रविवार, १५ मे, २०१६

मुनासिब चाचा.

संभाला कैद करायला दोन चार दिवसांत दिल्लीवरुन शाही पथक येइल तोपर्यंत संभावर लक्ष देणे गरजेचे होते . त्यामुळे दिलेरखान संभाजी राजांना कायम आपल्या नजरेसमोर ठेवत होता , दिलेरखानाच्या या वर्तवणूकीतला बदल संभाजी राजांना जाणऊ लागलेला. त्यावेळेस रायप्पा महार आणि ज्योत्याजी केसरकर यांनी गोसाव्याचा वेश घेउन दिलेरखानाच्या गोटात जाउन संभाजी राजांना दिलेरखानाच्या बेताबाबत पक्की माहिती दिली.

वेळ खूप कमी होता , लवकरात लवकर निसटून जाने गरजेचे होते.मोठी जोखिम घेउन शंभूराजे दिलेरखानाच्या तळावरुन गयाब झाले.या गडबडीत शंभूराजांचा कुटुंब कबिला तिथेच राहिला. आणि कैद झाला. इकडे खानाच्या तळावर शोककळा पसरली.

कर्तबगारी दाखवायला चांगली संधी आली आहे हे जाणून बालेखान नावाचा मूळचा विजापूरी सरदार दिलेरखानाच्या अदेशाची वाट न बघताच आपल्या तैनातीतले ५००० स्वार घेउन शंभूराजांना पकडण्यासाठी निघाला.शेवटी बर्याच पळापळीनंतर बालेखानाने शंभूराजांना गाठले.शंभूराजांबरोबर असलेल्या ५५ स्वारांपैकी निम्मे अधिक सोबती मारले गेले.शेवटी शत्रु सैन्याचा जोर आणि लोंढा इतका वाढला कि शंभूराजांना कैद झाली.शंभूराजे बालेखानाच्या तावडीत जिवंत सापडले.बालेखान आणि इतर सैनिकांनी शंभूराजांना दोरीने करकचून बांधून ठेवले.दोघांत बाचाबाची सुरु झाली.बालेखान शंभूराजांवर वार करणार तेवढ्यात पाठीमागून एक भाला आला आणि बालेखानाच्या पाठीत आरपार घुसला.

सगळे मुघल सैनिक बुचकाळ्यात पडले ; कारण बालेखानाला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून बालेखानाचा सख्खा चुलता मुनासिब चाचा होता.मुनासिब चाचाने बालेखानाचा मृतदेह पोटाशी कवटाळला आणि ढसतसा रडू लागला.पण मुनासिब चाचाच्या चेहर्यावर केलेल्या कृत्याबद्दल आजिबात पच्छाताप दिसत नव्हता.

मुनासिब चाचाचे सर्व साथीदार गोंधळात पडले.चाचाने एका परक्या शत्रु पक्षातील काफरासाठी आपला वारस आणि प्राणप्रिय मुलाला का मारल असेल हे कोडे कोणालाच उमगत नव्हते.शेवटी एका सैनिकाने धाडस करुन रागाने चाचाला विचारले , " चाचा , आपण एका काफरासाठी आपल्याच मुलाला का मारलत..?? "

मुनासिब चाचाने उत्तर दिले , " एका बालेखानाला मारल्या मुळे तुम्ही एवढे दु:खी झालात..?? मग मला एका गोष्ठीच उत्तर द्या , जेव्हा हा बदमाश दिलेरखान अथनी आणि तिकोट्याला भर रस्त्यात आपल्या हिंदू आणि मुस्लिम आया बहिनींची इज्जत लुटीत होता तेव्हा तुमची मर्दुमकी आणि हमदर्दी कुठे गेली होती.तेव्हा याच हरामखोर दिलेरखानाला जाब विचारण्यासाठी एकच जवामर्द हातात तलवार घेउन धावला होता.अरे तुमच्याच इस्लामी आया बहिनींची इज्जत वाचवविन्यासाठी अन्यायाविरोधात तलवार उचलनारा कोण होता तो..?? तो होता , शेर सिवाचा छावा शंभूराजा."

चाचांच्या या वक्तव्यावर तर सगळेच खाजील झाले.गोंधळून सगळ्यांनी विचारल , " चाचा , आखिर आप कहना क्या चाहते हो..?? "

" बस इतनाही कहना चाहते है हम.अग औरंगजेब का दिलेरखान जैसा एक मामूली सरदार यहाँ आकर हम पर इतने जुलूम करता है ,हमारी मॅंा बहेन बेटियोंकी इज्जत लूटता है तो एक बात सोचो , अगर औरंगजेब खुद यहाँ दख्खन मे आएगा तो क्या होगा..?? "

" बिलकुल दुरुस्त , चाचा." समोरील काही स्वार शिपाई गडी बोलले.

" मै यह खुदा कि कसम खाकर कहता हूँ कि आलम दुनिया में हम दख्खनी मुसलमानों के लिए सबसे बडा काफिर कौन हे तो वह औरंगजेब है.बादशहाने मराठ्यांच्या राज्यांचा नाश केल्यावर हा औरंगजेब गोवळकोंडा आणि विजापूर या दोन्ही सल्नतनी नष्ट करणार.हम ये कैसे भूल गए कि गेल्याच वर्षी पडलेल्या दुष्काळात मराठ्यांचा राजा शिवाजी याने विजापूरकरांना एक हजार बैलांवरुन धान्य पाठवले होते.औरंगजेबाने नव्हे.यासाठी शिवाजी चे राज्य टिकले पाहिजे आणि त्याचा वारस संभा हा जगला पाहिजे.और इसके लिए मै एक क्या मेरे हजारों बालेखान जैसे बेटें की बली देने के लिए तैयार हूँ.."

आणि मुनासिब चाचाने कमरेची कट्यार काढली शंभूराजांचे दोर कापून काढले.राजांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेउन म्हनाला , " जा बेटा संभू , त्या सिवावर मेहेरबानी करायला आम्ही तुला रिहा केला नाही.आम्हा दख्खनींची औरंगपासून हिफाजत करायला हा शेर सिवाचा छावा जिंदा राहिला पाहिजे... जा बेटे संभू , बेशक निकल जा."

ज्या शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे किल्ले प्रदेश बळकाउन एक प्रकारे बंडखोरीच केली.त्यांचे अफजल खान आणि इतर बरेच मातब्बार सरदार ढगात पाठविले आज त्याच विजापूरकरांनी शिवाजी च्या पोराला जीवदान का दिले..हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल.यालाच दूरदर्शी राजकारण म्हणतात.यामध्ये शिवाजी राजे तरबेज होते हे काही वेगळ सांगायला नकोच. औरंगजेबावर दबाव टाकण्यासाठी अलिकडे महाराजांनी दख्खनेत एक दबाव गट तयार करण्यात राजांनीच पुढाकार घेतला होता.त्यामुळे अदिलशाही आणि कुतुबशाही यांबरोबर मराठे सख्य राखून होते.
पुढी काळात शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाची दक्षिणेवर टोळधार पडल्यावर शंभूराजांनी अदिलशाही वाचवायचा खुप प्रयत्न केला हा याचाच एक भाग.
हा झाला एक राजकारणाचा भाग.तस पण मला राजकारण इतकस कळत नाहीं.
असो.......

एका बाजूला परधर्माचा मुस्लिम माणूस स्वतःच्या पोराला मारुन शंभूराजांना वाचवतो आणि दुसर्या बाजूला रक्ताच्या नात्यांच्या लोकांकडून शंभूराजांना पकडून दिल जात या गोष्ठी मनाला खुप खटकतात.

मियॅंाखान नावाच्या एका मुघल सरदाराने शंभूराजे दिलेरखानाच्या गोटातून पळन्यापुर्वी ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा महार यांकडे दिल्लीवरुन शंभूराजांना कैद करायला शाही पथक येत आहे याची योग्य वेळी माहिती दिली होती.मियॅंाखानने योग्य वेळी सावध केल्याने गडबडीत का होउना संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोटातून पळाले.याचा उल्लेख वरती आला आहे.

पण याच गडबडीत संभाजी महाराजांचा कुटुंब कबिला मागे राहिला आणि अलगत दिलेरखानाच्या कैदेत सापडला.शंभूराजांच्या भगिनी राणू आक्का , पत्नी दुर्गाबाई व कमळजा यांना बहादुर गडावर कैदेत ठेवण्यात आले.तिथे याच मियॅंाखानने या राजपरिवाराची जमेल तेवढी सेवा केली.
पुढे फितुरुने कैद झाल्यावर याच मियॅंाखानने तुळापूरच्या तळावर आपली बदली करुन घेतली . कैदेत असताना संभाजी महाराजांना मियॅंाखानने आपुलकीने खुप मदत केली. याची कुणकुण औरंगजेबाला लागल्यामुळे मियॅंाखानचा जीव धोक्यात आला.. आणि बिच्चारा प्राणास मुकला . याबद्दल मी पुढे सविस्तर लिहिन.....

बाकि तुम्हाला धर्मवीर वगैरे संभाजी महाराज जयंती च्या एक दिवस उशीरा शुभेच्छा......蟽Ⴊ(Àč䁨ॐ̴

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

किसना

प्रत्येक गावात अशी येडी गबाळी माणसं असतात . गावात हरिनाम सप्ताह , लग्न , गावजेवन , पूजा वगैरे काही कार्यक्रम असले कि हे लोक जेवन वाढने,पत्रावळ्या उचलने,भांडी घासने,खरकट झाडून काढणे अशी कामं अगदी मनापासून निस्वार्थीपणे करतात.

असच एक कॅरॅक्टर आहे आमच्या गावात.
किसना - वय वर्षे ५०+ , अंगात मळकट पांढरा टी शर्ट आणि गबाळा पायजामा , वाढलेली दाढी , पायात चार ठिकानी शिवलेली तुटकी चप्पल , शिक्षण अंगठेबहाद्दर.चेहर्यावर नेहमी स्माईल.😊

गेल्या रविवारी लग्न झाल माझ.त्यामुळे आठवडाभर गावातच होतो.पूजा झाली .गावच्या रिवाजाप्रमाणे गावजेवन ठेवलेल.रात्रि उशिरापर्यंत आख्ख गाव जेउन गेल.बरचस जेवन उरल.गावकीच्या मालकीच्या मोठमोठ्या भांड्यांचा ढीग लागलेला..किसनराव अजुन कुठे दिसले नव्हते.दुसर्या दिवशी सकाळी किसनराव घरी हजर.आईने त्याला उरलेल जेवन फेकून द्यायला सांगितल.आणि भांडी व्यवस्थित घासून ठेवायला सांगितली.या कामाचे किती पैसे द्यायचे किंवा घ्यायचे काहीच विषय झाला नाही.पण किसनरावांना मी लहान पणा पासून ओळखतो.अगदी एक वेळेसच्या जेवनाच्या मोबदल्यात हा माणूस दिवसभर काम करतो.कोणाला वाटल तर पाच दहा रुपये हातावर टेकवतात नाहीतर काहीच नाही.मी माझ्या आयुष्यात अजुनपर्यंत तरी एवढा निस्वार्थी माणूस पाहिलेला नाही..दुसर्या दिवशी दुपारी सहजच गावकीच्या धर्मशाळेत चक्कर मारली.गुपचूप आतमध्ये डोकावल. किसनरावांच काम अगदी मन लाउन सुरु होत.त्याला विचारल कि तु ही भांडी घासायच्या बदल्यात तुला माझ्या आईने किती पैसे द्यायच ठरवल आहे.तो म्हनाला देइल तेवढे घ्यायचे.मी वॅालेटमधून दोनशे रुपये काढले आणि त्याला दिले.आणि जाताना म्हनालो कि माझ्या आईला या पैशाबाबत काही बोलू नकोस.तिच्याकडून पण ती देइल तेवढे पैसे घे.अस म्हनुन त्याला बोलायलापण संधी न देता पानावलेल्या डोळ्यांनी झटकन बाहेर आलो.

गेली दहा वर्षे झाली मी गावात नसतो.एज्यूकेशन जॅाब मुळे इकड सिटीमध्येच असतो..एव्हना किसनाला मी विसरुनपण गेलेलो.
किती अजब असत ना जग आणि जगातली माणसं.तुम्ही काय न् मी काय.सगळे दहा दहा मिनिटात रंग बदलतात.पण दहा वर्षांपुर्वी मी गावात राहत असतानाचा किसना आणि आजचा किसना यात कसलाच काडीचाही बदल नाही झाला.

मी दहावीला असताना त्याची कित्योकदा टर उडवलेली मला आठवतय.त्याने कधीच कोणालाच साध्या एका शब्दानेपण प्रत्युत्तर दिलेल मला आठवत नाही.कोणी टिंगल केली टर उडवली कि फक्त मिश्किलपणे हसायचा.चेहर्यावर तेच हास्य.तोच निरागसपणा.आणि आपण स्वतःला शहाणे समझनारे त्याला येडा गबाळा ही पदवी बहाल करतो.

किसनाबाबत आठवडाभर खरच खुप अस्वस्थ वाटत होत.ऐकेकाळी त्याची टर उडवणारा मी.आज त्याच्या डोळ्यांत डोळे घालून नाही बोलू शकत.खुप अपराध्यासारख वाटतय.
गावासाठी बैलासारख काम करणारा माणूस.
मग स्वयंघोषित शहाण्या माणसांकडे हे गुण आहेत का..??
खरच सगळे लोक एखाद्याला इतक निष्ठूरपणे का वागवतात..??
आपण शहाणी माणसं ढेकून आहोत.
किती रक्त प्यायच एखाद्याच..??
कायतरी प्रमाण असत...

आपण त्याला स्वर्थासाठी कमी पैशात राबऊन घेउ शकतो पण दुसर्यांसाठी निस्वार्थीपणे राबन्यातच त्याच खर सुख-सामाधान लपलेल आहे.आपण कितीही ठरवल ना तरी त्याच्या त्या सुखात आपण कध्धीच वाटेकरी होउ शकत नाहीं.आपल्याला अस समाधानी जगण नाही जमनार पण आपण फक्त जळू शकतो अशा समाधानी जगन्यावर.

माझ्याकड आज छानस करियर असेल.सुखी वगैरे वैवाहिक जीवन असेल , प्रेमळ मित्र असतील , समाजात इज्जत प्रतिष्ठा स्टेटस वगैरे असेल. पण मी आज किसनासमोर हरलोय.
ही असली भोळी मानसं म्हणजे निरागसता भरलेल मंदिर असतात...यांना त्याचं जीवन सुखांव जगु द्यावे...हे शाहणे असूनही शाहन्या माणसांना कळत नाही.भन्नाट जगतो साला.. ह्यातच सगळं आलं.आयुष्याला मनमुराद मिठी मारून जगणाऱ्याला वेडं ठरवतं आपलं "शहाणं" जग!!

पण ज्याला गाव वेडा म्हणुन चिडवतं तोच मला सगळ्यात शहाणा मानुस वाटायला लागलाय.
पण ; अशा माणसांचा शेवट खुप वाइट होतो याचच राहून राहून वाईट वाटतय. 😞