रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

विधि-लिखित.

इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफर , डिपार्टमेंट चेंज या गोष्टी होतच राहतात.एखाद्या एम्प्लॅाइच डिपार्टमेंट चेंज झाल्यानंतर त्या एम्प्लॅाइला सगळ्या Formalities पुर्ण करुन नवीन डिपार्टमेंटला पाठवन खरच खुप डोकेदुखीच काम असत.काही जन समझदार असतात ते जातात.पण शक्यतो कोणी इतक्या सहज ऐकत नाही.मग कधी गोड गोड प्रेमाने बोलून,कधी धाक आणि कारवाईची भिती दाखऊन तर कधी जबरदस्ती करुन आणि प्रसंगी एम्प्लॅाइला मेंटली टॅार्चर करुन एम्पलॅाइजचे डिपार्टमेंट चेंज चे इश्शू H.R मोठ्या कुशलतेने हॅंडल करतात.

असच एका एम्पलॅाइची ट्रान्सफर अॅार्डर निघालेली. तो एम्पलॅाइ काही दुसर्या डिपार्टमेंटमध्ये जायल तयार होइना.बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट यांनी खुप समझावल त्याला ; पण तो नाही ऐकला.

आता ही केस टॅाप मॅनेजमेंटकडे गेली.सिनियर H.R मॅनेजर ने एम्प्लॅाइला सगळी परिस्थिति सांगितली.
नेमका मीच का या एम्प्लॅाइच्या प्रश्नावर उत्तर देताना H.R ने तुच कसा योग्य आहेस,तुझ्यातले प्लसपॅाईंट,तुझी कॅपेबिलीटी,म्हनुन तुझच कस ट्रान्सफरसाठी सिलेक्शन केल,सध्या तुझी त्या डिपार्टमेंटला कशी निकडीची गरज आहे या गोष्ठी H.R ने एम्प्लॅाइला अगदी तिखट मीठ लाउन गोड गोड बोलुन हरभर्याच्या झाडावर चढवले...
तरीही एम्प्लॅाइ ऐकेना.

शेवटी ट्रान्सफर वगैरे या गोष्ठी विधि लिखित कशा असतात याबद्दल H.R एम्प्लॅाइला श्रीकृष्ण जशी अर्जुनाला गीता सांगत असेल तशाच तत्वज्ञानाच्या सांगण्याच्या तोर्यात एक महाभारतातल example देउन सांगू लागला.
      परिक्षित नावाचा राजा होता.तो एकदा जंगलात शिकार करायला जातो.एका झाडाखाली महाऋषि सिमीका तपच्छर्येसाठी ध्यान लाउन बसलेले असतात.परिक्षित राजा त्या ॠषिंना ओळखत नाही.परिक्षित राजाला त्या ॠषिंची मस्करी करायचा मूड होतो.परिक्षित राजा एक मेलेला साप महाऋषि सिमीकांच्या गळ्याभोवती गुंडाळून ठेवतो.आणि तिथून निघून जातो.थोड्या वेळानंतर महाऋषि सिमीकांचा पुत्र श्रृंगी तिथे येतो.वडिलांची झालेली विटंबना त्याला सहन होत नाही.आणि तो शाप देतो कि ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या महाऋषि सिमीकांच्या गळ्यात मेलेला साप गुंडाळला असेल त्याचा सात दिवसांत सापांचा राजा तक्षक चावल्यामुळे मृत्यु होइल.

या शापाबद्दलची बातमी परिक्षित राजाकडे पोहचते.राजा खुप घाबरतो.पण राजपंडित राजाची समजूत घालतात कि सगळे ॠषि काही खरे नसतात.राजा तु निवांत रहा.आपण यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण करुन तुझा मृत्यु टाळू शकतो.राजा स्वतःला एका बंद रुममध्ये कोंडून घेतो.रुमला दरवाजे खिडक्या अशा बसवतो कि त्यातुन साप काय मुंगी सुद्धा आतमध्ये येउ शकत नाहीं.आणि आपल्या बाजूला सशस्त्र सैनिकांचा रात्ऱदिवस सतत जागता पहारा ठेवतो.अशाप्रकारे सहा दिवस पुर्ण होतात.यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण यातुन परिक्षित राजाच्या मनातले मृत्युबद्दलचे भय एव्हाना नाहिसे झालेले असते.आणि सातव्या दिवशी परिक्षित राजाला बोरं खायची इच्छा होते.सेवक रुममध्ये बोरांची टोपली घेउन येतात.बोर खात असताना एका बोरमध्ये राजाला एक छोटीशी आळी दिसते..ती आळी बोरामधून बाहेर पडते.थोड्या वेळात त्या आळीचा आकार हळूहळू वाढत जातो.आणि त्याचा तक्षक नाग बनतो.तक्षक नाग छोट्या आळीच रुप घेउन बोरातुन राजाच्या रुममध्ये आलेला असतो..नंतर त्या आळीपासुनच तयार झालेला तक्षक नाग परिक्षित राजाला चावतो.यातच परिक्षित राजाचा मृत्यु होतो.आणि मनातील मृत्युचे भय नाहिसे झाल्यामुळे नरिक्षात राजाला मोक्ष मिळतो.

परिक्षित राजाची गोष्ट संपल्यानंतर H.R पुन्हा मुळ मुद्द्यावर येतात.
हे बघ मित्रा...( श्रीकृष्ण स्टाइल )
हे ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्ठी विधि लिखित असतात रे..
आपण सगळे माध्यम आहोत.तो वर बसलाय ना तोच कर्ता करवता आहे.
माझच बघ ना. मी अगोदर अमुक तमुक शहरात अमुत तमुक ठिकानी होतो.आता इथ आलोय.
तु कितीही अडवण्याचा प्रयत्न कर.पण या घडणार्या गोष्ठी घडतातच.
एवढा मोठा कुरुसम्राट परिक्षित राजा आणि देव सुद्धा यातुन सुटले नाहींत तर तुम्ही आम्ही अतिसामान्य माणसं कोण..??
वगैरे.....वगैरे.....वगैरे.....

एवढी मोठी पुराण कथा आणि त्यातील परिक्षित,तक्षक,सिमिका ॠषि,श्रृंगी,विधि-लिखित,मोक्ष वगैरे सारखे अवजड शब्द ऐकून आता खरोखरच एम्प्लॅाइच डोक जड झालेल असत.त्याचबरोबर आपल्या विरोधालासुद्धा काहिच किंमत उरलेली नसून आता इथे आपली डाळ काही शिजनार नाही याचीही जाणीव एम्प्लॅाइला झालेली असते..एव्हाना एम्प्लॅाइ H.R कडे स्वतःहून ट्रान्सफर लेटर मागतो त्यावर मुकाट्याने सही करुन नवीन डिपार्टमेंटमध्ये जाण्याची मानसिक तयारी सुरु करतो.

अशा वेळेस बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट आणि टॅाप मॅनेजमेंट पुर्ण ट्रॅप लाऊन एकमेकांशी कनेक्ट राहुन मिळून शिकार करतात.H.R चे लोक एम्प्लॅाइला कन्व्हेन्स करताना काय काय सुपरलॅाजिक अकलेचे तारे तोडतील याचा काही नेम नसतो.कदाचित हे पुढील काळात एम्प्लॅाइसाठी मोक्ष वगैरे सारख्या फॅसॅलिटीज् सुद्धा शोधून काढतील.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

बेसिक कॅामनसेन्स & वेल एज्यूकेशन.

काहींना खुप अॅटिट्यूड असतो.माझ कधीतरी वर्षातून दोन तीनदा सिटी-बसने जाण येण होत.बसमध्ये असे काही महाभाग भेटतात ना कि डोक सुन्न होत.

एकदा हिंजवडी फेज-3 मधून घरी येत होतो.बस खचाखच फुल भरलेली आणि बरचशे लोक्स् उभे राहिलेले.माझ्याशेजारी एक आय.टी मधली मुलगी बसलेली.

आपण तिला सन्मानाने "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" म्हणूयात..

तिने स्काय ब्ल्यू कलरची जीन्स,पिंक कलरचा टी-शर्ट घातलेला.आणि कानात त्या पिंक टी-शर्टला मॅच होणारे झुमके पेंडंन्ट घातलेल,ब्युटी-पार्लरमध्ये जाऊन तीन चार हजार रुपये खर्च करुन तिने स्ट्रेचिंग केलेले केस मोकळेच सोडलेले.वार्याबरोबर तिचे केस माझ्या चेहर्यावर उडत होते.चेहर्यावर आणि पापनीच्या इथे कॅास्मेटिकचा थर दिसत होता. डोळ्यांवर तिच्या पर्सनॅलिटीला साजेसा असा नाजुक चष्मा होता. हातात अॅपल-आयफोन आणि कानात हेडफोन्स घातलेले..बसमध्ये इतक्या गर्दीत होणार्या घामाच्या वासमारीपासून तिने मारलेल्या परफ्यूममुळे माझ प्रोटोक्शन होत होत.

आम्ही दोघे उजव्या बाजूच्या जेन्ट्स् रोमध्ये बसलेलो.बसमध्ये खुप सारे जेन्ट्स् उभे होते.पण तिला कुणीच सीटवरुन उठवल नाही..बर्याचदा लेडिज सीटवर कोणी जेन्ट्स् बसल तर काही जणी खुन्नस देउन खुप अॅटिट्यूड दाखवतात..आणि अपमान करतात.
बसच्या पुढच्या दरवाजातून एक प्रेगनंट मुलगी आत आली.i think सातवा महिना असेल तिला..पाच दहा मिनीट ती उभीच राहिली.पण कुठेच सीट रिकामी झाली नाही.

तिने या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" कडे एक आशाळभूत आणि अपेक्षित नजरेने पाहिल..पण या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारख केल.समोर एक गरोदर मुलगी केव्हापासूनची उभी आहे. तिला आपण बसायला जागा द्यावी अस मला मनोमन वाटल. शेवटी मीच माझ्या सीट वरुन उठलो आणि त्या प्रेगनंट मुलीला बसायला जागा दिली.

अस म्हणतात कि एक स्त्रीच दुसर्या स्त्रीला समझून घेऊ शकते.किंवा स्त्रियांना एकमेकांच्या भावनांची कदर असते..मग या साध्या साध्या बेसिक कॅामनसेन्सच्या आणि माणूसकीच्या गोष्ठी या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल"ला का महत्त्वाच्या वाटत नसतील..??
मग या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने इतक "शिक्षण" घेऊन नक्की काय शिकल..??
हिच्यापेक्षा गावाकडच्या अशिक्षित अडानी अनपड पोरी लाखपट भारी.

रिअल हिरो

शाळा सुटतानाची वेळ.

बाहेर गेटसमोर चकचकीक कपडे घातलेले पालक उभे,प्रत्येक जण महागड्या कार घेऊन आलेला,काही बायका पण कारमध्येच with driver,किंवा कमीतकमी Activa तर असतेच असते..एकंदरीत सगळ्या पालकांची पर्सनॅलिटी एकदम "रिच".

प्रत्येक जन आपापल्या मुलाला-मुलीला घेऊन पार्किंगच्या दिशेने चालत असतो..एकाच वेळेस सगळ्या कार बाइक्स् बाहेर पडल्यामुळे सगळ ट्राफिक जॅम होत.

त्या ट्राफिकमधून मळक्या कपड्यातला एक माणूस.चेहर्यावर दाढीचे खुंट वाढलेले,पायात तुटकी चप्पल घातलेली,आपल्या मुलीला सायकलच्या नळीवरच्या छोट्याशा सीटवर बसऊन इतक्या ट्राफिकमधून वाट काढत जात असतो.

पण खर सांगू का..??

मला तर तोच माणूस " रिअल हिरो " वाटतो.