिकायला मला सहा महिने लागले..एक दोन वेळा गाड़ी डिव्हायडरला घासली..कार रिव्हर्स घेताना,पार्किंगमधून बाहेर काढताना,पार्किंग करताना कितीवेळा फ्रंट-रिअर बंपरची वाट लागली असेल हे फक्त मलाच माहितये..याबद्दल मी शक्ततो माझी गुस्ताखी कधीच कबूल करत नाही.

सांगायच ताप्तर्य हे कि एवढीशी छोटीशी कार चालवायला कित्ती डोक आऊट होत...मग jcb बुलडोझर , क्रेन , मोठ्ठे ट्रक्स् , ट्रेलर हे लोक कसे चालवत असतील..हा मला नेहमी प्रश्न पडतो..
i mean to say.. मला तर यांबद्दल जाम कुतूहल आहे.

पण खर खर सांगू का , जेव्हा पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न समोर येतो ना , तेव्हा काम करण शिकायला कुठलही प्रोफेशनल ट्रेनर, सेमिनार , Motivation training यांची गरज नाही पडत...जो तो प्रत्येक जण कामासाठी स्वतः डेव्हलप होत असतो.
आपल्या Corporate sector मधल्या professional language मध्ये बोलायच झाल तर तस स्वतःमध्ये स्वतःहून skill improvement करत असतो

कारण इथे लढाई बॅासबरोबर किंवा टारगेट बरोबरची नसते.इथे लढाई जगण्याबरोबरची असते.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

Hostel Life of 2 Months.


घरी कधी साधी पायपुसनी सुद्धा पायाने सरकवायची अक्कल नव्हती.एवढ्या दिवसात मला तर नाही आठवत कि , मी कधी बेडशीट बदलल असेल.चादरीच्या घड्या घालून ठेवल्या असतील.झाडून काढण,साफसफाई,कचर्याची गाडी आली कि कचरा फेकन ही सगळी काम करायला माझ्या अक्षरशः जीवावर यायच.

मला असच काहीच गरज नसताना बॅचलर रुमवर रहायची हुक्की आलेली.माझी खुप दिवसांपासूनची इच्छा होती. घरच्यांचा विरोध होता याला.स्वप्निलला तयार केल.त्याच्या घरुन पण विरोध होताच.

मग मोठ्या थाटात आम्ही शॅापिंगला सुरवात केली.
गाद्या,उशा,चादरी,बेडशीट्स्,चप्पल स्टॅंड,पायपुसन्या,केरसुनी,पाणी तापवायला हिटर आणि हंडा,अंघोळीसाठी बादली आणि एक मग,पिण्याच्या पाण्यासाठी माठ,कपडे वाळत घालायला स्टॅंड,हॅंगर स्टीक,साबन स्टॅंड,आरसा.
अजुन बरच काही .....

बाहेर जाताना एकदा किचनमधला नळ चालू राहिलेला..आख्खी रुम तुंबलेली..तिन्हीही गाद्या भिजलेल्या,उशा,बेडशीट्स् ,चादर,केरसुनी, माझे books भिजले,किचनओट्यावर ठेवलेल हॅंड वॅाच,हेडफोन, shaving machine भिजली..सगळ भिजून गेल..आणि त्यात नुकताच पाउस सुरु झालेला..त्यामुळे भिजून अवजड झालेल्या गाद्या जिन्यातच वाळत घातल्या.
किचनओट्याव­र ठेवलेले लॅान्ड्रीचे कपडेसुद्धा भिजलेले. कसाबसा हॅंगरला अडकवलेला एक बरमुडा भिजायचा वाचला.लॅान्ड्रीमधून आनलेला आणि न्यूजपेपरमध्ये गुंडाळलेला एका लाइट-ग्रे कलरच्या शर्टवर भिजल्यामुळे पेपरची शाई means writing उमटलेले..तो शर्ट मी दोनदा try केलेला.

मज्जा आलेली तुंबलेली रुम आवरताना.

सुरवातीला खत्रुड म्हातारं वाटणार्या रुम-मालकाच खर रुप आम्हाला कळाल.नवख्या पोरांना त्याने त्याच्या बंगल्यात झोपायची विनंती केली..जॅाबमुळे दिवसभर बाहेरच असायचो.मग आमच्यासमोर गाद्या वाळत कोण घालणार हा मोठ्ठा धर्मप्रश्न पडला.अशावेळी स्वतःहून रुम-मालकीन मावशी आणि शेजारच्या आज्जींने खुप Co-Operate केल.
गाद्या वाळायला चांगले तीन चार दिवस लागले.तोपर्यंत झोपायला रुम-मालकाचेच अंथरुन पांघरुन वापरायचो.

खुप काही शिकायला मिळाल.
स्वतःचा टॅावेल,अंडरवेअर,बनियान,सॅाक्स् स्वतःच धुवायच.ते धुवायला पण इतका कंटाळा यायचा ना.
कपडे तर धुवता येत नव्हते मग कपडे धुवायला लॅान्ड्रीला असायचे.
नीट जेवलास का.झोपलास का..विचारायला कोणीच नव्हत.
रोज मेसवर जाऊन जेवायच.आम्ही त्यातल्या त्याच जरा चांगल्यातल्या चांगल्या मेसवर जाउन जेवायचो..
ताटात जे पडेल ते खायच.आळनी असो किंवा खारट असो.हे नको ते नको . घरी चालनारा शहाणपणा घरीच ठेवायचा.
मेसवरच जेवन घरच्या जेवनाबरोबर compare केल.आता मला खर्या अर्थाने घरच्यांची किंमत कळाली होती .

अजुन खुप काही ..about Financial
मी इथे माझा मोठेपणा नाही सांगतये पण आमचा जेवढा monthly खर्च होता ना.पेट्रोल,मेस,लॅान्ड्री,रुमभाड,अजुन इतर किरकोर वगैरे वगैरे त्या तेवढ्या खर्चात नवरा बायको आणि एक दोन मुले plus घरभाड आणि हा एवढा खर्च भागवणारी काही कुटुंब पाहीली..स्वतःला त्यांच्याबरोबर compare केल..माझी मलाच लाज वाटली.

त्या रुम-मालक काकांच्या विकलांग-वेडसर मुलाची आठवण येते कधी कधी.
त्याची अखंडपणे सेवा करणार्या त्या मावशी.....
त्यांचा मुलगा वयाने आमच्याएवढाच.एका बाजूला हसणारे-खिदळणारे आम्ही दोघे जन रुमपार्टनर्स आणि दुसरीकडे तो त्यांचा वेडसर-विकलांग मुलगा.हे चित्र पाहुन काय वाटत असेल त्या आईला , दुर्दैव किती मोठ पहा ना.
मनोमन वाटायच आम्हाला कि तो मुलगा नॅार्मल असायला हवा होता.

जास्त नाहीं पण 2-3 महिने राहिलो रुमवर. नाही जमल आम्हाला.रुटीन सेट नाही झाल ; पण खुप काही शिकायला मिळाल.मला खर्या अर्थाने जबाबदार्यांची जाणीव झाली.

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

फेसबूकवरच्या मैत्रिनी.

फेसबूकवर पोरी पटतात या एका गोड गैरसमजामुळे सुरवातीला जून 2010 मध्ये फेसबूकवर अकाउंट खोललेल.

फेसबूकवर तुमच्यासारखी ओळखीची,अनोळखी आणि नवनवीन माणसं भेटत गेली...काही जिवाभावाच्या पोरीही भेटल्या.शाळेत असताना पासून मुलींपासून लांब लांब पळायचो.
तुम्हाला खोट वाटेल ; पण फेसबूकवर मला ७-८ पोरींने मोबाइल नंबर share केलेत..( जरा जास्तच लाल करतोय ना..?? )
पण स्साला मला तर कधी जमलच नाही फेसबूकवर पोरी पटवायला..काही गोष्ठी रक्तातच असाव्या लागतात म्हणा.( मी किती चांगलाये हेच पटऊन सांगतोय अस वाटतय ना..?? ).

एक तर 32 वर्षाची मुलगीये माझ्या लिस्टमध्ये.हो मुलगीच म्हणा.तिच अजुन लग्न नाही झाल.ती म्हणाली कि , ऐन वेळेस घरच्या जाबाबदार्या,भावाच आजारपण या गोष्ठी समोर आल्या.मग लग्ना करायच राहूनच गेल.पण लग्न न झाल्यामुळे आयुष्य अस अपूर्ण वगैरे नाहीं वाटत.
तिच्याशी बोलताना अस कधीच नाही वाटल कि ती डिप्रेशनमध्ये वगैरे आहे.पण खुप बिंधास्त जगते ती.

एका मुलीला तिच्या बॅायफ्रेंडने फसवलेल
use & throw..
तिच्या बॅायफ्रेंडने लग्नाच अमिश दाखऊन तिच्याशी फिजीकल रिलेशन ठेवल.
मी तिला अधार दिला नसता तर कदाचित तिने सुसाइड केल असत.
असे प्रॅाब्लम माझ्यावर विश्वास ठेउन शेअर करणार्याही पोरी भेटल्या फेसबूकवर.

खर तर मला ब्लॉगबद्दल काहीच माहीच माहित नव्हत.एका पोरीने रात्रि ( पहाटे) ३ वाजेपर्यंत जागून माझा ब्लॉग बनऊन दिला..आणि मी तिला साधा एखादा call करुन थॅंक्स पण नाही बोललो...शेवटी तिनेच मला नंतर call केला.मी तिच्याशी त त प प करुन बोलत होतो.

एक मुलगी मला म्हणाली , " प्रेम खुप अनमोल असतं रे,ते अस कोणावरपण उधळायच नसत."
आणि माझे डोळे खाडकन उघडले.
कसल भारी शहाणपण शिकऊन गेली ना.

अजुन बरच काही.....

रोज अस नाहीं ; पण कधी कधी मूड छान असला कि जे मनात येइल ते टायपत बसायच.वाचणारे अगदी profile visit करुन वाचतात.इज्जत काढणारे इज्जत काढतात.
i don't care.

खुप काही शिकायला मिळाल इथे.मला व्यक्त व्हायला आवडत.मी व्यक्त होतो. स्वतःसाठी,माझ्या मनाच्या समाधानासाठी .
खर तर फेसबूकमुळे मला व्यक्त व्हायला छानसा फ्लॅटफॅार्म मिळाला.

मुलींच जग वेगळच असत यार.
काही खुप भाबड्या तर काही डिटेक्टेव्ह असतात.यांच्यातला शेरलॅाक होम्स् कधी जागा होइल याचा काही नेम नाही..काही पोरी एखाद्यावर पटकन विश्वास ठेवता.
काही मुली खटकल तर फटकन बोलणार्या तर काही डोंगराएवढी दुख: एवढ्याशा मनात ठेउन खंबीरपणे जगणार्याही असतात.
शक्यतो आपले प्रॅाब्लम्स कोणाबरोबर शेअर करत नाहीत पण ; समझाउन घेतल तर खुप काही शेअरही करतात.

कधी त्या मुली call msg करतात तर कधी मी करतो.बस्स इथच फुलस्टॅाप.अजुन तरी फेसबूकवरच्या कोणत्या पोरीला भेटायला नाही गेलो.
काय माहित ; पण मनातून भेटावस नाहीं वाटत.उथळ पाण्यातली मैत्री जास्त दिवस टिकेल का याचा विचार येतो मनात.अंतर ठेउन राहिलेलच बर..online मैत्रीच ठिकये. इथे माणसांमध्ये (specially in girls) अडकून रहायच नाहीं एवढी काळजी मी घेतोय.अवघडये पण जमतय. आणि पोरी पटवण्या व्यतिरीक्त इथे फेसबूकवर अजुन खुप काही आहे .

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

Social security.

शिवाजी महाराज आणि Social security.

मदारी मेहतर नावाचा जातीने भंगी,वर्गाने दलित आणि धर्माने मुस्लिम असलेला एक छोटा मुलगा शिवाजी महाराजांना चाकणच्या किल्ल्याच्या दरवाजापाशी सापडला.5-6 वर्षांच कोवळ अनाथ पोरगं.संभाजीराजांपेक्षा 4-2 वर्षांनी छोटा.आपल्या पोराच्याच वयाच्या कोवळ्या मुलाला काय बर काम सांगावे.

शेवटी राजेंनी मदारी मेहतरला पोटच्या लेकराप्रमाणेच कायम जवळ ठेवायचा निर्णय घेतला..इतक कि , आग्रा भेटीसाठी वयाने लहान असलेल्या शंभूराजे प्रमाणेच मदारीलाही बरोबर घेतल..मदारीनेही महाराजांच्या सुटकेसाठी शंभूराजेंनी केला तसाच प्रयत्न देखील केला.

महाराजांनी 6 जून 1674 ला रायगडावर राज्याभिषेक केला..अठरापगड जातीतले , वेगवेगळ्या धर्मातले,लहान-थोर,सरदार, सैनिक,शिपाई जे जे स्वराज्यासाठी झटले त्यांचा सगळ्यांचा मानसन्मान झाला..मात्र मदारी मेहतर हा एकमेव तरुण होता ज्याने राजेंकडून सत्कार स्विकारला नाही.
तेव्हा राजेंनी मदारीला हक्काने कायतरी मागायची आज्ञा केली.

तेव्हा मदारी मेहतर म्हणाला , " महाराज माझ्यासारख्या अनाथाला आपण पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलत यापोक्षा अजुन मला काय पाहिजे ..?? जर काही द्यायचच असेल तर मला तख्ताची सेवा करायची संधी ध्या,पण ती ही वंशपरंपरेने द्या.छत्रपतिंच जे प्रेम माझ्या वाट्याला आल तेच प्रेम छत्रपतिंच्या घरापासुन माझ्या पुढील पिढ्यांना मिळत राहाव..मी रोज आपल्या आसनावर स्वच्छ धुतलेली चादर टाकायच काम करित आलो तेच काम माझ्या वंशजांना परंपरेने द्याव.बस्स एवढच मला पाहिजे बाकी काही नको. "

आजही सातार्याच्या गादीची सेवा करायला याच मदारी मेहतरचे वंशज आहेत.

त्या काळी राजे एखाद्यासाठी पिढ्यानपिढ्या चालणारा G.R द्यायला साहसा तयार होत नसत.याला ठराविक अपवाद आहेत.
परंतु मदारीची निस्वार्थी सेवा म्हनूनच महाराजांनी त्याला वंशपरंपरेने पदवी दिली.

अनाथांना सनाथ करणारे,दलितांना घरात नव्हे चुलीपर्यंत नेणारे आणि अस्पृशांना जेव्हा गावात घेतल जात नव्हत अशा काळात मदारीला कायम आपल्यासोबत सावलीप्रमाणे ठेऊन राजेंनी एक मोठ्ठ सोशल इंजीनियरिंग केल.

आता तर महाराजांच्या social securityची Hight बघा.

आपल्या या निष्ठावंत सेवकाची महाराजांनी रायगडावर समाधि बांधली.
समाधि संतांची असते,महापुरुषांची असते,राजाची असते,सरदाराची असते किंवा एखाद्या नेत्याची असते ; पण जगाच्या इतिहासात हे अस पहिल्यांदा घडले कि इथे स्वराज्यात चक्क एका सेवकाची समाधि बांधली गेली.ती सुद्धा स्वतः शिवाजी महाराजांनी बांधली.

माणसाला एका ठराविक पातळीपर्यंत पद , career पैसा , पत , प्रतिष्ठा हवी असते ; पण तिथुन पुढे काय ..??
मित्रांनो जरा विचार करा..आजच्या जगात असा कोणता असा उद्योगसमुह आहे का , कोणती अशी कंपनी आहे का जी आपल्या हाताखालच्या लोकांना अशी इतकी पिढ्यान पिढ्या टिकणारी social security देऊ शकते..??

शिवाजी महाराज आपल्याला माणसांमध्ये investment करायला शिकवतात .
आपल्याकडे सत्ता , संपत्ती , अधिकार काही असो किंवा नसोत माणसं आपल्याला पिढ्यान पिढ्या टिकतात..
शिवचरित्रातून शिकण्यासारख्या खुप सार्या गोष्ठी आहेत.वेळ मिळेत तसा अजुन लिहत राहिल.

जगण्याची देणी.

" बन गई ना हमारी गाड़ी ."
" गाड़ी नंबर बताइये."
"MH.12 •••• "
" अरे छोटे,जरा सुन तो,इस कस्टमर का गाडी निकालो,डिलीव्हरी देना है,ब्लॅक कलर का होंडा डिओ. "

ते छोट पोरगं आत वर्कशॅापमध्ये गाडी आणायला गेल..5 मिनीटांनंतर धावत पळत बाहेर आल.

" सेठ,गाड़ी अंदर नहीं है,आस्लम लेके गयेला है किधर तो. "
" उसकी माँ की ऐसी की तैसी..स्साला ••••••• एक घंटे से गायब है..टाइम पास करता है ."

शेठ वैतागले,खिशातून अॅपल iPhone 6 बाहेर काढला.
" स्साले , हरामसादे किधर है तु,तेरी बजह से कस्टमर कबसे रुकेला है. "
माझ्यासमोरच फोनवर त्याला दोन चार दमदार शिव्या हासडल्या..
" जरा रुकिये,बंदा आरेला है. " अस म्हणत मला थोडा वेळ wait कराव लागेल याबद्दल शेठजींने दिलगिरी व्यक्त केली.

थोड्या वेळानंतर तो मळकट कळकट कपडे घातलेला 17-18 वर्षांचा मुलगा गाड़ी घेउन आला..मी त्याच्याकडून चावी घेतली.एक राउंड ट्रायल मारुन पाहिली..व्हायब्रेशन,खट-खट खाड आवाज़ येण पुर्णपणे बंद झाल होत.

शेठला बील किती झाल ते विचारल..
फक्त फायबर बॅाडी फिटींगचच काम असल्यामुळे आणि मी regular customer असल्याने पैसे घेण्यास शेठजींनी नम्रपणे नकार दिला..गाडीच काम छान झालेल. मी त्यांना कमीत कमी पोरांच्या लेबर चार्जेस चे तरी पैसे घ्या अशी request केली.तरी शेठजी नकोच म्हणत होते.

आस्लम शेजारीज आमच बोलन ऐकत उभा होता..
त्याच्याकडे पाहून माझ मन क्षणभर सर्रकन 6 वर्षे माग गेल..
माझे कार गॅरेजवरचे दिवस मला आठवले.फुल टाइम, पार्ट टाइम अस मिळून 2 वर्षे गॅरेजवर घासलेले दिवस डोळ्यांसमोरुन तरळले..
मी तेव्हा 18-19चा असेल.
एक एक स्लाइल शो डोळ्यांसमोरुन जात होता.
2008-2009
अंगावरचे मळलेले कपडे,कळकटलेली जीन्स आणि टी-शर्ट.
अंगाचा येणारा अॅाइलचा विशिष्ट वास,
गॅरेजवर यु.पी,बिहार मधल्या भैयांबरोबर काढलेले दिवस.😁
स्पिडोमीटर वायर काढून ठेऊन कस्टमरच्या गाड्या कशा पिदडायचो,
कस्टमरच्या गाडीमध्ये बॅटरी डिसचार्ज होइपर्यंत ऐकलेली गाणी,
पेट्रोल कस ढापायचो,
ट्रायलच्या नावाखाली केलेला टाइमपास.
एका कस्टमरची गाडी ठोकलेली यामुळे बॅासची खाल्लेली बोलणी,
मी शिकाऊ असल्याने मिळनारा 1500/-रुपये पगार.😞
कस्टमरच्या गाड्या फिरऊन  college च्या गेटसमोरुन पोरींना follow करत मारलेल्या घिरट्या.😉
अशातच कधी कधी खुश झालेल्या कस्टमरकडून मिळालेली टीप.
टीप मिळाल्यावर किती खुश व्हायचो यार मी.😊

त्याच टीपच्या पैशातून शेजारच्या उडपी हॅाटेलात केलेला नाष्टा,तिथे कॅालेजची पोर आणि पोरी नाष्टा करायला यायच्या. वयाने माझ्याऐवढ्याच .
काही पोरी माझ्याकडे विचित्रपणेच पाहून हसायच्या,
मग मनात लड्डू फुटायचे ; पण नंतर स्वतःचा आवतार त्या रेस्टॅारंटमधल्या आरशात पाहिल कि वास्तवाच भान व्हायच..😁

सगळ चित्र डोळ्यांसमोर उभ राहिल.. क्षणभर मीच माझ्यात हरऊन गेलो.आस्लममध्ये मी हरवलेल्या स्वतःलाच शोधू लागलो.

खर तर जुने दिवस मी विसरुनच गेलेलो..ते आस्लममुळे आठवले. आस्लमकडे पाऊन नुसत गालातल्या गालात स्माइल केल.वॅालेटमधून त्याला 100/- रुपये काढून दिले..पोरगं खुश्श झाल.

परत घरी येताना सहजच गाडीच्या फ्यूल मीटरकडे लक्ष गेल. काटा बराच खाली आलेला..बहुतेक आस्लमने पेट्रोल ढापल असाव....

का कोणास ठाऊक ; पण राग येण्याऐवजी मला समाधान वाटल.
आत्तापर्यंत या जन्माने , या जगण्याने मला न मागताच खुप काही दिलय.आज त्याचीच परतफेड करायची संधी मिळाली.
या जगण्याची देणी जरा तरी फिटावीत याचाच प्रयत्न करतोय.

जियो मेरे यार...आस्लम..😊

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

Risk & Initiative

शिवाजी महाराज आपल्याला काय शिकवतात...???

आजची आपली यंग जनरेशन आणि छत्रपति शिवाजीमहाराज यात फक्त एकच बॅान्डिंग आहे.
छत्रपति शिवाजीमहाराज हे शब्द कानावर ऐकू आले कि आपण जय म्हनून रिकामे होतो,,आणि इथेच सगळ संपत.. शिवाजीराजे देव नव्हते , ते आपल्यासारखेच मनुष्य होते.

प्रॅाब्लम नसतात कुणाला..??..सगळ्यांनाच प्रॅाब्लम असतात,,अगदी शिवाजी महाराजसुद्धा खुप मोठमोठ्या प्रॅाब्लममध्ये सापडले होते..

१) ( Risk )
ज्या अफजलखानाने विजापुरात शहाजीराजांना अटक करुन धिंड काढलेली, ज्या अफजलखानाने कस्तुरीरंगन नावाच्या एका राजाला असच मैत्रीच अमिष दाखऊन कपटाने मारल,,ही अफजलखानामागची पार्श्वभूमि जिजाऊंनाही माहित होती ,, तरीही जिजाऊंनी अशा धोकेबाज अफजलखानाच्या भेटीला शिवाजीराजांना पाठवल,,अष्टप्रधान मंडळ आणि। जुनी जाणती माणसं नको म्हणत असताना पोटच्या पोराला अफजलखान भेटीसाठी पाठवणारी जिजाऊ ....अशा मानसिकतेच्या किती माता आहेत महाराष्ट्रात..??

आजकालच्या जगात आपल्याला मरायला अफजलखानाच्या समोर जायचे नाहिये, सांगायच ताप्तर्य हे कि बर्याच ठिकाणी बिंधास्त रिस्क घेतल्याशिवाय काही पर्यायच नसतो..अशा ठिकाणी आपल्यातली किती मराठी पोर रिस्क घ्यायला तयार असतात..आपण आपल्या आयुष्यातले बरेचशे निर्णय दुसर्यावर ढकलून देतो किंवा बर्याचदा आपण घेतलेले निर्णय दुसर्या कोणाच्या सांगण्यामुळे बदलतो...

आजच्या या वेगाने पसरत असलेल्या कार्पोरेट क्षेत्रात , नोकरी , व्यवसाय , बिजनेसमध्ये बरचस यश हे केवळ रिस्क घेण्याच्या मानसिकतेवरच अवलंबून असत,त्यामुळे वाळवंटातून आलेले मारवाड़ी समाज आणि पाकिस्तानमधून हाकलकऊन लावलेला सिंधी समाज आज प्रगति करत आहे.
पण आपल्याला आपल्या आईवडिलांनीच कम्फर्ट झोनमध्ये जगायची घाणेरडी सवय लाऊन ठेवलेली आहे,,या सवयी आपल्याला बदलल्याच पाहिजे...

२) Initiative ( पुढाकार )
मोठ व्हायच,,??,,, नाव कमवायचय...???
एकट्याच्या कष्टावर कोणीच मोठा होऊ शकत नाहीं,..त्यासाठी लागतात माणसं , अरे पण माणसं आपल्याकडे येणार कशी नुसता पैसा फेकून कोणी येत नसत...आणि। आलच तर माणसं टिकवण हे काय सोप्प काम नव्हे, त्यासाठी आपण स्वतः प्रेरणेचा स्रोत असल पाहिजे, लोकांनी आपल्यापासुन प्रेरणा घेतली पाहिजे, इथे उंटावर बसून शेळ्या हाकलून काय फायदा होणार नसतो....स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय काही काम होत नसतात.आपण स्वतः पुढाकार घेतला तरच आपल्या हाताखालची माणसं आपल्याला follow करतात.

आता थोड हे शिवाजीराजांच्या लाईफबरोबर मॅच करु....
अफजलखान दगाफटका करणारच हे राजे जाणून होते , पण तरीही ते स्वतः अफजलखानाला भेटायला गेले..
का गेले..??
राजे होते ते.
त्यांच्या एका आदेशावर कोणीतरी गेलच असत अफजलखानाला भेटायला..
मग राजांनी का अस केल..??...
का गेले ते अफजलखानाला स्वतः भेटायला...???

इथे राजांनी स्वतः पुढाकार घेतला त्यामुळेच तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिदसारखी माणसं राजांसाठी मरायला तयार होती..

शिवचरित्र हा नुसत डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नसून डोक्यात घेण्यासारखा विषय आहे...
शिवचरित्र आपणाला काय शिकवते,,जरा आपल स्वतःच आयुष्य शिवाजीराजे , संभाजीराजे आणि जिजाऊमॅासाहेब यांच्याबरोबर मॅच, कंपेअर करुन पहा..
शिवचरित्रातुन अजुन शिकण्यासारख्या खुप गोष्ठी आहेत.. ...वेळ मिळेल तसा लिहीत राहिल..

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

शिवाजी महाराज आणि शब्द .

मी शत्रुला फसवलय पण मित्राला फसवल्याच एकतरी उदाहरण दाखवा...{ छत्रपति शिवाजी महाराज }
फ्रेंडशिप डे च्या दिवशी मी ही post टाकलेली..त्याबद्दल थोडस खोल जाऊन अजुन लिहतोय.शिवाजी राजेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात मित्रांचा वापर करुन मित्रांना धोका दिल्याच एकही उदाहरण आख्ख्या शिवचरित्रात शोधूनही सापडनार नाही.

शत्रुपक्षातदेखील शिवाजी राजांनी माणसं जोडली.आणि ही माणसं टिकवण्यासाठी राजेंनी दिलेले शब्द पाळून प्रसंगी जीव धोक्यात घालून कशी टिकवली...याचाच एक किस्सा.

मिर्झाराजे जयसिंग यांच्या शब्दाला मान देउन राजे औरंगजेब बादशाहाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले.तिथे औरंगजेबाने राजेंवर चौकी पहारे बसउन त्यांना नजरकैदेत ठेवले.

सख्ख्या भावांना कैदेत टाकून त्यांची कत्तल करणारा,जन्मदात्या बापाला कैदेत टाकनार्या, धुर्त,कपटी औरंगजेबाच background पाहता तो शिवाजी राजेंबरोबर कपट करणार हे निच्छितच होत.त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग बुर्हानपुरात होते.सहाजिकच शिवाजी महाराजांच्या जिवाची काळजी घेण्याची जबाबदारी मिर्झाराजेंचा मुलगा रामसिंग यांच्यावर पडली.रामसिंगानेही आपली माणसं मोगली फौजेबरोबर चौकी पहार्यांवर नेमली.

पण आजुबाजूला सतत रामसिंगाची माणसं असल्याने औरंगजेबाला सिवाचा काटा काढन अवघड वाटू लागल.बराच खल झाल्यानंतर कपटी औरंगजेबाने फौलादखानास फर्मावले सीवाला राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जा.

 राजअंदाजखानच्या हवेलीत महाराजांना नेणे म्हणजे मृत्यू कुठल्याही क्षणी येणारच.
या हुकुमाची माहिती रामसिंहास समजली तो तडक औरंगजेबाचा बक्षी मुहम्मद अमीनखान याच्या कडे गेला. त्यास रामसिंह सरळ म्हणाला बादशाहने शिवाजी महाराजांना मारण्याचा विचार केला आहे पण शिवाजी महाराज तर आमच्या शब्दाव विश्वास ठेवून एवढ्या लांब आले आहेत त्यामुळे बादशाहने प्रथम मला ठार मारावे,माझ्या मुलाला ठार मारावे मग सीवाला ठार मारावे. अमीनखान तसाच औरंगजेबाकडे गेला आणि झालेले बोलणे जसेच्या तसे कथन केले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐकून घेतल्यावर औरंगजेब अमीनखानास म्हणाला रामसिंहास सांग सीवासाठी तू जामीन राहा. जर तो पळाला, काही बिघाड केला तर तू जबाबदार राहशील, असे तू लिहून दे. अमीनखानाचा निरोप मिळताच रामसिंह म्हणाला, ठीक आहे, मी जामीन राहतो. शिवाजी महाराज असे काही करणार नाही. घडलेला सगळा प्रकार रामसिंह याने महाराजांना येऊन सांगितला. दुसर्या दिवशी महाराज रामसिंहच्या डे-यात गेले आणि मी काहीही बिघाड करणार नाही असे वचन दिले.

महाराज आता रामसिंहास दिलेल्या शब्दातून सुटका करून घेण्याचा विचार करत होते. त्यांनी रामसिंहास बोलावले आणि त्यास म्हणाले तुझ्या शब्दाला खूप वजन असे मला वाटत होते. पण इथे बादशाहास वारंवार विनंती करून देखील काही उपयोग नाही.

तू बादशाहाकडे जाऊन सरळ सांग ह्या सीवाला तुम्ही सांभाळा. त्याला मारायचे तेव्हा मारा आता माझी जबाबदारी संपली पण इथे उलटेच झाले रामसिंह महाराजांना म्हणाला मी तुम्हाला सोडून जाणार नाही.

महाराजांनी परत औरंगजेबाकडे अर्ज केला मला रामसिंहाच्या  ताब्यात ठेवू नका. दुसरीकडे कुठेही हलवा यावर औरंगजेबाने उत्तर दिले रामसिंहासारखा निष्टावंत सेवक नाही म्हणून तिथेच राहावे. महाराजांना कसेही करून रामसिंहास दिलेल्या वचनातून मुक्त व्हायचे होते.

परत महाराजांनी रामसिंहास सांगितले बादशहास दिलेला जामीन अर्ज परत मागे घ्यावा. त्याला मला काय करायचे ते करु द्या. रामसिंहाने परत नकार दिला तो महाराजांना म्हणाला मिर्झा राजांना पत्र पाठवले आहे उत्तर येई पर्यंत थांबा.

18 August 1666 या दिवशी राजेंना विठ्ठलदास कोठडीमध्ये शिफ्ट करुन मारायचा प्लॅन होता.ही खबर राजांना एक दिवस अगोदर कळाली..

कपटी औरंगजेब काहीही करु शकत होता.पळून तर जायचय आणि रामसिंगाला दिलेला शब्दही पाळायचाय.अशा द्विधा मनस्थितीमध्ये राजे सापडले..रामसिंगांचा जामीन Active असताना राजेंनी पलायन केले असते तर रामसिंग तोंडावर पडले असते.

राजेंनी रामसिंगाबरोबर चर्चा करुन परिस्थिति समाझाऊन सांगून त्याला त्याचा जामीन अर्ज मागे घ्यायला सांगितला...औरंगजेबालाही हेच हव होत. औरंगजेबाने पुढे पहार्याची जबाबदारी पोलादखानावर सोपवली.

रामसिंगाने औरंगजेबास शिवाजी पळुन जाउ नये म्हनुन दिलेला जामीन अर्ज,माझ्याकडे असताना सिवा पळून जानार नाही याची घेतलेली जबाबदारी,रामसिंगाने औरंगजेबास दिलेला शब्द तसेच राजेंनी रामसिंगास दिलेला शब्द. अगोदर या सगळ्यामधून बाहेर पडुन मगच राजे 17 August 1666 यादिवशी कैदेतुन शिफातीने बाहेर पडले..

मैत्री कशी जपावी , एखाद्याला शब्द द्यावा आणि दिलेला शब्द कसा पाळावा ते शिवाजी राजेंकडून शिकाव.
 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

लाखमोलाची माणसं

कौरव आणि पांडव आपापल्या परिने आजुबाजूच्या राज्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते...कर्णाच्या अग्रहामुळे दुर्योधनाला मदतीसाठी श्रीकृष्णाकडे द्वारकेला जाव लागल.

" ऐकीकडे नि:शस्त्र मी आणि आणि दुसरीकडे सशस्त्र अशी बलदंड सैनिकयोध्यांची 15 लाखांची यादवसेना यांपैकी काय पाहिजे तुला..?? " असा मोह टाकनारा विचित्र प्रश्न श्रीकृष्णानं दुर्योधनाला टाकला होता.

..........आणि दुर्योधनाने शेवटी 15 लाखांची यादवसेनाच स्विकारली..
त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेला. सहाजिकच अर्जुनाने एकट्या श्रीकृष्णाला स्विकारण भाग पडल..तिथे श्रीकृष्णानावर अर्जुनाच्या रथाचे सारख्य करायची जबाबदारी टाकली गेली.

दुर्योधनाच्या या निर्णयावर कर्णाने नाराजी व्यक्त केली.

 " त्यावर मी यादवांची 15 लाखांची सेना आपल्याकडे वळऊन कौरवांचे सामर्थ्य वाढवले आहे,तुला अस नाहीं का वाटत?"दुर्योधनाने कर्णाला उलटा सवाल केला.

" युवराजा , युद्धात बुद्धि नावाच शस्त्र सर्वात प्रभावी असत हे तुला माहित नाहीं का..?? अर्जुनाच्या रथाच सारथ्य करणारा श्रीकृष्ण आपल्या रथाचे वेग आखडेल पण जिभेचे वेग सैल सोडील हे तुला कस समझल नाहीं..?? "....कर्णाने दुर्योधनाला त्याच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न केले.

पुढे अफाट आणि बलाढ्या अशा कौरवांचा पांडवांकडून महायुद्धात पराभव झाला.

आपल्या आयुष्यातदेखिल अशी श्रीकृष्णासारखी माणसं येतात.ही माणसं आपल्या रिअल लाईफमध्ये महाभारतातील 15 लाख सैन्यापेक्षा श्रीकृष्णाप्रमाणेच महत्वाची भूमिका बजावत असतात.. आपल बरचस यश या माणसांवरच अवलंबून असत. या अशा काही माणसांसमोर आख्ख जग फिक असत.. खर तर अशा माणसांशिवाय आपल आयुष्यच अपुर्ण असत. या माणसांची जागा दुसर कोणी घेऊच शकत नाहीं ; पण कधी कधी मोहाच्या क्षणाला ही माणस आपल्यापासुन दुरावतात आणि मग सहाजिकच आपण अपयशाच्या खोल दरीत फेकले जातो.

आयुष्यातील ही माणसं कध्धीच दुखवायची किंवा गमवायची नसतात.ही माणसं जपायची आणि जतन करायची एक कला असते..ही कला ज्याला जमते तोच यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचतो आणि टिकतो.

गुरुवार, २५ जून, २०१५

के.इ.एम हॅास्पिटल पुणे.

के.इ.एम हॅास्पिटल पुणे.

4-6 महिन्यांपुर्वी.माझ्या एका फ्रेंडचा भाचा म्हनजे दहा महिन्यांच बाळ आजारी होत.त्याच्या पोटात लिव्हरशेजारी कॅन्सरची गाठ होती.
केमो,रेडिएशन टेस्ट यातच साधारण आमचा एक-दीड महिना गेला होता.पुढे अॅापरेशनसाठी पुर्वतायारी आणि  रिकव्हरीसाठी अजुन दोन आठवडे बाळाला हॅास्पिटलमध्येच ठेवाव लागणार होत.
अस साधारण तीन महिने कधी रोजच तर कधी दोन-तीन दिवसांआड आमच्या नियमितपणे हॅास्पिटलमध्ये चकरा होत असत.

तिथल्या पार्किंगशेजारी लागूनच एक टॅायलेट आहे.ते टॅायलेट मेंटेन करण्यासाठी हाऊसकिपींग करणारे आणि इतर बिलींगच वगैरे काम बघनारे एक असे दोन-तीन माणसं तिथं असतात.
बर्याचदा आम्ही त्यांना  टॅायटेट-मुतारीच्या समोरच्याच एका कट्ट्यावर दुपारच जेवन करताना पाहिलेल..त्यांना तस तिथे जेवताना पाहून मला खुप वाइट वाटायच. सामाजिक न्याय वगैरेसारख्या गोष्ठी मनात थैमान घालायच्या .

अॅापरेशन झाल्यावर आठ दिवसांनंतर  ते बाळही दगावल...मग आम्ही चार-आठ दिवस रडलो. बाळाच्या आईच सांत्वन केल.त्या मित्राला आधार दिला.....

उरली होती ती फक्त हळहळ.

मग अजुनही कधी कधी त्या हाऊसकिपींप करणार्रा लोकांबद्दल मनात विचार येतात.
हो.....आम्ही समाजातील शोषित घटकांवर फक्त चर्चा आणि विचारच करणार..तोही आजच्यापुरताच.
अजुन एक जळजळीत सत्य.....
समाजातील शोषित घटकांबद्दल आपल्या मनात पुसटशी का होइना तुच्छतेची भावना असतेच...हे सत्य कोणीच नाकारु शकत नाहीं.
त्यामुळे आमच्या सामाजिक जाणीवेला काही अर्थच उरत नाहीं.

पण एक आहे.
इथे प्रतेकजण स्वतःशीश busy आहे.दुसर्यांचा विचार करायला वेळ आहेच तरी कोणाकडे. कोणी कोणाशिवाय जगायच थांबत नसत..
येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्याला नवी दृष्टि देतो तसच बरच काही विसरायलाही शिकवतो.
सुख-दुख: चार दिवसांची आणि आठवणी आयुष्यभरासाठी असतात..

बस्स , त्याच आठवणी आपण बरोबर घेतो आणि चालतो . त्याच रोजच्या मळवाटेवरुन.

रविवार, २१ जून, २०१५

ती

आमच्या गावातली एक मुलगी , माझी मैत्रिणच , 2010मध्ये ती engineering degree ला होती.ती एका मुलाच्या प्रेमात पडली.आणि हट्टच धरुन बसली.लग्न करिन तर त्याच्याशीच.तिच्या आई-वडिलांना हे मान्य नव्हत.

हिने घरच्यांना आत्महत्या करायची धमकी दिली मग घरच्यांनी यांच लग्न करुन दिल.

तो मुलगा शिकलेला नव्हता.10वी नापास. तोंडात सदानकदा गुटखा , लग्न-वरात अस काही असेल तर याची तिथे दारु पिऊन फालतूगिरी ठरलेलीच.याचे मित्रही तसेच.आणि करियर वगैरे असले काही शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नाहीतच...

आणि ही मुलगी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये Job करते..घर हिच्या सॅलरीवरच चालच असेल बहुतेक.

तर हे Couple मला आज एका लग्नामध्ये भेटलेल.

याची बाहेर D.J समोर दारु पिऊन फालतूगिरी चालू होती.मला एकदा म्हनाला कि बघ मी कशी शिकलेली आणि माझ्यापेक्षा चांगली पोरगी पटवली.

आणि ती मुलगी.

एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखी वाटत होती.तिची नजर कुठे तरी हरवलेली.चेहर्यावर चिंतेची लहर स्पष्ट दिसत होती.माझ्याबरोबर कॅालेजला असतानाच्या काळात लग्नसमारंभामध्ये फूल टू धमाल करणारी . ती आज मला तशी वाटली नाहीं . काय माहित पण कदाचित यामुळेच मला तिच्याशी बोलायची हिंमत नाहीं झाली...

शनिवार, ३० मे, २०१५

दळण

"बोलो गुप्ताजी,क्या हाल है ." जिन्यातुन धपाधप पावल टाकीत जिना चढणार्या गुप्तांना मी एका पायावर उभ राहुन दुसर्या पायात शूज घालत असताना विचारल .

" कुछ नहीं , हम अभी आ रहे हैं  जॅाब से."

"कहा निकल रही है सवारी..??" मला डोक्यापासुन पायापर्यंत निरखत त्यांनी विचारल.

" जी , दळण दळने जा रहा हूँ ." मला हिंदी शब्द आठवेणात,मी गडबडीत आठवले स्टाइल मध्ये उत्तरलो.

"क्या क्या क्या...??"

"कुछ नहीं,यु ही दोस्त के पास जा रहा हूँ ."

मी वेळ मारुन नेली... जाता जाता गुप्ताजी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.त्यांना मी काय म्हनालो ते नेमक काय ते कळालच नाहीं.
गुप्ताजींनी मी काय उत्तरलो हे दोघातीघांना विचारल पण माय गुड लक . थॅंक्स् गॅाड.

गुप्ताजीं "दळण दळने जा रहा हूँ" हे वाक्यच विसरुन गेलेत.ते भलतच कायतरी विचारतात.मराठीमध्ये ते काय विचारतायेत हेच धड कळत नाही.

लेकिन कुछ ना कुछ तो पुछनेवाली खास बात है हे त्यांच्या लक्षात आलय ,आणि ज्यावेळेस गुप्ताजींना  "दळण दळने जा रहा हूँ" इसका मतलब हिंदी और मराठी में मतलब क्या होता हैं, याबद्दल कळेल त्यावेळेस माझ्या इज्जतीचा भाजीपाला होणार हे नक्की.
मी पोरींसारख दळण दळून आणतो हा मुद्दा घेऊन मला चिडवायची एकही संधी सोडनार नाहीत.

गुप्ताजी शॅाक्स् , आय अॅम रॅाक्स्.

गुरुवार, २८ मे, २०१५

बच्चू

शूजपॅालिशसाठी वेटिंगला उभा होतो.खुप घाईत होतो.एक एक मिनीट थांबनही जड वाटत होत.
माझे शूज पॅालिश करायला घेनार तेवढ्यात एक साधी राहनीमान असलेला , साधारण चाळीशीच्या आसपास वय असनारा , सर्वसामान्या वाटनारा माणूस फाटक्या-तुटक्या चप्पल,बुट,सॅंडलचे तीन-चार जोड घेउन आला.जास्त पैसे मिळउन देनार काम असल्यामुळे सहाजिकच दुकानदाराने माझ्याअगोदर त्याच काम करायला हातात घेतल.

दुकानदाराच्या शेजारीच बसलेला तो.अगदी त्याचा बिजनेस पार्टनर असल्यासारख.मी खुप वैतागलो जवळपास माझा अर्धा तास त्या माणसामुळे वाया जानार होता.मी बाईकवर बसलेलो,माझा संयम शक्य तेवढा टिकउन त्या खाली जमीनीवर बसलेल्या माणसाकडे गॅागलच्या काळ्या काचांमधुन शक्य तेवढ्या तुच्छतेच्या नजरेने पाहत मनातल्या मनात म्हंटलो.

 " कहाँ कहाँ से चले आते हैं ."

त्याच काम झाल.इतका वेळ तो एकही शब्द बोलला नव्हता माझ्याशी.काय माहित मला बोलावस वाटत होत पण मी सुद्धा बोललो नाही.
जाताना खुप कृतज्ञपणे तो बोलला , " सॅारी हा बाळा,माझ्यामुळे तुला खुप त्रास झाला."
मला माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारख वाटल.
कसतरीच वेड-वाकड तोंड करुन मी म्हंटलो , " इट्स् ओको ."

दुकानदाराने माझ शूज पॅालिश करायला सुरुवात केली , मी सहजच डावीकडे वळून पाहिल , i'm Shocking , दुकानापासुन 100 फूट अंतरावर त्या माणसची "Audi" उभी होती with Driver.आणि तो माणूस गाड़ीमध्ये बसत होता अर्थात मागच्या सीटवर.

दुकानासमोर सिग्नलला गाडी थांबली,त्याने पॅावर विंडोने काच खाली घेतली.अजुनही तो माणूस माझ्याकडे कृतज्ञतेनेच आणि स्माईल करुन पाहत होता.

त्याचा अवतार,हसरा चेहरा , साधी-सुधी राहनीमान , सौम्य भाषा,बायको-मुले,आईवडील यांच्या फाटक्या चप्पला,बूट आणि सॅंडल्स स्वतः रिपेअरिंगला घेउन येण्याच अॅटीट्यूड , दुकानदाराशेजारीच मांडी घालून बसणार्या , पन्नास लाखांची कार वापरनार्या , गाड़ी 100 फुट अंतरावर पार्क करनार्या , मला बाळा म्हननार्या त्या "मोठ्या" माणसाबद्दल मी मनातल्या मनात काय काय नको नको ते बोललेलो मला आठवल.

गाड़ी अजुनही सिग्नलला उभीच होती.मी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ मलाच खुप "तुच्छ" असल्यासारख वाटल...

अजुन खुप बच्चू आहे मी....

बुधवार, २७ मे, २०१५

ब्ला...ब्ला...ब्ला...😊

___________Incoming Call___________

ती : हाय सर...गुड मॅार्निंग ,आय अॅम नेहा , टॅाकिंग फ्रॅाम ••••• बॅंक..कॅन आय स्पीक टू विनायक सर..??
मी : ह्ममममम,, बोला.
ती : सर,तुम्ही लकी कस्टमर आहात आणि आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड अॅाफर करत आहोत..ही तुमच्याशी बोलण्यासाठी योग्य वेळ आहे का...??
मी : हो.
ती : तुम्ही •••• इथे जॅाब करता ना.??
मी : हो.
ती : तुमच पॅकेज •••• एवढ आहे ना..??
मी : हो.
ती : तुमच Salary account ••••• बॅंकेत आहे ना.??
मी : हो
 ती : आम्ही तुम्हाला Coral Credit card देत आहोत..,मी कार्डबद्दल information सांगतिये,व्यवस्थित ऐका..
या कार्डसाठी तुम्हाला.. 500/- annually changes पडतील....आम्ही तुम्हाला 1 लाख ते 1.50 पर्यंत credit limit देत आहोत...तुम्हाला आम्ही 2000 Points Free देत आहोत.. हे कार्ड वापरुन monthly 5 movie tickets buy one get one free मिळऊ शकता...एरोप्लेन आणि ट्रेन टिकिटवर •••%discount मिळेल...जर तुम्ही पहिल्या तीन महिन्यात •••• रूपयांची शॅापिंग केली तर तुम्हाला आमच्या बॅंकेकडून एक टाय गिफ्ट मिळेल..आणि annually charge मध्ये 100% discount मिळेल...every Friday ••••• पिझ्झा मध्ये ••% discount मिळेल............ब्ला......ब्ला......ब्ला....ब्ला.......ब्ला.
मी : हो का.
ती : मी तुमच्याकडे documents collect करण्यासाठी एक्झिकिटीव्हला कधी पाठऊ..??..टेन वर्किंग डेज् मध्ये तुम्हाला कार्ड मिळेल..
मी : नाही,,नको,,नो थॅंक्स् , माझ्याकडे already तुमच्या बॅंकेच क्रेडिट कार्ड आहे.
ती : ह्ममम

__________Call end __________

बिच्चारीच तोंड कस झाल असेल.

फक्त,, मला नकोये,अस म्हंटल तर ; का नको याचही Clarification द्याव लागत..
सुरवातीला अहो वगैरे रिस्पेक्टिव्ह बोलनार्या पोरी नंतर अरे तुरे करुन खुशाल गप्पा मारतात..
नंतर मुळ विषयावर येऊन एकदा वापरुन तर पहा,खुप छान अॅाफर आहे.

आणि पुन्हा ...... ब्ला....ब्ला......ब्ला......ब्ला....ब्ला....

सोमवार, २५ मे, २०१५

कोल्हा आणि कावळा

बिघडलेल्या वोडाफोन बिल पे मशीनच्या बाहेर..मोबाइलमध्ये डोक खुपसून net banking वर bill payसाठी unsuccessful try करत होतो.
सहज उजवीकडे पाहिल तर ती माझ्याकडे पाहुन स्माइल करत होती..कदाचित मला तसा भास झाला असेर अस समझून...मी पुन्हा मोबाइलमध्ये डोक खुपसल.

5-10 मिनीटांनंतर...
आता तर ती चालत चालत माझ्याच दिशेने येत होती.माझी चुळबूळ चालू झाली.
नाही ती माझ्याकडे येत नसेल आणि माझ्याकडे पाहतही नसेल, मी माझी स्वतःचीच समजूत काढत होतो.
मी आजुबाजूला पाहिल.मी एकटाच होतो.मग नक्कीच ही पोरगी माझ्याकडेच येत असनार.

 " प्लीज,मला बिल भरायला मदत करशील का.."
 " नाही ना मशिन बंद आहे,मीच नेट बॅंकींगवर ट्राय करतोय..पण सक्सेस होत नाहिये."
 " मग माझ पण बिल भर , मी तुला cash देइल ." ( ओळख ना पाळख.)
 " नाही होतये , net slow आहे ना."
 " शर्ट छान आहे तुझा." माझ्या कडे स्माइल करुन पाहत ती मला म्हनाली
" हो का." ( दिल गार्डन गार्डन हो गया )
 " तु गोरा आहेस ना,,म्हनुन तुला खुप सूट करतोय." ( what's..?? मी इतका गोरागोमटा आहे , हे मला आजच कळाल..)
मनात एव्हाना लड्डू फुटायला सुरवात झाली होती ; पण तस न दाखवता मी तिला Thanks म्हनालो.
 " माझ्याकडेची आहे असाच शर्ट , फक्त डिजाइनमध्ये थोडासा चेंज आहे ."
 " By the way मी मृणाल. " तिने शेक हॅंड करत हात पुढे केला.
 " मी विनायक. " तिचा मऊ हात हलकासा दाबत मी माझ introduction करुन दिल..
 " काय करतोस तु,,clg कि Job...???"
माझ्याकडूनही तिला same question विचारला गेला...
तिथेच बराच वेळ आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत उभे होतो... माझा mobile no मागत होती..मी तिला नंबर देण्यास नकार दिला.त्यामुळे तिनेच एका कार्डवर मला तिचा मोबाइल नंबर लिहून दिला..
तुझा contact number आहेच ना माझ्याकडे , मी तुला कॅाल करिन.आपण नंतर नक्की भेटू , अस Promise करुन मी तिला good bye केल.

मला लहानपणी शिकलेली छान छान गोष्टींच्या पुस्तकातली कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवली.
एका झाडावर कावळा बसलेला असतो , त्याच्या तोंडात पुरी असते..तेवढ्यात त्या झाडाखाली एक कोल्हा येतो..कावळ्याच्या तोंडातली पुरी पाहून कोल्ह्याच्या तोंडाला सुटत...पण पुरी मिळवणार कशी...??
मग कोल्हा झाडावर बसलेल्या कावळ्याची स्तुति करतो.अरे कावळेदादा तु किती छान गातोस रे,,कुठे होतास इतके दिवस..?? खुप दिवस झाले मी तुझ गाण ऐकल नाही...प्लीज माझ्यासाठी एक गाण गा ना...
मग कावळा कोल्ह्याने केलेल्या स्तुतिमुळे पाघळतो.. गाण गाण्यासाठी तोंड ( चोच ) उघडतो...कावळ्याची काव-काव सुरु होते..पुरी झाडाखाली बसलेल्या कोल्ह्यासमोर पडते....

मी कपाळावर हात मारुन घेतला ; कारण ती पोरगी एका •••••• बॅंकेत क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमध्ये जॅाब करत होती.....

माझा कावळा होता होता वाचला...

शुक्रवार, २२ मे, २०१५

attitude

अगदी सहजपणे बोलुन गेला तो ,काही खास अस नसल्यासारख , " माझ्या दोन्हीही किडन्या फेल आहेत , एक लहानपणापासुनच आणि दुसरी आत्ता एक वर्षांपुर्वी झाली . आठवड्यातुन दोनवेळा डायलिसीस कराव लागत . "

आणि माझी एक बावळट मैत्रिन , मला तिची दर्दभरी दास्तान सांगत होती , "मी जीवनाला खुप कंटाळलीये , मला मरावस वाटत , माझ कोणीच नाहिये...वगैरे . वगैरे..."

कारण तिच Boyfriend बरोबर भांडन झालेल.

सोमवार, १८ मे, २०१५

राबनारे हात आणि यशस्वी माणूस.

तुम्ही कोणीही असोत...

राजकारणी,उद्योजक , बॅास , मॅनेजर , employee...किंवा अजून कोणितरी.

यशाच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही पोहचला असाल , आणि जर तुम्हाला टिकून राहायचे असेल तर ज्या शिडीने तुम्ही वर चढून आलात त्या शिडीला कध्धीच लाथ मारु नका ,कारण आकाशाची ऊंची गाठायच्या प्रयत्नात मातीचा आधार सोडायचा नसतो.

काहीच ठराविक माणसं मोठी होतात.
शून्यातुन विश्व निर्माण करतात.हे सगळ एकटा करु शकतो का...???

हे सगळ टीम वर्क असत.एखाद्याच्या यशामागे शेकडो राबते हात असतात.त्या राब राब राबणार्या माणसांनाही माहित असत कि,आपल्याला मिळणार्या यशामुळे मान-सन्मान मिळनार नाही ; पण त्या माणसांच्या मनात समाधान असत . कि एका चांगल्या कामात आपण सहभाग घेतलाय.कोणासाठीतरी आपण जीव ओतुन काबाडकष्ट करतोय .

माणसांना जगताना अजुन हव काय असत यार...???
मोबदल्यापेक्षा सामाजिक स्थैर्य ( social security ) महत्वाच....

मी अस म्हनत नाहिये कि मिळणार्या यशामध्ये तुम्ही राब राब राबनार्या लोकांना  भागीदार करुन घ्या . ते राबनारे लोकही तशी अपेक्षा ठेवत नाहीत . तुम्हाला सपोर्ट करण्यातच ते स्वतःला भाग्यवान समझतात.

पण तुमच सुद्धा एक कर्तव्य बनत.

फक्त याची जाणीव ठेवा कि कोणीतरी आपल्यासाठी खुप कष्ट केलेत . आपल असन किंवा नसन ते केवळ आपल्या हाताखालच्या लोकांमुळेच आहे.
जी माणसं आपल्यासाठी देह-भान,तहान-भूक विसरुन निस्वार्थीपणे मैलों मैल चाललीत त्या माणसांसाठी जास्त नाही फक्त एक मैल चालायची तयारी ठेवा.

काम करणार्या माणसांना इतर स्वरुपात कामाचा मोबदला मिळतोच मिळतो.
पण ज्या सर्वोच्च स्थानावरिल व्यक्तिकडुन कृतज्ञतापुर्वक आपल्या कामाची दखल घेतली जाते , प्रेमाने दोन शब्द बोलले जातात , ही कृतज्ञता आणि ते प्रेमाने बोललेले दोन शब्द लाखो रुपयांच्या पॅकेजपेक्षा श्रेष्ठ ठरतात.

मला नाहीं वाटत कि मिळालेल भलमोठ्ठ सक्सेस कोणी एकटा पचऊ शकेल.

आपण काय कमवल आणि काय गमावल याच मोजमाप आपण किती माणसं जोडली(टिकवली) तसेच आपल्याला किती माणसं सोडुन गेली यावर ठरवल जात....

शनिवार, १६ मे, २०१५

तिला शोधतोय...

त्या मित्राने मला विचारल मला , " ए , काय रे..?? त्या भीक मागणार्या भिकार्या मुलीकडे अस का बघतोयेस..?? कि प्रेमात बिमात पडला कि काय तिच्या..?? "
मी स्माईल केल , त्याला वाटल कि मी " हो " बोलतोय.
तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला...

हो , पडतो प्रेमात आपण कशाच्यातरी, कोणाच्यातरी,त्यात काय एवढ..??

एका डायनिंग हॅालमध्ये जेवण करत होतो.दुपारची एकदम शांत वेळ.अधुन-मधून कोकिळेचा कुहू-कुहू आवाज येत होता.त्याचबरोबर लांबून कुठूनतरी लेडिजचा गाण्याचा आवाज येत होता,फक्त आवाज,या दोन आवाजांच छान combination जमलेल.
ऐकाव आणि ऐकतच रहाव अस वाटत होत. त्याला संगीताची,बॅकग्राऊंड म्युसिकची कशाकशाचीच जोड नव्हती.
इतका छान कि अस वाटत होत दूर कुठेतरी टेपरेकॅार्डर,लाऊडस्पीकर लावलाय.गाण कोणत होत ते इतकस नाही आठवत पण बहुतेक दळण दळताना म्हनतात ते जात्यावरच गाण असाव.

आवाज हळूहळू मोठा आणि जवळ जवळ येत होता.माझ्या हातातला घास हातातच राहिला.मी स्तबध आणि बेभान होऊन ऐकू लागलो.जसजसा आवाज जवळ जवळ येत होता तसतशी माझी उत्सुकता वाढत होती.
आता तर अगदीच जवळून दहा-बारा फुटांवरुन गाण्याचा आवाज येत होता,पण मध्ये ट्रक पार्किंग केल्यामुळे आणि भिंत असल्यामुळे माझी नजर तिथपर्यंत पोहचत नव्हती.

तस गाण्याबद्दल मला विशेष अस काही कळत नाही.
शाळेत आठवी-नववीला असताना हरिपाठ भजन-किर्तनाचा नाद होता.इतकीच माझी गाण्याबद्दलची पार्श्वभूमि.

ती गाण म्हननारी जर इंडियन आयडॅाल,सारेगमप अशा रिअॅलाटी शोच्या आॅडिशनला गेली असती तर आॅडिशन्स घेणार्यांने तिला गुणवत्ता पाहुन,गाण ऐकून 100% सिलेक्ट केल असत ; पण इथे सिलेक्शन करताना दुर्दैवाने कलागुण न पाहता स्पर्धकाचे कपडे,अवतार,मेक-अप,फॅन्सीपणा पाहिला जातो.हीच मोठी शोकांतिका आहे.

डायनिंग हॅालच्या दरवाजासमोर ती आली.
ती एक भीक मागणारी मुलगी होती.
अजंठा पिच्चरमधल्या सोनाली कुलकर्णीसारखाच तिचा अवतार होता.
गाण अजुन चालुच होत.तिथल्या एका वेटरने दिला एक-दोन रुपये चिल्लर देण्यासाठी खिशात हात घातला ; पण तिने पैसे न घेता नम्रपणे खुनेनेच चपाती -भाजी ची मागणी केली.मी पाहतच राहिलो,4-5 मिनीटे गाण चालु होत.इतका वेळ गाण ऐकण्यात कसा गेला ते कळालसुद्धा नाही.
गाण गात गातच ती निघून गेली.जशी ती दुर दुर जात होती तसतसा आवाज कमी कमी होत होता....


ती गेली तिचा आवाजही येईनासा झाला.पण अजुनही तो आवाज कानामध्ये घुमतोय.
काम माहित पुन्हा कधी तो मधुर आवाज , ते गाण ऐकायला मिळेल..??
यावेळेस त्या आवाजाबरोबर कोकिळेच combination नसल तरीही चालेल.

But i want listen .याच चौकात कुठेतरी ती मला गाणं गाताना दिसेल. अजुनही मनात एक वेडी आशा आहे .

हे मी माझ्या मित्राला कस समझाऊन सांगू..??

शोकेसमधल्या बाहुल्या.

1 BHK , 2 BHK फ्लॅट आहे का..??
कार आहे का..??
मुलाची Salery आणि income मजबूत आहे ना..??
तरच हे लग्न शक्य आहे.

24-25 वर्षांच्या मुलाकडुन लग्नाच्यावेळी एवढ्या अपेक्षा..??
काय जीव घेता काय आमचा..??
अरे म्हातारड्यांनो.तुम्ही समझता काय रे स्वत:ला..??
आधी स्वतःकडे पहा ना एकदा , तुमच स्वतःच घर वयाच्या कितव्या वर्षी झाल ते.
आणि हो , मुलींच्या आया समझतात काय स्वतःला..??
तुम्हीच नवर्याच्या डोक्यात प्रोग्रॅम डाउनलोड करता ना..??

जरा दुसरीकडे जरा वेगळ्या प्रकारे डोक चालवा ना.
मुलामुलींच्या नक्की अपेक्षा काय आहेत. मुलाच career development & कर्तबगारीच्या बाबतीत जरा नीट निरीक्षण करा.

आज एखाद्या मुलाकडे फ्लॅट , कार नसेलही ; पण येणार्या काळात त्या मुलाच्या प्रगतिचा रेशो कसा असेल याचा आढावा घ्या.

लक्षात घ्या , Success काय असच सहज मिळत नाहीं.
आणि तुमची मुलगी एखाद्या मुलाच्या आयुष्यात गेल्यावर ती त्या मुलाच्या यशामधील भागीदार असणारये.
तिला आयत्या घरात शोभेची बाहुली बनउन नवर्या मुलाकडे पाठऊ नका.

तिला स्ट्रगल करायला शिकवा..ज्याप्रमाणे तुम्ही मुलाकडुन अपेक्षा ठेवता ना अगदी तसच....

शुक्रवार, १५ मे, २०१५

कॅाफी , पेरु आणि बरच काही .....

TATA Starbucks नावाच्या कॅाफीशॅापमध्ये दरवाजा उघडुन मी आतमध्ये एन्ट्री केली,,एसीची थंड झुळक आणि तिथल्या स्टापमधल्या सुंदर मुलींनी स्मितहास्य करुन स्वागत केल . मेन्युकार्ड न पाहताच मी अॅार्डर दिली , " एक रेग्युलर हॅाट कॅाफी ."

5-10 मिनीटांत टिपीकल मराठी मुलगी अॅाडर घेउन आली . पाहताक्षणी रिच वाटणारी,डोळ्यांवर महागडा चष्मा, जवळ आली त्यावेळेस परफ्युमचा सुगंध दरवळला,चेहयावर कॅास्मेटिक्सचा थर वाटत होता,चेहयावरुन ती एखाद्र्या सुखवस्तु घरातली वाटत होती . क्षणभर वाटल हीच असेल ती जगातली सर्वात समाधानी मुलगी.

एकटाच होतो,,,काउंटरशेजारच्याच टेबलवर बसलेलो,,कॅाफी पीत पीत सहजच तिला तिच्या जॅाब प्रोफाइलबद्दल विचारल,,तिने तिची दर्द भरी दास्तान सांगायला सुरवात केली , " प्रत्येक कॅाफीमागे एवढा एवढासाच एन्सिन्टीव्ह कसा मिळतो . सॅलरी कमी कशी आहे आणि तिने स्वतःला तिच्या इतर मैत्रिणीबरोबर कम्पेअर करुन मीच कशी मागे आहे,मागास आहे,मी तर वैतागलिये या जॅाबला,वर्कलोड जास्त असतो."...वगैरे ...वगैरे .....

मी अनोळखी असुन पण ती मला तिच्याबद्दल खुप काही सांगुन गेली.
आपल दुख: शेअर करायला कोणीही चालत . फक्त ऐकुन घेणारा माणूस असला म्हनजे झाल,प्रत्येक जण आपल मन मोकळ करुन टाकतो.

बील पे करेपर्यंत आम्ही बोलत होतो,, एका कॅाफीचे 141/- रुपये आजिबात काहीच घासाघीस न करता पे करुन मी तिथुन बाहेर पडलो . पण 141 रुपयांत आपण लोकल कॅाफीशॅापमध्ये कितीवेळा कॅाफी पिलो असतो . तिथे रेट किती स्वस्त पडला असता . घरी 141 रुपयांत कॅाफीच कस कस नियोजन झाल असत . याचा साधा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.

कॅाफीशॅापमध्युन बाहेर आलो ,
बाहेर एक पेरु विकनारी बाई होती . वयाने कॅाफीशॅापमधया मुलीएवढीच असेल ; पण मांडीवर छोट बाळ होत , तिचा अवतार खुप विचित्र होता,मळलेली साडी,विखुरलेले केस , पाऊस पडतोय , कशीबशी छत्री पकडुन पेरु विकायला बसलेली ती पेरुवाली .  एक पेरु मी 10 रुपयांना तिच्याकडुन विकत घेतला.ते 10 रुपये स्विकारताना तिच्या चेहर्यावरच दिसनार समाधान मी आयुष्यात कध्धीच नाही विसरनार.

खुप दिवसांपासुन साधारणपणे गेल्या 5-6 वर्षांपासुन पेरु विकत घेउन न खाल्ल्यामुळे पेरुचे पैसे जरा जास्तच घेतले असावेत अस मला वाटल . ते 10 रुपये देताना मनाला जरा रुखरुख वाटत होती . राहुन राहुन वाटत होत कि माझ्याकडुन जास्त पैसे घेतले गेलेत . मी काही बोललो नाहीं पण तिने कदाचित माझा चेहरा पाहुन माझ्या मनातल ओळखल असाव .मग तिच महागाईवर लेक्चर चालू झाल,महागाईबद्दल अगदी तळमळुन बोलत होती ती.
पण तिच्या चेहर्यावर समाधान खुप दिसत होत.

एका बाजुला आपण 5-10 रुपयांचा एवढा विचार करतो आणि दुसरीकडे एखाद्या चकचकीत मॅालमध्ये हाय-फाय ठिकाणी एखाद्या वस्तुचे मार्केट व्हॅल्युपेक्षा चांगले पाच दहा पट जास्त पैसे मोजतो , याच आपल्याला काहीच नाहीं वाटत.

अंड सेकंड थिंक , सुख आणि समाधानाच्या बाबतीत तर आपण खुप अज्ञानी , मागासलेलो आहोत , इतक सार ठिकठाक असुन पण रडनारी ती मुलगी आणि जिच्या बॅाडीलॅंग्वेज मधुन समाधान ओसंडुन वाहनारी ती पेरु विकनारी बाई  या दोघींच कम्पॅरिझन कस कराव हेच मला कळत नाहिये . आपण आपला विवेक कुठेतरी गमाऊन बसलोय .

नक्की आपल्याला काय मिळवायचय..??

समाधान मानल तर अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये आहे आणि नाहीं  मानल तर कुठेच कशातच नाही

satisfaction.

" काय कशी आहे तब्येत ,बर वाटतय ना.?" मी बसता बसता विचारल.
" हो..थोडा आराम पडलाय आता."
" काय..??  कस काय झाल हे..?? " सगळेच विचारतात तसच मी विचारल.
" एका ठिकाणी एक्झिबीशनला गेलोलो , तिथे अर्धवट उघड्या ड्रेनेजमध्ये पाय अडकून (पायाकडे बोट करुन) या इथे नडगीच हाड क्रॅक झालय. "
" ओहहह ,मग आता किती दिवस चालनारये ही ट्रीटमेंट.??"
" या वेळेस जास्त वेळ लागेल."
" या वेळेस म्हनजे..??"
" हात-पाय मोडण्याचा मला बराच अनुभव आहे ,वयोमानानुसार हाडे ठिसूळ होतात."
" मग बिजनेसच कस काय चालत , तुम्ही अॅाफिसवर नसताना..??"
" आहेत माणसं , ते करतात हॅंडल. "
त्यांच्या मिसेस पाण्याचे दोन ग्लास घेउन आल्या , टी पॅाय वर ट्रे ठेऊन त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या आणि टी.व्ही च्या रिमोटचा ताबा घेतला.
आमच्या  गप्पा सुरु झाल्या,
सहजच मी त्यांना विचारल , " बोअर होत असेल ना..?? घरी कोण कोण असत.??"
" मी , मिसेस आणि आदिती ."
"तिघेच..??"
"तस , मी आणि मिसेस दोघेच असतो घरात , आदिती ( मिसेस कडे पाहत) हिच्या बहिनीची मुलगी , 3 महिन्यांपुर्वी आलिये आमच्याकडे , कॅालेजला जाते. "
"तुमची मुल माझ्याएवढीच असतील ना..??"
"नाही , आम्हाला मुल-बाळ नाही."
च्याआयला , असली फालतू विचारपूस करुन उगाच एखाद्याच्या जखमेवरची खपली काढल्यासारख वाटल मला , माझी चलबिचल चालु झाली , कधी,टी.व्ही कडे , तर कधी फॅनकडे,,इकडे तिकडे नजर फिरउन मी खिशातुन मोबाइल काढला आणि मोबाइल मध्ये डोक खुपसल.

माझी चलबिचल कदाचित त्यांच्या लक्षात आली असावी.,काठीला धरुन,कसातरी तोल सावरत,,लंगडतच ते माझ्याशेजारी येउन बसले,,दोन मिनटे कहीच ते काहीच बोलले नाहीत,,तेवढ्या वेळात त्यांच्या मिसेस तिथुन उठल्या आणि बाहेर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या.,,,ते अजुनही शांतच होते,,मला तर आता खुप guilty वाटत होत..माझी आणि यांची चार-सहा महिण्यांपासुनची ओळख..

मी विचार करुनच हैरान झालो,,गेल्या 20-25 वर्षात यांना कित्तीतरी लोकांनी ज्यांना माहित नसेल त्यांनी मुलांबद्दल विचारल असेल , टोमने मारणारे वेगळेच  , पुरुषांच जाउद्या , ते वेळ मारुन नेतात , पण स्त्रियांची मानसिकता वेगळी असते ना.
.................आणि त्यात भरीत भर म्हनुन मीही तेच विचारल.

तेवढ्यात आदिती किचनमधुन चाहा घेउन बाहेर आली , समोर चहा ठेउन अगदी हक्काने तिने त्यांच्याकडे पाचशे रुपये मागितले,,
तिने पैसे घेतले , पाठीला सॅक अडकवली. Activa ला स्टार्टर मारला आणि गेटमधुन बाहेर पडताना कॅालेजला मी जातीये अस सांगुन गेली.

" आदिती आमच्याकडे रहायला आली तेंव्हा सुरवातीला महिनाभर बसने जायची कॅालेजला,,म्हनुन हिच्यासाठी Activa बुक केली,,हिच्या बर्याचशा  मैत्रिणी गाड्या घेउन जातात ना कॅालेजला." वगैरे , वगैरे ,वगैरे......
ते आदितीबद्दल अगदी कौतुकाने खुप काही सांगत होते.
 आणि मी नुसताच ऐकत होतो..

" घरात मुलं नसतील तर आम्हाला करमत नाहीं. नेहमीच कोण ना कोणतरी आमच्याकडे रहायला असतच ,नातेवाईकांची मुल आमच्याकडे येतात ,जमेल तितके दिवस राहतात ,शिकतात , Job करतात , सेटल होतात , निघुन जातात "

हे सांगताना त्याच्या चेहर्यावर खुप समाधान दिसत होत...
आणि शेवटी आयुष्यात हेच समाधान महत्त्वाच......

गुरुवार, १४ मे, २०१५

जगण्यातील काही तत्व.

खुप दिवसांपासुन वाटलेल लिहाव याबद्दल,,अशाच काही माणसांकडुन जगण्याची काही तत्व शिकायची असतात.
काही माणसांची लायकीच ती असते, Officer Post मिरवताना लोकांच ( I talking about junior ) प्रेम कदाचित यांना पचत नसाव.यांना प्रेमाची आणि नम्रपणाची अॅलर्जी आहे का हेच मला कळत नाही .त्यांना कदाचित हे माहित नसाव कि प्रेम दिल्यानच प्रेम मिळत.एक माणूस म्हनुन जगताना Simply कस जगाव हे पण विसरुन जाव का...???

3 वर्षांपुर्वीची गोष्ठ , दोन उच्चपदस्थ अधिकार्यांचा कार अॅक्सेटंट झालेला,,कोणाचा,,कसा,कुठे जाताना झाला हे सध्या महत्त्वाच नाही,त्यांच्या कारने हायवेवर रस्ता सोडल्यामुळे 3-4 पलट्या खाल्ल्या,रस्त्याच्या बाहेर झुडपात कार गेल्यामुळे ते बचावले,,कार कदाचित डिव्हायडरला तोडुन पलिकडच्या Apposite लेनवरील गाड्यांवर आदळली असती तर कोणीच वाचल नसत...

नशीब वगैरे मी काही मानत नाही,पण सगळे म्हनतात कि ते दोघे नशीबाने वाचले , दोघांनाही मेजर डॅमेज झालेल,,,,,महिनाभर सुट्टीवर होते...
एवढा मेजर अॅक्सेटंट होउनही त्यांच्याबद्दल कोणालाच कसलीच काळजी वाटली नाही ..त्यांना हॅास्पिटलमध्ये बघायलासुद्धा कोण गेल नाही...प्रार्थना आणि दुवा करण लांबच राहिल . याउलट त्यावेळेस सगळे म्हणत होते कि, "गाडीने अजुन एक-दोन पलट्या मारल्या पाहिजे होत्या "

मला तेंव्हा अस म्हणणार्यांचा मनापासुन राग आलेला..च्याआयला,,कोणीतरी मृत्यूच्या दाढेतून परत आलय....अरे ते कसेही असुदेत,ती सुद्धा माणसेच आहेत,,आपण मदत करु नाही शकलो म्हनुन काय झाल,थोडीशी सहानुभूति तर दाखऊ शकतो ना ,,आपण समझतो इतकही कोणी वाइट नसत...Officer ने कडक आणि खड्डूस वागावच लागत,,ते एक रोल करतायेत,,,मीच स्वतःच्या मनाची समजूत घालत होतो..जग किती चांगल आहे,,सगळी माणस चांगलीच असतात,,वगैरे,वगैरे ,वगैरे....!

एखादा माणूस कितीही भेंचोद असुदेत, मृत्युच्या दाढेतुन वाचला असता माणसाचा सगळा माज जिरतो,,त्याचा जसा पुनर्जन्म होतो तशी त्या माणासाची विचारसरणीसुद्धा बदलते.....!!!!,,,अशी मरता मरता वाचलेली बरीचशी माणस पाहिलीयेत मी...हे लोक प्रत्येक क्षण आनंदाने जगतात..साहसा कोणालाच दुखावत नाहीत ..खुप प्रेमळ बनतात..
मला वाटलेल त्यांनी स्वत:मध्ये असाच काहीसा बदल घडवला असेल,,😊

पण आपल्याला तस कायतरी वाटून काय फायदा,,ज्याच त्याला कळाल पाहिजे,,,ते त्यांच आयुष्य आहे,त्यांच ते कसही जगतील...त्यांच अॅटीट्यूड त्यांच्यापाशी.
आता मध्यंतरी  त्यांच्याशी काही कामांमुळे पुसटसा अप्रत्यक्ष संपर्क आला,तीच गुर्मी,तोच माज,तीन वर्षांनंतरही त्यांचा माज पुर्वीपेक्षा दहापट वाढलाय,,काम असल कि Juniorबरोबर थोडसच गोड गोड बोलायच,,इतर वेळेस कुचक्यासारख only Bossing,Bossing,Bossing,तोंडावर सदानकदा बारा-तेरा वाजलेले,,जनु काही आख्ख्या जगाच टेंशन यांनाच आहे,दिलखुलासपणे हसण यांना कध्धीच माहित नाहीं.

मला आता कळाल कि ते लोक,, " गाडीने अजुन एक-दोन पलट्या मारल्या पाहिजे होत्या" अस का म्हनत होते ते..

पैसे, Image,मान-सन्मान, प्रतिष्ठा तर थोड्याबहुत प्रमाणात सगळ्यांकडेच असते , अगदी भिकार्यांनासुद्धा इज्जत असते.
ते दोघेजन आपल्यासाठी दुवा करणारे दोन माणसही जोडु नाही शकले...संकटकाळात इतरांकडुन सहजच मिळणारी थोडीशी सहानुभुतिसुद्धा नाही यांच्या नशिबात.
मला एक प्रश्न पडला,,मग या अधिकार्यांनी जीवनात नक्की काय कमावल...? ये जीना भी क्या जीना है ......बापरे.

मी तर एक धडा कायमचा शिकलो,,," आपल आयुष्य आपण मजेशीर जगायच, जगताना अस जगायच कि, कोणी आपल्यावर प्रेम नाही केल तरी चालेल,,पण कुणी आपला द्वेष तरी नाही केला पाहिजे."
                           

माझी किंमत..

ससूनच डेड हाऊस,सडलेल्या,भाजलेल्या,काही किडे पडलेल्या..हात-पाय..मुंडके तुटलेल्या.. आणि घाणेरडा उग्र वास येणार्या डेडबॅाडीज् .

शनिवारवाड्याजवळच सुर्या बर्न हॅास्पिटल..तिथले पहायलासुद्धा भिती वाटेल असे भाजलेले आणि विद्रुप दिसणारे ,त्यांच्यात बोलायला आणि विव्हळायलासुद्धा त्राण नसल्याने निपचित पडून राहिलेले , घोंगावणार्या माशाही हुसकाऊन लाउन शकत नाहीं इतके अशक्त झालेले पेशन्ट्स्,,त्यांचे अगतिक आणि असहाय्य असे खुणावणारे डोळे....

वारज्याच सिप्ला सेंटर,तिथले अखेरच्या घटका मोजत असलेले कॅन्सरचे पेशन्स्ट् , काहींचे तोंड सडलेले..हसण्या खेळण्याच्या वयात ब्रेन कॅन्सर झालेली लहान मुले.. food bypass करण्यासाठी नाका-तोंडात नळ्या टाकल्यामुळे दुर्दैवाने जे पाण्याची चवही घेऊ शकत नाहीं असे पेशंट्स्.

आणि कधीकधी तासन् तास स्मशानात बसून पाहिलेल्या सगळे गेल्यावर एकट्याच जळणार्या मयती..तिथे हंबरडा फोडणारे लोक.. हे सगळ खुप कमी वयात पाहिल्यामुळे मला खर्या अर्थाने आयुष्याची किंमत कळू लागलिये.......स्वतःच्या आणि दुसर्याच्यापण.