सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

जगण्याची देणी.

" बन गई ना हमारी गाड़ी ."
" गाड़ी नंबर बताइये."
"MH.12 •••• "
" अरे छोटे,जरा सुन तो,इस कस्टमर का गाडी निकालो,डिलीव्हरी देना है,ब्लॅक कलर का होंडा डिओ. "

ते छोट पोरगं आत वर्कशॅापमध्ये गाडी आणायला गेल..5 मिनीटांनंतर धावत पळत बाहेर आल.

" सेठ,गाड़ी अंदर नहीं है,आस्लम लेके गयेला है किधर तो. "
" उसकी माँ की ऐसी की तैसी..स्साला ••••••• एक घंटे से गायब है..टाइम पास करता है ."

शेठ वैतागले,खिशातून अॅपल iPhone 6 बाहेर काढला.
" स्साले , हरामसादे किधर है तु,तेरी बजह से कस्टमर कबसे रुकेला है. "
माझ्यासमोरच फोनवर त्याला दोन चार दमदार शिव्या हासडल्या..
" जरा रुकिये,बंदा आरेला है. " अस म्हणत मला थोडा वेळ wait कराव लागेल याबद्दल शेठजींने दिलगिरी व्यक्त केली.

थोड्या वेळानंतर तो मळकट कळकट कपडे घातलेला 17-18 वर्षांचा मुलगा गाड़ी घेउन आला..मी त्याच्याकडून चावी घेतली.एक राउंड ट्रायल मारुन पाहिली..व्हायब्रेशन,खट-खट खाड आवाज़ येण पुर्णपणे बंद झाल होत.

शेठला बील किती झाल ते विचारल..
फक्त फायबर बॅाडी फिटींगचच काम असल्यामुळे आणि मी regular customer असल्याने पैसे घेण्यास शेठजींनी नम्रपणे नकार दिला..गाडीच काम छान झालेल. मी त्यांना कमीत कमी पोरांच्या लेबर चार्जेस चे तरी पैसे घ्या अशी request केली.तरी शेठजी नकोच म्हणत होते.

आस्लम शेजारीज आमच बोलन ऐकत उभा होता..
त्याच्याकडे पाहून माझ मन क्षणभर सर्रकन 6 वर्षे माग गेल..
माझे कार गॅरेजवरचे दिवस मला आठवले.फुल टाइम, पार्ट टाइम अस मिळून 2 वर्षे गॅरेजवर घासलेले दिवस डोळ्यांसमोरुन तरळले..
मी तेव्हा 18-19चा असेल.
एक एक स्लाइल शो डोळ्यांसमोरुन जात होता.
2008-2009
अंगावरचे मळलेले कपडे,कळकटलेली जीन्स आणि टी-शर्ट.
अंगाचा येणारा अॅाइलचा विशिष्ट वास,
गॅरेजवर यु.पी,बिहार मधल्या भैयांबरोबर काढलेले दिवस.😁
स्पिडोमीटर वायर काढून ठेऊन कस्टमरच्या गाड्या कशा पिदडायचो,
कस्टमरच्या गाडीमध्ये बॅटरी डिसचार्ज होइपर्यंत ऐकलेली गाणी,
पेट्रोल कस ढापायचो,
ट्रायलच्या नावाखाली केलेला टाइमपास.
एका कस्टमरची गाडी ठोकलेली यामुळे बॅासची खाल्लेली बोलणी,
मी शिकाऊ असल्याने मिळनारा 1500/-रुपये पगार.😞
कस्टमरच्या गाड्या फिरऊन  college च्या गेटसमोरुन पोरींना follow करत मारलेल्या घिरट्या.😉
अशातच कधी कधी खुश झालेल्या कस्टमरकडून मिळालेली टीप.
टीप मिळाल्यावर किती खुश व्हायचो यार मी.😊

त्याच टीपच्या पैशातून शेजारच्या उडपी हॅाटेलात केलेला नाष्टा,तिथे कॅालेजची पोर आणि पोरी नाष्टा करायला यायच्या. वयाने माझ्याऐवढ्याच .
काही पोरी माझ्याकडे विचित्रपणेच पाहून हसायच्या,
मग मनात लड्डू फुटायचे ; पण नंतर स्वतःचा आवतार त्या रेस्टॅारंटमधल्या आरशात पाहिल कि वास्तवाच भान व्हायच..😁

सगळ चित्र डोळ्यांसमोर उभ राहिल.. क्षणभर मीच माझ्यात हरऊन गेलो.आस्लममध्ये मी हरवलेल्या स्वतःलाच शोधू लागलो.

खर तर जुने दिवस मी विसरुनच गेलेलो..ते आस्लममुळे आठवले. आस्लमकडे पाऊन नुसत गालातल्या गालात स्माइल केल.वॅालेटमधून त्याला 100/- रुपये काढून दिले..पोरगं खुश्श झाल.

परत घरी येताना सहजच गाडीच्या फ्यूल मीटरकडे लक्ष गेल. काटा बराच खाली आलेला..बहुतेक आस्लमने पेट्रोल ढापल असाव....

का कोणास ठाऊक ; पण राग येण्याऐवजी मला समाधान वाटल.
आत्तापर्यंत या जन्माने , या जगण्याने मला न मागताच खुप काही दिलय.आज त्याचीच परतफेड करायची संधी मिळाली.
या जगण्याची देणी जरा तरी फिटावीत याचाच प्रयत्न करतोय.

जियो मेरे यार...आस्लम..😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा