सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

Social security.

शिवाजी महाराज आणि Social security.

मदारी मेहतर नावाचा जातीने भंगी,वर्गाने दलित आणि धर्माने मुस्लिम असलेला एक छोटा मुलगा शिवाजी महाराजांना चाकणच्या किल्ल्याच्या दरवाजापाशी सापडला.5-6 वर्षांच कोवळ अनाथ पोरगं.संभाजीराजांपेक्षा 4-2 वर्षांनी छोटा.आपल्या पोराच्याच वयाच्या कोवळ्या मुलाला काय बर काम सांगावे.

शेवटी राजेंनी मदारी मेहतरला पोटच्या लेकराप्रमाणेच कायम जवळ ठेवायचा निर्णय घेतला..इतक कि , आग्रा भेटीसाठी वयाने लहान असलेल्या शंभूराजे प्रमाणेच मदारीलाही बरोबर घेतल..मदारीनेही महाराजांच्या सुटकेसाठी शंभूराजेंनी केला तसाच प्रयत्न देखील केला.

महाराजांनी 6 जून 1674 ला रायगडावर राज्याभिषेक केला..अठरापगड जातीतले , वेगवेगळ्या धर्मातले,लहान-थोर,सरदार, सैनिक,शिपाई जे जे स्वराज्यासाठी झटले त्यांचा सगळ्यांचा मानसन्मान झाला..मात्र मदारी मेहतर हा एकमेव तरुण होता ज्याने राजेंकडून सत्कार स्विकारला नाही.
तेव्हा राजेंनी मदारीला हक्काने कायतरी मागायची आज्ञा केली.

तेव्हा मदारी मेहतर म्हणाला , " महाराज माझ्यासारख्या अनाथाला आपण पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलत यापोक्षा अजुन मला काय पाहिजे ..?? जर काही द्यायचच असेल तर मला तख्ताची सेवा करायची संधी ध्या,पण ती ही वंशपरंपरेने द्या.छत्रपतिंच जे प्रेम माझ्या वाट्याला आल तेच प्रेम छत्रपतिंच्या घरापासुन माझ्या पुढील पिढ्यांना मिळत राहाव..मी रोज आपल्या आसनावर स्वच्छ धुतलेली चादर टाकायच काम करित आलो तेच काम माझ्या वंशजांना परंपरेने द्याव.बस्स एवढच मला पाहिजे बाकी काही नको. "

आजही सातार्याच्या गादीची सेवा करायला याच मदारी मेहतरचे वंशज आहेत.

त्या काळी राजे एखाद्यासाठी पिढ्यानपिढ्या चालणारा G.R द्यायला साहसा तयार होत नसत.याला ठराविक अपवाद आहेत.
परंतु मदारीची निस्वार्थी सेवा म्हनूनच महाराजांनी त्याला वंशपरंपरेने पदवी दिली.

अनाथांना सनाथ करणारे,दलितांना घरात नव्हे चुलीपर्यंत नेणारे आणि अस्पृशांना जेव्हा गावात घेतल जात नव्हत अशा काळात मदारीला कायम आपल्यासोबत सावलीप्रमाणे ठेऊन राजेंनी एक मोठ्ठ सोशल इंजीनियरिंग केल.

आता तर महाराजांच्या social securityची Hight बघा.

आपल्या या निष्ठावंत सेवकाची महाराजांनी रायगडावर समाधि बांधली.
समाधि संतांची असते,महापुरुषांची असते,राजाची असते,सरदाराची असते किंवा एखाद्या नेत्याची असते ; पण जगाच्या इतिहासात हे अस पहिल्यांदा घडले कि इथे स्वराज्यात चक्क एका सेवकाची समाधि बांधली गेली.ती सुद्धा स्वतः शिवाजी महाराजांनी बांधली.

माणसाला एका ठराविक पातळीपर्यंत पद , career पैसा , पत , प्रतिष्ठा हवी असते ; पण तिथुन पुढे काय ..??
मित्रांनो जरा विचार करा..आजच्या जगात असा कोणता असा उद्योगसमुह आहे का , कोणती अशी कंपनी आहे का जी आपल्या हाताखालच्या लोकांना अशी इतकी पिढ्यान पिढ्या टिकणारी social security देऊ शकते..??

शिवाजी महाराज आपल्याला माणसांमध्ये investment करायला शिकवतात .
आपल्याकडे सत्ता , संपत्ती , अधिकार काही असो किंवा नसोत माणसं आपल्याला पिढ्यान पिढ्या टिकतात..
शिवचरित्रातून शिकण्यासारख्या खुप सार्या गोष्ठी आहेत.वेळ मिळेत तसा अजुन लिहत राहिल.

जगण्याची देणी.

" बन गई ना हमारी गाड़ी ."
" गाड़ी नंबर बताइये."
"MH.12 •••• "
" अरे छोटे,जरा सुन तो,इस कस्टमर का गाडी निकालो,डिलीव्हरी देना है,ब्लॅक कलर का होंडा डिओ. "

ते छोट पोरगं आत वर्कशॅापमध्ये गाडी आणायला गेल..5 मिनीटांनंतर धावत पळत बाहेर आल.

" सेठ,गाड़ी अंदर नहीं है,आस्लम लेके गयेला है किधर तो. "
" उसकी माँ की ऐसी की तैसी..स्साला ••••••• एक घंटे से गायब है..टाइम पास करता है ."

शेठ वैतागले,खिशातून अॅपल iPhone 6 बाहेर काढला.
" स्साले , हरामसादे किधर है तु,तेरी बजह से कस्टमर कबसे रुकेला है. "
माझ्यासमोरच फोनवर त्याला दोन चार दमदार शिव्या हासडल्या..
" जरा रुकिये,बंदा आरेला है. " अस म्हणत मला थोडा वेळ wait कराव लागेल याबद्दल शेठजींने दिलगिरी व्यक्त केली.

थोड्या वेळानंतर तो मळकट कळकट कपडे घातलेला 17-18 वर्षांचा मुलगा गाड़ी घेउन आला..मी त्याच्याकडून चावी घेतली.एक राउंड ट्रायल मारुन पाहिली..व्हायब्रेशन,खट-खट खाड आवाज़ येण पुर्णपणे बंद झाल होत.

शेठला बील किती झाल ते विचारल..
फक्त फायबर बॅाडी फिटींगचच काम असल्यामुळे आणि मी regular customer असल्याने पैसे घेण्यास शेठजींनी नम्रपणे नकार दिला..गाडीच काम छान झालेल. मी त्यांना कमीत कमी पोरांच्या लेबर चार्जेस चे तरी पैसे घ्या अशी request केली.तरी शेठजी नकोच म्हणत होते.

आस्लम शेजारीज आमच बोलन ऐकत उभा होता..
त्याच्याकडे पाहून माझ मन क्षणभर सर्रकन 6 वर्षे माग गेल..
माझे कार गॅरेजवरचे दिवस मला आठवले.फुल टाइम, पार्ट टाइम अस मिळून 2 वर्षे गॅरेजवर घासलेले दिवस डोळ्यांसमोरुन तरळले..
मी तेव्हा 18-19चा असेल.
एक एक स्लाइल शो डोळ्यांसमोरुन जात होता.
2008-2009
अंगावरचे मळलेले कपडे,कळकटलेली जीन्स आणि टी-शर्ट.
अंगाचा येणारा अॅाइलचा विशिष्ट वास,
गॅरेजवर यु.पी,बिहार मधल्या भैयांबरोबर काढलेले दिवस.😁
स्पिडोमीटर वायर काढून ठेऊन कस्टमरच्या गाड्या कशा पिदडायचो,
कस्टमरच्या गाडीमध्ये बॅटरी डिसचार्ज होइपर्यंत ऐकलेली गाणी,
पेट्रोल कस ढापायचो,
ट्रायलच्या नावाखाली केलेला टाइमपास.
एका कस्टमरची गाडी ठोकलेली यामुळे बॅासची खाल्लेली बोलणी,
मी शिकाऊ असल्याने मिळनारा 1500/-रुपये पगार.😞
कस्टमरच्या गाड्या फिरऊन  college च्या गेटसमोरुन पोरींना follow करत मारलेल्या घिरट्या.😉
अशातच कधी कधी खुश झालेल्या कस्टमरकडून मिळालेली टीप.
टीप मिळाल्यावर किती खुश व्हायचो यार मी.😊

त्याच टीपच्या पैशातून शेजारच्या उडपी हॅाटेलात केलेला नाष्टा,तिथे कॅालेजची पोर आणि पोरी नाष्टा करायला यायच्या. वयाने माझ्याऐवढ्याच .
काही पोरी माझ्याकडे विचित्रपणेच पाहून हसायच्या,
मग मनात लड्डू फुटायचे ; पण नंतर स्वतःचा आवतार त्या रेस्टॅारंटमधल्या आरशात पाहिल कि वास्तवाच भान व्हायच..😁

सगळ चित्र डोळ्यांसमोर उभ राहिल.. क्षणभर मीच माझ्यात हरऊन गेलो.आस्लममध्ये मी हरवलेल्या स्वतःलाच शोधू लागलो.

खर तर जुने दिवस मी विसरुनच गेलेलो..ते आस्लममुळे आठवले. आस्लमकडे पाऊन नुसत गालातल्या गालात स्माइल केल.वॅालेटमधून त्याला 100/- रुपये काढून दिले..पोरगं खुश्श झाल.

परत घरी येताना सहजच गाडीच्या फ्यूल मीटरकडे लक्ष गेल. काटा बराच खाली आलेला..बहुतेक आस्लमने पेट्रोल ढापल असाव....

का कोणास ठाऊक ; पण राग येण्याऐवजी मला समाधान वाटल.
आत्तापर्यंत या जन्माने , या जगण्याने मला न मागताच खुप काही दिलय.आज त्याचीच परतफेड करायची संधी मिळाली.
या जगण्याची देणी जरा तरी फिटावीत याचाच प्रयत्न करतोय.

जियो मेरे यार...आस्लम..😊

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

Risk & Initiative

शिवाजी महाराज आपल्याला काय शिकवतात...???

आजची आपली यंग जनरेशन आणि छत्रपति शिवाजीमहाराज यात फक्त एकच बॅान्डिंग आहे.
छत्रपति शिवाजीमहाराज हे शब्द कानावर ऐकू आले कि आपण जय म्हनून रिकामे होतो,,आणि इथेच सगळ संपत.. शिवाजीराजे देव नव्हते , ते आपल्यासारखेच मनुष्य होते.

प्रॅाब्लम नसतात कुणाला..??..सगळ्यांनाच प्रॅाब्लम असतात,,अगदी शिवाजी महाराजसुद्धा खुप मोठमोठ्या प्रॅाब्लममध्ये सापडले होते..

१) ( Risk )
ज्या अफजलखानाने विजापुरात शहाजीराजांना अटक करुन धिंड काढलेली, ज्या अफजलखानाने कस्तुरीरंगन नावाच्या एका राजाला असच मैत्रीच अमिष दाखऊन कपटाने मारल,,ही अफजलखानामागची पार्श्वभूमि जिजाऊंनाही माहित होती ,, तरीही जिजाऊंनी अशा धोकेबाज अफजलखानाच्या भेटीला शिवाजीराजांना पाठवल,,अष्टप्रधान मंडळ आणि। जुनी जाणती माणसं नको म्हणत असताना पोटच्या पोराला अफजलखान भेटीसाठी पाठवणारी जिजाऊ ....अशा मानसिकतेच्या किती माता आहेत महाराष्ट्रात..??

आजकालच्या जगात आपल्याला मरायला अफजलखानाच्या समोर जायचे नाहिये, सांगायच ताप्तर्य हे कि बर्याच ठिकाणी बिंधास्त रिस्क घेतल्याशिवाय काही पर्यायच नसतो..अशा ठिकाणी आपल्यातली किती मराठी पोर रिस्क घ्यायला तयार असतात..आपण आपल्या आयुष्यातले बरेचशे निर्णय दुसर्यावर ढकलून देतो किंवा बर्याचदा आपण घेतलेले निर्णय दुसर्या कोणाच्या सांगण्यामुळे बदलतो...

आजच्या या वेगाने पसरत असलेल्या कार्पोरेट क्षेत्रात , नोकरी , व्यवसाय , बिजनेसमध्ये बरचस यश हे केवळ रिस्क घेण्याच्या मानसिकतेवरच अवलंबून असत,त्यामुळे वाळवंटातून आलेले मारवाड़ी समाज आणि पाकिस्तानमधून हाकलकऊन लावलेला सिंधी समाज आज प्रगति करत आहे.
पण आपल्याला आपल्या आईवडिलांनीच कम्फर्ट झोनमध्ये जगायची घाणेरडी सवय लाऊन ठेवलेली आहे,,या सवयी आपल्याला बदलल्याच पाहिजे...

२) Initiative ( पुढाकार )
मोठ व्हायच,,??,,, नाव कमवायचय...???
एकट्याच्या कष्टावर कोणीच मोठा होऊ शकत नाहीं,..त्यासाठी लागतात माणसं , अरे पण माणसं आपल्याकडे येणार कशी नुसता पैसा फेकून कोणी येत नसत...आणि। आलच तर माणसं टिकवण हे काय सोप्प काम नव्हे, त्यासाठी आपण स्वतः प्रेरणेचा स्रोत असल पाहिजे, लोकांनी आपल्यापासुन प्रेरणा घेतली पाहिजे, इथे उंटावर बसून शेळ्या हाकलून काय फायदा होणार नसतो....स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय काही काम होत नसतात.आपण स्वतः पुढाकार घेतला तरच आपल्या हाताखालची माणसं आपल्याला follow करतात.

आता थोड हे शिवाजीराजांच्या लाईफबरोबर मॅच करु....
अफजलखान दगाफटका करणारच हे राजे जाणून होते , पण तरीही ते स्वतः अफजलखानाला भेटायला गेले..
का गेले..??
राजे होते ते.
त्यांच्या एका आदेशावर कोणीतरी गेलच असत अफजलखानाला भेटायला..
मग राजांनी का अस केल..??...
का गेले ते अफजलखानाला स्वतः भेटायला...???

इथे राजांनी स्वतः पुढाकार घेतला त्यामुळेच तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिदसारखी माणसं राजांसाठी मरायला तयार होती..

शिवचरित्र हा नुसत डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नसून डोक्यात घेण्यासारखा विषय आहे...
शिवचरित्र आपणाला काय शिकवते,,जरा आपल स्वतःच आयुष्य शिवाजीराजे , संभाजीराजे आणि जिजाऊमॅासाहेब यांच्याबरोबर मॅच, कंपेअर करुन पहा..
शिवचरित्रातुन अजुन शिकण्यासारख्या खुप गोष्ठी आहेत.. ...वेळ मिळेल तसा लिहीत राहिल..

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

शिवाजी महाराज आणि शब्द .

मी शत्रुला फसवलय पण मित्राला फसवल्याच एकतरी उदाहरण दाखवा...{ छत्रपति शिवाजी महाराज }
फ्रेंडशिप डे च्या दिवशी मी ही post टाकलेली..त्याबद्दल थोडस खोल जाऊन अजुन लिहतोय.शिवाजी राजेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात मित्रांचा वापर करुन मित्रांना धोका दिल्याच एकही उदाहरण आख्ख्या शिवचरित्रात शोधूनही सापडनार नाही.

शत्रुपक्षातदेखील शिवाजी राजांनी माणसं जोडली.आणि ही माणसं टिकवण्यासाठी राजेंनी दिलेले शब्द पाळून प्रसंगी जीव धोक्यात घालून कशी टिकवली...याचाच एक किस्सा.

मिर्झाराजे जयसिंग यांच्या शब्दाला मान देउन राजे औरंगजेब बादशाहाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले.तिथे औरंगजेबाने राजेंवर चौकी पहारे बसउन त्यांना नजरकैदेत ठेवले.

सख्ख्या भावांना कैदेत टाकून त्यांची कत्तल करणारा,जन्मदात्या बापाला कैदेत टाकनार्या, धुर्त,कपटी औरंगजेबाच background पाहता तो शिवाजी राजेंबरोबर कपट करणार हे निच्छितच होत.त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग बुर्हानपुरात होते.सहाजिकच शिवाजी महाराजांच्या जिवाची काळजी घेण्याची जबाबदारी मिर्झाराजेंचा मुलगा रामसिंग यांच्यावर पडली.रामसिंगानेही आपली माणसं मोगली फौजेबरोबर चौकी पहार्यांवर नेमली.

पण आजुबाजूला सतत रामसिंगाची माणसं असल्याने औरंगजेबाला सिवाचा काटा काढन अवघड वाटू लागल.बराच खल झाल्यानंतर कपटी औरंगजेबाने फौलादखानास फर्मावले सीवाला राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जा.

 राजअंदाजखानच्या हवेलीत महाराजांना नेणे म्हणजे मृत्यू कुठल्याही क्षणी येणारच.
या हुकुमाची माहिती रामसिंहास समजली तो तडक औरंगजेबाचा बक्षी मुहम्मद अमीनखान याच्या कडे गेला. त्यास रामसिंह सरळ म्हणाला बादशाहने शिवाजी महाराजांना मारण्याचा विचार केला आहे पण शिवाजी महाराज तर आमच्या शब्दाव विश्वास ठेवून एवढ्या लांब आले आहेत त्यामुळे बादशाहने प्रथम मला ठार मारावे,माझ्या मुलाला ठार मारावे मग सीवाला ठार मारावे. अमीनखान तसाच औरंगजेबाकडे गेला आणि झालेले बोलणे जसेच्या तसे कथन केले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐकून घेतल्यावर औरंगजेब अमीनखानास म्हणाला रामसिंहास सांग सीवासाठी तू जामीन राहा. जर तो पळाला, काही बिघाड केला तर तू जबाबदार राहशील, असे तू लिहून दे. अमीनखानाचा निरोप मिळताच रामसिंह म्हणाला, ठीक आहे, मी जामीन राहतो. शिवाजी महाराज असे काही करणार नाही. घडलेला सगळा प्रकार रामसिंह याने महाराजांना येऊन सांगितला. दुसर्या दिवशी महाराज रामसिंहच्या डे-यात गेले आणि मी काहीही बिघाड करणार नाही असे वचन दिले.

महाराज आता रामसिंहास दिलेल्या शब्दातून सुटका करून घेण्याचा विचार करत होते. त्यांनी रामसिंहास बोलावले आणि त्यास म्हणाले तुझ्या शब्दाला खूप वजन असे मला वाटत होते. पण इथे बादशाहास वारंवार विनंती करून देखील काही उपयोग नाही.

तू बादशाहाकडे जाऊन सरळ सांग ह्या सीवाला तुम्ही सांभाळा. त्याला मारायचे तेव्हा मारा आता माझी जबाबदारी संपली पण इथे उलटेच झाले रामसिंह महाराजांना म्हणाला मी तुम्हाला सोडून जाणार नाही.

महाराजांनी परत औरंगजेबाकडे अर्ज केला मला रामसिंहाच्या  ताब्यात ठेवू नका. दुसरीकडे कुठेही हलवा यावर औरंगजेबाने उत्तर दिले रामसिंहासारखा निष्टावंत सेवक नाही म्हणून तिथेच राहावे. महाराजांना कसेही करून रामसिंहास दिलेल्या वचनातून मुक्त व्हायचे होते.

परत महाराजांनी रामसिंहास सांगितले बादशहास दिलेला जामीन अर्ज परत मागे घ्यावा. त्याला मला काय करायचे ते करु द्या. रामसिंहाने परत नकार दिला तो महाराजांना म्हणाला मिर्झा राजांना पत्र पाठवले आहे उत्तर येई पर्यंत थांबा.

18 August 1666 या दिवशी राजेंना विठ्ठलदास कोठडीमध्ये शिफ्ट करुन मारायचा प्लॅन होता.ही खबर राजांना एक दिवस अगोदर कळाली..

कपटी औरंगजेब काहीही करु शकत होता.पळून तर जायचय आणि रामसिंगाला दिलेला शब्दही पाळायचाय.अशा द्विधा मनस्थितीमध्ये राजे सापडले..रामसिंगांचा जामीन Active असताना राजेंनी पलायन केले असते तर रामसिंग तोंडावर पडले असते.

राजेंनी रामसिंगाबरोबर चर्चा करुन परिस्थिति समाझाऊन सांगून त्याला त्याचा जामीन अर्ज मागे घ्यायला सांगितला...औरंगजेबालाही हेच हव होत. औरंगजेबाने पुढे पहार्याची जबाबदारी पोलादखानावर सोपवली.

रामसिंगाने औरंगजेबास शिवाजी पळुन जाउ नये म्हनुन दिलेला जामीन अर्ज,माझ्याकडे असताना सिवा पळून जानार नाही याची घेतलेली जबाबदारी,रामसिंगाने औरंगजेबास दिलेला शब्द तसेच राजेंनी रामसिंगास दिलेला शब्द. अगोदर या सगळ्यामधून बाहेर पडुन मगच राजे 17 August 1666 यादिवशी कैदेतुन शिफातीने बाहेर पडले..

मैत्री कशी जपावी , एखाद्याला शब्द द्यावा आणि दिलेला शब्द कसा पाळावा ते शिवाजी राजेंकडून शिकाव.