बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

नेत्यांच्या मागे फिरणार्या कार्यकर्त्यांसाठी...

तुम्ही म्हणाल कि हा येडा नुसता इतिहासामध्येत का डुबलेला असतो..?? Winston Churchill म्हनतो " The longer you look back , further you can look forward.."
 ( तुम्ही जितक्या खोलवर पाठीमागे पाहू शकाल तितक्यात जास्त तुम्ही भविष्याकडे डोकाऊ शकाल..)
त्यामुळे इतिहासची वर्तमानाळाशी सांगड घालून आणि इतिहासामधला नेमका अर्क काढून तो समाजासमोर मांडून त्याचा समाजाच्या हितासाठी आणि नितिवान-चारित्र्यसंपन्न समाज घडवण्यासाठी कसा किती फायदा होइल याविषयी छोटासा प्रयत्न करण्यास मी जास्त जागरुक असतो.
 .
 " हम लाएंगे सिवा को , जिंदा या मुर्दा . "
विजापूरच्या दरबारात शिवाजीला पकडायला अफजलखानाने पैजेचा विडा उचचलला . १०,००० पायदळ , १२,००० घोडदळ , तोफा , उंट , हत्ती घेउन अफजलखान निघाला .
 .
पुण्यातला बारा मावळाचा मुलूख हा मूळचा अदिलशाहीचाच मुलूख होता .शिवाजीच्या कारवायांमुळे त्रस्त अदिलशहाने पुण्यातल्या बारा मावळांच्या देशमुखांना आणि सरदारांना अफजलखानाच्या फौजेबरोबर मिळून बंडखोर शिवाजीचा पुर्ण पराभव करण्याचा सक्त आदेश दिला होता . खोपडे , मोहिते , घोरपडें असे सरदार घाबरुन अलरेडी अफजलखानाला जाउन मिळाले होते .
 .
भोरजवळील कारी या गावचे कान्होजी जेधे(देशमुख) मुळचे अदिलशहाने वतनदार . कान्होजी जेधेंना सुद्धा अदिलशहाकडून मावळातल्या सर्व वतनदारांबरोबर अफजलखानास येऊन मिळा . शिवाजीचा पराभव करुन समूळ फाडशा पाडा . खानाच्या सांगण्यावरुन नंतर तुमची योग्यता वाढवली जाईल असच फर्मान आल..
 .
कान्होजी आपल्या पाच मुलांसह शिवाजी कडे आले . शिवाजीला मदत करायची म्हंटल तर सहाजिकच बादशहाकडून मिळालेल्या वतनावर पाणी सोडाव लागणार होत . शिवाजी ने कोन्होजीला अदिलशाहीच वतन सोडणार का याबद्दल विचारल , कान्होजी हो बोलले .
पण त्याकाळी वतन जहागिरी या गोष्ठी खुप प्रतिष्ठेच्या होत्या . वतन जहागिरी कोणी इतक्या सहज सोडत नव्हत .
शिवाजीने पुन्हा एकदा कान्होजीला विचारल कि , खरच तुम्ही बादशहाचे वतन सोडत आहात का . आम्ही ते खर कस मानाव .
 .
कान्होजीने एक तांब्या भरुन पाणी मागितल . हातात बेल-भंडारा घेउन खंडोबाची शपथ घेतली , तांब्या उलटा केला आणि पाणी शिवाजीच्या पायावर सोडल .
काय माणसं होती त्याकाळात . शिवाजीने कान्होजीला कुठल अमिश दाखवल नव्हत . तुला सरदारकी देतो , तुला पंचहजारी मनसबदार करतो , तुला जहागरी-वतन देतो . शिवाजीने मावळ्यांना केवळ विश्वास दिला आणि जपला . केवळ एक तांब्याभरुन पाण्याला साक्षी ठेउन एक ऐतिहासिक डील झाल..
 .
अफजलखान प्रकरणाच्या वेळेस कान्होजी जेधे इतक्यावरच थांबले नाहीत , त्यांनी बारा मावळांमधले सगळी देशमुख मंडळी , मारणे , शिळीमकर , बांदल , शितोळे , पायगुडे , पासलकर , जगतात , ढमाले असे लोक स्वराज्याच्या बाजूने उभे केले . पुढे या लोकांचा स्वराज्य विस्तारासाठी बराच उपयोग झाला.
 .
अफजलखान कपटी होता , त्याच्यापासून कान्होजीच्या कुटुंब कबिल्यास धोका झाला असता याबद्दल शिवाजी महाराज जाणून होते .
त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिने शिवाजी महाराज कान्होजीला पत्रामध्ये लिहतात , " वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुद्दा मनास आणणे. तसेच तुमचा काबिला कारीस आहे, तो ढमढेऱ्यांचे तलेगावास पाठवा . "
पुढे शिवाजी महाराज कान्होजीला शपथ देतात , " तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.”
 .
शत्रुपासून आपल्या माणसांच संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते.
शिवाजी महाराजांनी कान्होजीचा कुटुंब कबिला तळेगाव ढमढेरेला बाबाजी ढमढेरेंकडे पाठवायला लावला..
 .
नाहींतर आजकालच्या नेत्यांना फक्त लढाईच्याच वेळेसच कार्यकर्त्यांची आठवण येते , आजने नेते कार्यकर्त्यांच्या दुख:चसुद्धा राजकीय भांडवल करतात . नेते कार्यकर्त्यांना गरजू अज्ञानी लाचार कस ठेवता येइल याची खुप काळजी घेत असतात . सुडाच राजकारण सुरु झाल कि नेत्यांच्या भांडणामध्ये कार्यकर्त्यांचे कुत्रे हाल होतात . यात नेते सेफ असतात . इथ फक्त कार्यकर्त्यांचाच बळी जातो . परस्पर विरोधी पक्षांमधील कार्यकर्त्यांमधील भांडणाची आग सतत धडधडत ठेउन या आगीत स्वत:ची राजकीय डाळ शिजवण्यात नेते एक्सपर्ट असतात .
 .
मी वरती कान्होजी जेधेंचा उल्लेख केलाय . कान्होजी अदिलशाही सोडून स्वराज्यात आलेत . पुढे अफजलखान भेटीत आपल्या जीवाच काही बरवाईट झाल नंतर चिडलेल्या अदिलशाही सरकारकडून निच्छित सुडाच राजकारण होउन कान्होजी जेधेंच आणि त्यांच्या कुटुंबकबिल्याच काय होणार याची किती पुरेपूर कल्पना शिवाजी महाराजांना होती ते या प्रसंगामधून दिसून येते .
 .
मला सांगा आजचे किती नेते कार्यकर्त्यांवर अस इतक प्रेम करतात . आता तुम्ही म्हनाल कि अमुक तमुक नेता माझ्या सुख-दुख:त नेहमी सामिल होतो .
पण नुसत लग्न मयती वाढदिवस अॅटेंड करुन खरच भागत का हो..??
सत्य म्हनजे कार्यकर्त्यांची लग्न मयती वाढदिवस अॅटेंड करणे ही राजकारण्यांची केवळ एक राजकीय गरज असते .
 .
नेते देणग्या , वर्गणी आणि कार्यकर्त्यांना मटन दारु पार्ट्या देउन हजारो लाखो रुपये खर्च करतात पण ही त्यांची पॅालिटिकल इन्वेस्टमेंट असते , यात नेत्यांचे कार्यकर्त्यांच्या प्रति प्रेम बिम काय नसत...
 ( कार्यकर्त्यांवर खर्च केलेले पैसे नेत्याने कुठल्या मार्गाने कमवलेले असतात हे सगळ्याच कार्यकर्त्यांना चांगल्याप्रकारे माहित असते , तरी पण हे कुत्र्यासारखे मटन खायला आणि दारु प्यायला नेत्याच्या मागे मागे फिरत असतात हा भाग वेगळा.. )
 .
आता थोड चिंतन करु...
समझा एखाद्या कार्यकर्त्याच्या जीवाच काही बरवाइट झाल , राजकारणातून पोलिस केसेस अंगावर पडल्या , जेल झाली किंवा इतर काही कारणांमुळे कार्यकर्त्याचा इनकम सोर्स बंद झाला तर त्या कार्यकर्त्याचा प्रिय नेता त्याच्या घरी महिन्याचा किराणा माल भरुन देतो का..??
मुलांच्या शिक्षणाची फी भरतो का..??
घरात भाजीपाला आणून देतो का..??
घाराचे आणि बॅंक लोनचे थकलेले हफ्ते भरतो का..??
जस शिवाजीने कान्होजीच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तशीच एखादा नेता त्याच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेतो का..??
 .
तुम्ही कुठल्याही नेत्याचे कार्यकर्ते असूद्यात...
जशी शिवाजी महाराजांनी कान्होजीच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली तशी तुमचा नेता तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असेल तरच तुमच्या प्रिय नेत्याच्या मागे फिरा.
 ............ जर तुमचा प्रिय नेता तुमच्यासकट तुमच्या फॅमिलीची काळजी घेणारा आणि तुम्हाला सुरक्षितता देण्याच्या मानसिकतेचा नसेल तर योग्य वेळीच अशा लबाड धूर्त नेत्यांपासून दूर व्हा...
 ......अन्यथा नंतर तुमच्या हातात पच्छातापाशिवाय काहीच उरलेल नसेल..
 _____________________
.
संदर्भ - जेधे शकावली , जेधे करीना , सभासद बखर...

तडजोड करणारे शिवाजी महाराज

भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता.
झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता.
ताठ कणा हाच मराठी बाणा.
 .
अरे , पण कोण शिकवत हे सगळ..??
As per my information कुठला आभ्यासू माणूस हा असला उद्धटपणा कधीच कोणाला शिकवणार नाही.
 .
काही तरी गफलत होते आहे.
थोड क्रॅास लिहतोय.बघा पटतय का..
 .
म्हनजे शिवाजी राजांनी आयुष्यात कधीच कुठेच adjustment , compromise केल नाहीं का..??
आपण महापुरुषांना नको तितका मोठेपणा द्यायच्या नादात तद्दन तकलादू आणि खोटा स्वाभिमान जागृत करणार्या गोष्ठी समाजात पेरत आहोत. कध्धीच कोणासमोर न झुकणे compromise , adjustment आणि Co-operate न करणे या चुकीच्या अतिस्वाभिमानामुळे काहीच फायदा होत नसतो.
 .
प्रत्येक यशस्वी माणूस हा अपयशाच्या शेकडो पायर्या चढूनच यशस्वी झालेला असतो.सगळे दिवस सारखे नसतात.
Time is Powerfull.
कोणावर कधी आणि कशी वाइट वेळ येइल हे सांगता येत नाहीं.
आपल आयुष्य काय नि् महापुरुषांच आयुष्य काय , compromise , adjustment आणि co operate केल्याशिवाय आयुष्य जगन अशक्यच.प्रत्येक जन जीवनात कुठेतरी खाजील,अपमानित झालेलाच असतो.काही जन Share करतात तर काही जन या गोष्ठी सिक्रेट ठेवतात.
 .
शिवाजी महाराजांनी देखिल आयुष्यात खुप तडजोडी केल्या आहेत.
अफजलखान प्रकरण , पुरंदरचा तह आठउन पहा.पुरंदरचा तह झाला नसता तर कदाचित स्वराज्य तेव्हाच बुडाल असत.मुघल सरदार दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंह यांच्या नासधुसीपासुन रयतेला होणारा त्रास टाळण्यासाठी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला..( as a compramise )
तहानुसार रक्ताच पाणी करुन कमवलेले २३ किल्ले आणि कित्येक लाख रुपये उत्पंन्न असलेला प्रदेश मुघलांना द्यावा लागला.
 .
तहामधील कलमानुसार महाराजांना नाइलाजात्सव बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाव लागल.तिथे कैद भोगावी लागली..तिथे महाराजांनी मुघल मॅनेजमेंटबरोबर गोड गोड बोलून बरोबर गेलेल्या दोन-तीन हजार मावळ्यांना मुघलांच्या राज्यातून बाहेर पडण्यासाठीचे परवाने बादशहाकडून मिळवले .
जवळचे पैसे संपत आलेले त्यामुळे तेथील सावकार , व्यापार्यांकडून कर्ज पण घ्याव लागल.
 .
तिथून शिफातीने सुटून आल्यावर मुघलांच आक्रमण टाळण्यासाठी समझोता करुन ९-१० वर्षाच्या कोवळ्या पोराला शंभूराजाला मुघलांचा पंचहजारी मनसबदार म्हनुन औरंगाबादला शहजादा मुअज्जमकडे पाठवाव लागल.कारण त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे compromise करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.५ लाखांची फौज घेउन जर औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केल असत तर ते त्यावेळेस परवडल असत का..??
औरंगजेब तर दख्खनवर स्वारी करण्यासाठी उतावळा झाला होता .
 .
नंतरची दोन-तीन वर्षे महाराजांनी काही अॅक्टीविटी केल्याच दिसत नाहीं . ते सलग दोन-तीन वर्षे स्वराज्याची व्यवस्थित घडी बसवण्यातच व्यस्त होते .
पुढे औरंगजेबाबरोबर एकत्रपणे लढता येइल याच दृष्टिकोणातूनामुळे राजांनी शेजारील राज्य गोवळकोंड्याच्या ( हैद्राबाद ) कुतुबशहाबरोबर भेट घेउन चांगले संबंध बनवले.ज्यावेळेस राजे कुतुबशहाला भेटीसाठी गेले होते .
 .
पुढील काळात महाराजांनंतर संभाजीराजेंनीसुद्धा हाच कित्ता गिरवलेला दिसतोय.
ऐकेकाळी स्वराज्याच्या जिवावर उठलेल्या आदिलशाहीवर औरंगजेब चालुन आला त्यावेळेस आदिलशाही वाचविन्यासाठी संभाजी राजांनी विजापुरला फौजा पाठवल्या होत्या.कारण दख्खनेवर झालेल्या बलाढ्य औरंगजेबाच्या आक्रमनाला तोंड देण्यासाठी दक्षिण भारतातील कुतुबशाही,आदिलशाही आणि मराठा स्वराज्य यांनी एकत्र येण ही काळाची गरज होती.
 .
जे काही घडल ते इतिहासात घडून गेल ,
आता आपण आपल्या आजच्याबद्दल बोलू...
नोकरी,धंदा आणि कॅार्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असताना खुप adjustment , compromise आणि Co operate करावच लागत.याशिवाय नोकरीही टिकत नाही आणि धंदा तर नाहींच नाही.
तुम्ही जर बिजनेस करत असाल तर उधारी वसुल करताना पाठीचे कणे ताठ ठेउन बघा काय होतय ते.
जॅाबमध्येही यापेक्षा वेगळ काही नसत.अॅप्रायझल , पोस्टींग ,इन्क्रीमेंट,पगारवाढीसाठी पाठीचे कणे ताठ ठेउन सामोरे जा बर , बघा काय होतय ते.
 .
प्रत्येक वेळेस पाठीचे कणे ताठ ठेउन काम होत नसतात.त्यामुळे मी माझी काम करुन घेण्यासाठी मी सर्वप्रथम compromise , adjustment आणि co-operate हे प्राथमिक मार्ग वापरतो.आणि जर मला वाटल कि सिधी उंगलीसे घी नहीं निकलनेवाला है तेव्हा माझ्याकडे इतर पर्याय खुले असतातच.
 .
 ।। जय शिवराय ।।

रविवार, १५ मे, २०१६

मुनासिब चाचा.

संभाला कैद करायला दोन चार दिवसांत दिल्लीवरुन शाही पथक येइल तोपर्यंत संभावर लक्ष देणे गरजेचे होते . त्यामुळे दिलेरखान संभाजी राजांना कायम आपल्या नजरेसमोर ठेवत होता , दिलेरखानाच्या या वर्तवणूकीतला बदल संभाजी राजांना जाणऊ लागलेला. त्यावेळेस रायप्पा महार आणि ज्योत्याजी केसरकर यांनी गोसाव्याचा वेश घेउन दिलेरखानाच्या गोटात जाउन संभाजी राजांना दिलेरखानाच्या बेताबाबत पक्की माहिती दिली.

वेळ खूप कमी होता , लवकरात लवकर निसटून जाने गरजेचे होते.मोठी जोखिम घेउन शंभूराजे दिलेरखानाच्या तळावरुन गयाब झाले.या गडबडीत शंभूराजांचा कुटुंब कबिला तिथेच राहिला. आणि कैद झाला. इकडे खानाच्या तळावर शोककळा पसरली.

कर्तबगारी दाखवायला चांगली संधी आली आहे हे जाणून बालेखान नावाचा मूळचा विजापूरी सरदार दिलेरखानाच्या अदेशाची वाट न बघताच आपल्या तैनातीतले ५००० स्वार घेउन शंभूराजांना पकडण्यासाठी निघाला.शेवटी बर्याच पळापळीनंतर बालेखानाने शंभूराजांना गाठले.शंभूराजांबरोबर असलेल्या ५५ स्वारांपैकी निम्मे अधिक सोबती मारले गेले.शेवटी शत्रु सैन्याचा जोर आणि लोंढा इतका वाढला कि शंभूराजांना कैद झाली.शंभूराजे बालेखानाच्या तावडीत जिवंत सापडले.बालेखान आणि इतर सैनिकांनी शंभूराजांना दोरीने करकचून बांधून ठेवले.दोघांत बाचाबाची सुरु झाली.बालेखान शंभूराजांवर वार करणार तेवढ्यात पाठीमागून एक भाला आला आणि बालेखानाच्या पाठीत आरपार घुसला.

सगळे मुघल सैनिक बुचकाळ्यात पडले ; कारण बालेखानाला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून बालेखानाचा सख्खा चुलता मुनासिब चाचा होता.मुनासिब चाचाने बालेखानाचा मृतदेह पोटाशी कवटाळला आणि ढसतसा रडू लागला.पण मुनासिब चाचाच्या चेहर्यावर केलेल्या कृत्याबद्दल आजिबात पच्छाताप दिसत नव्हता.

मुनासिब चाचाचे सर्व साथीदार गोंधळात पडले.चाचाने एका परक्या शत्रु पक्षातील काफरासाठी आपला वारस आणि प्राणप्रिय मुलाला का मारल असेल हे कोडे कोणालाच उमगत नव्हते.शेवटी एका सैनिकाने धाडस करुन रागाने चाचाला विचारले , " चाचा , आपण एका काफरासाठी आपल्याच मुलाला का मारलत..?? "

मुनासिब चाचाने उत्तर दिले , " एका बालेखानाला मारल्या मुळे तुम्ही एवढे दु:खी झालात..?? मग मला एका गोष्ठीच उत्तर द्या , जेव्हा हा बदमाश दिलेरखान अथनी आणि तिकोट्याला भर रस्त्यात आपल्या हिंदू आणि मुस्लिम आया बहिनींची इज्जत लुटीत होता तेव्हा तुमची मर्दुमकी आणि हमदर्दी कुठे गेली होती.तेव्हा याच हरामखोर दिलेरखानाला जाब विचारण्यासाठी एकच जवामर्द हातात तलवार घेउन धावला होता.अरे तुमच्याच इस्लामी आया बहिनींची इज्जत वाचवविन्यासाठी अन्यायाविरोधात तलवार उचलनारा कोण होता तो..?? तो होता , शेर सिवाचा छावा शंभूराजा."

चाचांच्या या वक्तव्यावर तर सगळेच खाजील झाले.गोंधळून सगळ्यांनी विचारल , " चाचा , आखिर आप कहना क्या चाहते हो..?? "

" बस इतनाही कहना चाहते है हम.अग औरंगजेब का दिलेरखान जैसा एक मामूली सरदार यहाँ आकर हम पर इतने जुलूम करता है ,हमारी मॅंा बहेन बेटियोंकी इज्जत लूटता है तो एक बात सोचो , अगर औरंगजेब खुद यहाँ दख्खन मे आएगा तो क्या होगा..?? "

" बिलकुल दुरुस्त , चाचा." समोरील काही स्वार शिपाई गडी बोलले.

" मै यह खुदा कि कसम खाकर कहता हूँ कि आलम दुनिया में हम दख्खनी मुसलमानों के लिए सबसे बडा काफिर कौन हे तो वह औरंगजेब है.बादशहाने मराठ्यांच्या राज्यांचा नाश केल्यावर हा औरंगजेब गोवळकोंडा आणि विजापूर या दोन्ही सल्नतनी नष्ट करणार.हम ये कैसे भूल गए कि गेल्याच वर्षी पडलेल्या दुष्काळात मराठ्यांचा राजा शिवाजी याने विजापूरकरांना एक हजार बैलांवरुन धान्य पाठवले होते.औरंगजेबाने नव्हे.यासाठी शिवाजी चे राज्य टिकले पाहिजे आणि त्याचा वारस संभा हा जगला पाहिजे.और इसके लिए मै एक क्या मेरे हजारों बालेखान जैसे बेटें की बली देने के लिए तैयार हूँ.."

आणि मुनासिब चाचाने कमरेची कट्यार काढली शंभूराजांचे दोर कापून काढले.राजांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेउन म्हनाला , " जा बेटा संभू , त्या सिवावर मेहेरबानी करायला आम्ही तुला रिहा केला नाही.आम्हा दख्खनींची औरंगपासून हिफाजत करायला हा शेर सिवाचा छावा जिंदा राहिला पाहिजे... जा बेटे संभू , बेशक निकल जा."

ज्या शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे किल्ले प्रदेश बळकाउन एक प्रकारे बंडखोरीच केली.त्यांचे अफजल खान आणि इतर बरेच मातब्बार सरदार ढगात पाठविले आज त्याच विजापूरकरांनी शिवाजी च्या पोराला जीवदान का दिले..हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल.यालाच दूरदर्शी राजकारण म्हणतात.यामध्ये शिवाजी राजे तरबेज होते हे काही वेगळ सांगायला नकोच. औरंगजेबावर दबाव टाकण्यासाठी अलिकडे महाराजांनी दख्खनेत एक दबाव गट तयार करण्यात राजांनीच पुढाकार घेतला होता.त्यामुळे अदिलशाही आणि कुतुबशाही यांबरोबर मराठे सख्य राखून होते.
पुढी काळात शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाची दक्षिणेवर टोळधार पडल्यावर शंभूराजांनी अदिलशाही वाचवायचा खुप प्रयत्न केला हा याचाच एक भाग.
हा झाला एक राजकारणाचा भाग.तस पण मला राजकारण इतकस कळत नाहीं.
असो.......

एका बाजूला परधर्माचा मुस्लिम माणूस स्वतःच्या पोराला मारुन शंभूराजांना वाचवतो आणि दुसर्या बाजूला रक्ताच्या नात्यांच्या लोकांकडून शंभूराजांना पकडून दिल जात या गोष्ठी मनाला खुप खटकतात.

मियॅंाखान नावाच्या एका मुघल सरदाराने शंभूराजे दिलेरखानाच्या गोटातून पळन्यापुर्वी ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा महार यांकडे दिल्लीवरुन शंभूराजांना कैद करायला शाही पथक येत आहे याची योग्य वेळी माहिती दिली होती.मियॅंाखानने योग्य वेळी सावध केल्याने गडबडीत का होउना संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोटातून पळाले.याचा उल्लेख वरती आला आहे.

पण याच गडबडीत संभाजी महाराजांचा कुटुंब कबिला मागे राहिला आणि अलगत दिलेरखानाच्या कैदेत सापडला.शंभूराजांच्या भगिनी राणू आक्का , पत्नी दुर्गाबाई व कमळजा यांना बहादुर गडावर कैदेत ठेवण्यात आले.तिथे याच मियॅंाखानने या राजपरिवाराची जमेल तेवढी सेवा केली.
पुढे फितुरुने कैद झाल्यावर याच मियॅंाखानने तुळापूरच्या तळावर आपली बदली करुन घेतली . कैदेत असताना संभाजी महाराजांना मियॅंाखानने आपुलकीने खुप मदत केली. याची कुणकुण औरंगजेबाला लागल्यामुळे मियॅंाखानचा जीव धोक्यात आला.. आणि बिच्चारा प्राणास मुकला . याबद्दल मी पुढे सविस्तर लिहिन.....

बाकि तुम्हाला धर्मवीर वगैरे संभाजी महाराज जयंती च्या एक दिवस उशीरा शुभेच्छा......蟽Ⴊ(Àč䁨ॐ̴

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

किसना

प्रत्येक गावात अशी येडी गबाळी माणसं असतात . गावात हरिनाम सप्ताह , लग्न , गावजेवन , पूजा वगैरे काही कार्यक्रम असले कि हे लोक जेवन वाढने,पत्रावळ्या उचलने,भांडी घासने,खरकट झाडून काढणे अशी कामं अगदी मनापासून निस्वार्थीपणे करतात.

असच एक कॅरॅक्टर आहे आमच्या गावात.
किसना - वय वर्षे ५०+ , अंगात मळकट पांढरा टी शर्ट आणि गबाळा पायजामा , वाढलेली दाढी , पायात चार ठिकानी शिवलेली तुटकी चप्पल , शिक्षण अंगठेबहाद्दर.चेहर्यावर नेहमी स्माईल.😊

गेल्या रविवारी लग्न झाल माझ.त्यामुळे आठवडाभर गावातच होतो.पूजा झाली .गावच्या रिवाजाप्रमाणे गावजेवन ठेवलेल.रात्रि उशिरापर्यंत आख्ख गाव जेउन गेल.बरचस जेवन उरल.गावकीच्या मालकीच्या मोठमोठ्या भांड्यांचा ढीग लागलेला..किसनराव अजुन कुठे दिसले नव्हते.दुसर्या दिवशी सकाळी किसनराव घरी हजर.आईने त्याला उरलेल जेवन फेकून द्यायला सांगितल.आणि भांडी व्यवस्थित घासून ठेवायला सांगितली.या कामाचे किती पैसे द्यायचे किंवा घ्यायचे काहीच विषय झाला नाही.पण किसनरावांना मी लहान पणा पासून ओळखतो.अगदी एक वेळेसच्या जेवनाच्या मोबदल्यात हा माणूस दिवसभर काम करतो.कोणाला वाटल तर पाच दहा रुपये हातावर टेकवतात नाहीतर काहीच नाही.मी माझ्या आयुष्यात अजुनपर्यंत तरी एवढा निस्वार्थी माणूस पाहिलेला नाही..दुसर्या दिवशी दुपारी सहजच गावकीच्या धर्मशाळेत चक्कर मारली.गुपचूप आतमध्ये डोकावल. किसनरावांच काम अगदी मन लाउन सुरु होत.त्याला विचारल कि तु ही भांडी घासायच्या बदल्यात तुला माझ्या आईने किती पैसे द्यायच ठरवल आहे.तो म्हनाला देइल तेवढे घ्यायचे.मी वॅालेटमधून दोनशे रुपये काढले आणि त्याला दिले.आणि जाताना म्हनालो कि माझ्या आईला या पैशाबाबत काही बोलू नकोस.तिच्याकडून पण ती देइल तेवढे पैसे घे.अस म्हनुन त्याला बोलायलापण संधी न देता पानावलेल्या डोळ्यांनी झटकन बाहेर आलो.

गेली दहा वर्षे झाली मी गावात नसतो.एज्यूकेशन जॅाब मुळे इकड सिटीमध्येच असतो..एव्हना किसनाला मी विसरुनपण गेलेलो.
किती अजब असत ना जग आणि जगातली माणसं.तुम्ही काय न् मी काय.सगळे दहा दहा मिनिटात रंग बदलतात.पण दहा वर्षांपुर्वी मी गावात राहत असतानाचा किसना आणि आजचा किसना यात कसलाच काडीचाही बदल नाही झाला.

मी दहावीला असताना त्याची कित्योकदा टर उडवलेली मला आठवतय.त्याने कधीच कोणालाच साध्या एका शब्दानेपण प्रत्युत्तर दिलेल मला आठवत नाही.कोणी टिंगल केली टर उडवली कि फक्त मिश्किलपणे हसायचा.चेहर्यावर तेच हास्य.तोच निरागसपणा.आणि आपण स्वतःला शहाणे समझनारे त्याला येडा गबाळा ही पदवी बहाल करतो.

किसनाबाबत आठवडाभर खरच खुप अस्वस्थ वाटत होत.ऐकेकाळी त्याची टर उडवणारा मी.आज त्याच्या डोळ्यांत डोळे घालून नाही बोलू शकत.खुप अपराध्यासारख वाटतय.
गावासाठी बैलासारख काम करणारा माणूस.
मग स्वयंघोषित शहाण्या माणसांकडे हे गुण आहेत का..??
खरच सगळे लोक एखाद्याला इतक निष्ठूरपणे का वागवतात..??
आपण शहाणी माणसं ढेकून आहोत.
किती रक्त प्यायच एखाद्याच..??
कायतरी प्रमाण असत...

आपण त्याला स्वर्थासाठी कमी पैशात राबऊन घेउ शकतो पण दुसर्यांसाठी निस्वार्थीपणे राबन्यातच त्याच खर सुख-सामाधान लपलेल आहे.आपण कितीही ठरवल ना तरी त्याच्या त्या सुखात आपण कध्धीच वाटेकरी होउ शकत नाहीं.आपल्याला अस समाधानी जगण नाही जमनार पण आपण फक्त जळू शकतो अशा समाधानी जगन्यावर.

माझ्याकड आज छानस करियर असेल.सुखी वगैरे वैवाहिक जीवन असेल , प्रेमळ मित्र असतील , समाजात इज्जत प्रतिष्ठा स्टेटस वगैरे असेल. पण मी आज किसनासमोर हरलोय.
ही असली भोळी मानसं म्हणजे निरागसता भरलेल मंदिर असतात...यांना त्याचं जीवन सुखांव जगु द्यावे...हे शाहणे असूनही शाहन्या माणसांना कळत नाही.भन्नाट जगतो साला.. ह्यातच सगळं आलं.आयुष्याला मनमुराद मिठी मारून जगणाऱ्याला वेडं ठरवतं आपलं "शहाणं" जग!!

पण ज्याला गाव वेडा म्हणुन चिडवतं तोच मला सगळ्यात शहाणा मानुस वाटायला लागलाय.
पण ; अशा माणसांचा शेवट खुप वाइट होतो याचच राहून राहून वाईट वाटतय. 😞

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

बोहोनी

वॅावSSSS , खरच किती pretty वाटत ना आपण कोणासाठीतरी Lucky Person असल्यावर.

हायवेवरच्या एका निरा आणि सरबताच्या टपरीवर एकदा सरबत पिलेला.१० रु झाले.मी १०० ची नोट दिली.त्याच्याकडे सुट्टे नव्हते.
माझ्यासमोर गल्ला रिकामा करुन केविलवान तोंड करुन मला तो सरबतवाला विनवन्या करु लागला. " साहेब,बघा ना सुट्ट हायती का..?? बोहनीचा टाइम हाय."
मी त्याच्याकडे पाहून फक्त स्माइल केल,आणि त्याला विचारल , " किती झाले..?? "
" धा रुपये." तो उत्तरला.
मी सहज टपरीमध्ये डोकावल,मी येण्याअगोदरच नुकतीच त्याने टपरी उघडलेली. अजुन त्याची आवराआवरीच चाललेली.मीच त्याचा पहिला कस्टमर होतो.
अजुन त्याची घालमेल चालू होती.
" थोडा येळ थांबता का शेठ.मी म्होरच्या दुकानातन सुट्ट घिउन येतू."

शेवटी मला त्याची आगतिकता पाहून कसतरीच झाल.माझ्याशी तो शक्य तेवढ्या अबदीने बोलायचा प्रयत्न करत होता..कारण स्पष्ट होत.सकाळ सकाळी गिर्हाइकाबरोबर किरकीर व्हायला नको,पहिलाच व्यावहार उधारीचा नको.त्यामुळे दिवसभर धंद्याला नाट लागू शकते.

" एक आयडिया आहे ना राव." मी एकदम Excited होउन त्याला बोललो.
"आजिबातच सुट्टे नसतील तर ही शंभराची नोट तुमच्याकडेच ठेव. मी तासाभरात परत येउन माझे उरलेले ९० रुपये परत घेउन जातो."

१० रुपयाच्या सरबतासाठी मी त्याच्याकडे एक तासाच्या खोट्या बोलीवर १००रुपये ठेवले.एक तासानंतर मला तिथ येण खरच शक्य नव्हत.कारण मला त्या दिवशी खुप कामं होती.पुन्हा कधी त्या रोडने येण जाण होइल ते सुद्धा शक्य नव्हत.आणि कधी त्या रोडने गोलोच तर त्या ९० रुपयांची आठवण येइल कि नाही याचीची मला गॅरॅन्टी नव्हती. आणि मी तिथे नंतर कधीतरी गेलो तर तोच माणूस टपरीमध्ये असेल कि नसेल..??
किंवा मीच विसरलो तर..?? हे सगळ मला माहित असूनपण मी मुर्खासारखे तिथे ९० रुपये कुठल्या भरवशावर आणि का ठेवले हे माझ मलाच कळाल नाही.
माझ्यात व्यवहारिकपणा खुप कमी आहे याची मला जाणीव झाली.आणि इथुन पुढेही मी जर असाच ढिला हात सोडून मुर्खासारख वागलो तर माझी कध्धीच प्रगति होणार नाही.असे माझ्या खास मित्रांनी मला बोललेले शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले.

पण बाकि सरबत छान होता.कोल्हापुरात बागल चौकात एक सरबतवाला आहे.तिथे तीन वर्षांपुर्वी आम्ही सरबत पिलेला.त्याने एक वेगळाच फेव्हर शोधून काढलाय.लिंबू आणि कोकम मिक्स with सोडा..भारी लागतो.एकदा नक्की ट्राय करुन पहा..
मी तोच फेव्हर याच्याकडून घेतलेला.

असो....
काल दोन महिन्यांनंतर माझ त्या रोडने जाण झाल.का कुणास ठाउक पण सरबत प्यायची तीव्र इच्छा झालेली.त्याच टपरीसमोर थांबलो.टपरीतल्या माणसाने माझ्याकड पाहून मनमोकळेपणाने स्माइल केल.मी अॅार्डर द्यायला समोर जाणार तेवढ्यात माझा मोबाइल वाजला.बाजूला जाउन call receive केला.५-१० मिनिटे मोबाइल चालू होता.पुन्हा काउंटरजवळ गेलो.मला पाहून मी न सांगताच त्याने माझा आवडत्या फ्लेव्हरचा सरबत बनवलेला.त्याने अगदी आदरपूर्वक सरबताचा ग्लास पुढे केला.

त्याने मागच्या वेळेसचे १० रु आणि आत्ताचे १० रु या प्रमाणे मागील शंभराच्या नोटेमधले उरलेले ८० रुपये माझ्या हातावर ठेवत म्हनाला कि , " शेठ येत जावा कि असच अधन मधन बोहनीला."
मला जरा गोंधळल्यासारखच झाल.
" का रे..?? कशासाठी..?? " मी अच्छर्यचकित होउन विचारल.
" मागच्या टायमाला तुम्ही आलेला हिकड.त्यादिशी माह्या सगळा माल यक वाजूस्तवर संपला."
त्यादिवशी त्याच्या टपरीतली निरा एक वाजताच संपली.रोज पाच वाजता संपायची.सरबताची कस्टमर रोजच्यापेक्षा दुप्पट आले.त्याने पु्न्हा दुसर्या टपरीवरुन निरा मागउन घेतली.
एकंदरीत त्याला त्या दिवशी रोजच्यापेक्षा खुप फायदा झाला.

तिथुन निघताना मी खुप Happy होतो.
खर सांगू का..??
इतका आनंद मला जॅाब कन्फर्मेशनच्या वेळेस पण झाला नव्हता.
खरच खुप भारी and स्पेशल वाटत मला ज्यावेळेस माझ्यामुळे कोणीतरी happy असेल.

त्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मला असा खुप मोठा आर्थिक फटका वगैरे बसला नसता.मी ते ९० रुपये विसरुनसुद्धा गेलो होते.
त्यादिवशीच्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मी काय इतक मोठाही झालो नसतो.
पण फक्त ९० रुपयांतदेखील आपण दुसर्याला किती मोठ आनंद वाटू शकतो.याची मला प्रचिती आली.

सुख सुख आनंद आनंद आपण कशात शोधतो..??
इथे अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये तसेच इतरांच्या सुखात-आनंदात देखिल खुप खुप सुख-आनंद दडलेल आहे..तो मिळवता आणि वाटता आला पाहिजे....बस्स इतकच..

शेवटी शंकर-जयकिशनच एक गाण आठवल.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है
किसी की ...

(माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं ) \- (२)
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है

(रिश्ता दिल से दिल के ऐतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का ) \- (२)
के मर के भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है.

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

विधि-लिखित.

इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफर , डिपार्टमेंट चेंज या गोष्टी होतच राहतात.एखाद्या एम्प्लॅाइच डिपार्टमेंट चेंज झाल्यानंतर त्या एम्प्लॅाइला सगळ्या Formalities पुर्ण करुन नवीन डिपार्टमेंटला पाठवन खरच खुप डोकेदुखीच काम असत.काही जन समझदार असतात ते जातात.पण शक्यतो कोणी इतक्या सहज ऐकत नाही.मग कधी गोड गोड प्रेमाने बोलून,कधी धाक आणि कारवाईची भिती दाखऊन तर कधी जबरदस्ती करुन आणि प्रसंगी एम्प्लॅाइला मेंटली टॅार्चर करुन एम्पलॅाइजचे डिपार्टमेंट चेंज चे इश्शू H.R मोठ्या कुशलतेने हॅंडल करतात.

असच एका एम्पलॅाइची ट्रान्सफर अॅार्डर निघालेली. तो एम्पलॅाइ काही दुसर्या डिपार्टमेंटमध्ये जायल तयार होइना.बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट यांनी खुप समझावल त्याला ; पण तो नाही ऐकला.

आता ही केस टॅाप मॅनेजमेंटकडे गेली.सिनियर H.R मॅनेजर ने एम्प्लॅाइला सगळी परिस्थिति सांगितली.
नेमका मीच का या एम्प्लॅाइच्या प्रश्नावर उत्तर देताना H.R ने तुच कसा योग्य आहेस,तुझ्यातले प्लसपॅाईंट,तुझी कॅपेबिलीटी,म्हनुन तुझच कस ट्रान्सफरसाठी सिलेक्शन केल,सध्या तुझी त्या डिपार्टमेंटला कशी निकडीची गरज आहे या गोष्ठी H.R ने एम्प्लॅाइला अगदी तिखट मीठ लाउन गोड गोड बोलुन हरभर्याच्या झाडावर चढवले...
तरीही एम्प्लॅाइ ऐकेना.

शेवटी ट्रान्सफर वगैरे या गोष्ठी विधि लिखित कशा असतात याबद्दल H.R एम्प्लॅाइला श्रीकृष्ण जशी अर्जुनाला गीता सांगत असेल तशाच तत्वज्ञानाच्या सांगण्याच्या तोर्यात एक महाभारतातल example देउन सांगू लागला.
      परिक्षित नावाचा राजा होता.तो एकदा जंगलात शिकार करायला जातो.एका झाडाखाली महाऋषि सिमीका तपच्छर्येसाठी ध्यान लाउन बसलेले असतात.परिक्षित राजा त्या ॠषिंना ओळखत नाही.परिक्षित राजाला त्या ॠषिंची मस्करी करायचा मूड होतो.परिक्षित राजा एक मेलेला साप महाऋषि सिमीकांच्या गळ्याभोवती गुंडाळून ठेवतो.आणि तिथून निघून जातो.थोड्या वेळानंतर महाऋषि सिमीकांचा पुत्र श्रृंगी तिथे येतो.वडिलांची झालेली विटंबना त्याला सहन होत नाही.आणि तो शाप देतो कि ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या महाऋषि सिमीकांच्या गळ्यात मेलेला साप गुंडाळला असेल त्याचा सात दिवसांत सापांचा राजा तक्षक चावल्यामुळे मृत्यु होइल.

या शापाबद्दलची बातमी परिक्षित राजाकडे पोहचते.राजा खुप घाबरतो.पण राजपंडित राजाची समजूत घालतात कि सगळे ॠषि काही खरे नसतात.राजा तु निवांत रहा.आपण यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण करुन तुझा मृत्यु टाळू शकतो.राजा स्वतःला एका बंद रुममध्ये कोंडून घेतो.रुमला दरवाजे खिडक्या अशा बसवतो कि त्यातुन साप काय मुंगी सुद्धा आतमध्ये येउ शकत नाहीं.आणि आपल्या बाजूला सशस्त्र सैनिकांचा रात्ऱदिवस सतत जागता पहारा ठेवतो.अशाप्रकारे सहा दिवस पुर्ण होतात.यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण यातुन परिक्षित राजाच्या मनातले मृत्युबद्दलचे भय एव्हाना नाहिसे झालेले असते.आणि सातव्या दिवशी परिक्षित राजाला बोरं खायची इच्छा होते.सेवक रुममध्ये बोरांची टोपली घेउन येतात.बोर खात असताना एका बोरमध्ये राजाला एक छोटीशी आळी दिसते..ती आळी बोरामधून बाहेर पडते.थोड्या वेळात त्या आळीचा आकार हळूहळू वाढत जातो.आणि त्याचा तक्षक नाग बनतो.तक्षक नाग छोट्या आळीच रुप घेउन बोरातुन राजाच्या रुममध्ये आलेला असतो..नंतर त्या आळीपासुनच तयार झालेला तक्षक नाग परिक्षित राजाला चावतो.यातच परिक्षित राजाचा मृत्यु होतो.आणि मनातील मृत्युचे भय नाहिसे झाल्यामुळे नरिक्षात राजाला मोक्ष मिळतो.

परिक्षित राजाची गोष्ट संपल्यानंतर H.R पुन्हा मुळ मुद्द्यावर येतात.
हे बघ मित्रा...( श्रीकृष्ण स्टाइल )
हे ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्ठी विधि लिखित असतात रे..
आपण सगळे माध्यम आहोत.तो वर बसलाय ना तोच कर्ता करवता आहे.
माझच बघ ना. मी अगोदर अमुक तमुक शहरात अमुत तमुक ठिकानी होतो.आता इथ आलोय.
तु कितीही अडवण्याचा प्रयत्न कर.पण या घडणार्या गोष्ठी घडतातच.
एवढा मोठा कुरुसम्राट परिक्षित राजा आणि देव सुद्धा यातुन सुटले नाहींत तर तुम्ही आम्ही अतिसामान्य माणसं कोण..??
वगैरे.....वगैरे.....वगैरे.....

एवढी मोठी पुराण कथा आणि त्यातील परिक्षित,तक्षक,सिमिका ॠषि,श्रृंगी,विधि-लिखित,मोक्ष वगैरे सारखे अवजड शब्द ऐकून आता खरोखरच एम्प्लॅाइच डोक जड झालेल असत.त्याचबरोबर आपल्या विरोधालासुद्धा काहिच किंमत उरलेली नसून आता इथे आपली डाळ काही शिजनार नाही याचीही जाणीव एम्प्लॅाइला झालेली असते..एव्हाना एम्प्लॅाइ H.R कडे स्वतःहून ट्रान्सफर लेटर मागतो त्यावर मुकाट्याने सही करुन नवीन डिपार्टमेंटमध्ये जाण्याची मानसिक तयारी सुरु करतो.

अशा वेळेस बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट आणि टॅाप मॅनेजमेंट पुर्ण ट्रॅप लाऊन एकमेकांशी कनेक्ट राहुन मिळून शिकार करतात.H.R चे लोक एम्प्लॅाइला कन्व्हेन्स करताना काय काय सुपरलॅाजिक अकलेचे तारे तोडतील याचा काही नेम नसतो.कदाचित हे पुढील काळात एम्प्लॅाइसाठी मोक्ष वगैरे सारख्या फॅसॅलिटीज् सुद्धा शोधून काढतील.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

बेसिक कॅामनसेन्स & वेल एज्यूकेशन.

काहींना खुप अॅटिट्यूड असतो.माझ कधीतरी वर्षातून दोन तीनदा सिटी-बसने जाण येण होत.बसमध्ये असे काही महाभाग भेटतात ना कि डोक सुन्न होत.

एकदा हिंजवडी फेज-3 मधून घरी येत होतो.बस खचाखच फुल भरलेली आणि बरचशे लोक्स् उभे राहिलेले.माझ्याशेजारी एक आय.टी मधली मुलगी बसलेली.

आपण तिला सन्मानाने "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" म्हणूयात..

तिने स्काय ब्ल्यू कलरची जीन्स,पिंक कलरचा टी-शर्ट घातलेला.आणि कानात त्या पिंक टी-शर्टला मॅच होणारे झुमके पेंडंन्ट घातलेल,ब्युटी-पार्लरमध्ये जाऊन तीन चार हजार रुपये खर्च करुन तिने स्ट्रेचिंग केलेले केस मोकळेच सोडलेले.वार्याबरोबर तिचे केस माझ्या चेहर्यावर उडत होते.चेहर्यावर आणि पापनीच्या इथे कॅास्मेटिकचा थर दिसत होता. डोळ्यांवर तिच्या पर्सनॅलिटीला साजेसा असा नाजुक चष्मा होता. हातात अॅपल-आयफोन आणि कानात हेडफोन्स घातलेले..बसमध्ये इतक्या गर्दीत होणार्या घामाच्या वासमारीपासून तिने मारलेल्या परफ्यूममुळे माझ प्रोटोक्शन होत होत.

आम्ही दोघे उजव्या बाजूच्या जेन्ट्स् रोमध्ये बसलेलो.बसमध्ये खुप सारे जेन्ट्स् उभे होते.पण तिला कुणीच सीटवरुन उठवल नाही..बर्याचदा लेडिज सीटवर कोणी जेन्ट्स् बसल तर काही जणी खुन्नस देउन खुप अॅटिट्यूड दाखवतात..आणि अपमान करतात.
बसच्या पुढच्या दरवाजातून एक प्रेगनंट मुलगी आत आली.i think सातवा महिना असेल तिला..पाच दहा मिनीट ती उभीच राहिली.पण कुठेच सीट रिकामी झाली नाही.

तिने या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" कडे एक आशाळभूत आणि अपेक्षित नजरेने पाहिल..पण या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारख केल.समोर एक गरोदर मुलगी केव्हापासूनची उभी आहे. तिला आपण बसायला जागा द्यावी अस मला मनोमन वाटल. शेवटी मीच माझ्या सीट वरुन उठलो आणि त्या प्रेगनंट मुलीला बसायला जागा दिली.

अस म्हणतात कि एक स्त्रीच दुसर्या स्त्रीला समझून घेऊ शकते.किंवा स्त्रियांना एकमेकांच्या भावनांची कदर असते..मग या साध्या साध्या बेसिक कॅामनसेन्सच्या आणि माणूसकीच्या गोष्ठी या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल"ला का महत्त्वाच्या वाटत नसतील..??
मग या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने इतक "शिक्षण" घेऊन नक्की काय शिकल..??
हिच्यापेक्षा गावाकडच्या अशिक्षित अडानी अनपड पोरी लाखपट भारी.