शनिवार, ३० मे, २०१५

दळण

"बोलो गुप्ताजी,क्या हाल है ." जिन्यातुन धपाधप पावल टाकीत जिना चढणार्या गुप्तांना मी एका पायावर उभ राहुन दुसर्या पायात शूज घालत असताना विचारल .

" कुछ नहीं , हम अभी आ रहे हैं  जॅाब से."

"कहा निकल रही है सवारी..??" मला डोक्यापासुन पायापर्यंत निरखत त्यांनी विचारल.

" जी , दळण दळने जा रहा हूँ ." मला हिंदी शब्द आठवेणात,मी गडबडीत आठवले स्टाइल मध्ये उत्तरलो.

"क्या क्या क्या...??"

"कुछ नहीं,यु ही दोस्त के पास जा रहा हूँ ."

मी वेळ मारुन नेली... जाता जाता गुप्ताजी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.त्यांना मी काय म्हनालो ते नेमक काय ते कळालच नाहीं.
गुप्ताजींनी मी काय उत्तरलो हे दोघातीघांना विचारल पण माय गुड लक . थॅंक्स् गॅाड.

गुप्ताजीं "दळण दळने जा रहा हूँ" हे वाक्यच विसरुन गेलेत.ते भलतच कायतरी विचारतात.मराठीमध्ये ते काय विचारतायेत हेच धड कळत नाही.

लेकिन कुछ ना कुछ तो पुछनेवाली खास बात है हे त्यांच्या लक्षात आलय ,आणि ज्यावेळेस गुप्ताजींना  "दळण दळने जा रहा हूँ" इसका मतलब हिंदी और मराठी में मतलब क्या होता हैं, याबद्दल कळेल त्यावेळेस माझ्या इज्जतीचा भाजीपाला होणार हे नक्की.
मी पोरींसारख दळण दळून आणतो हा मुद्दा घेऊन मला चिडवायची एकही संधी सोडनार नाहीत.

गुप्ताजी शॅाक्स् , आय अॅम रॅाक्स्.

गुरुवार, २८ मे, २०१५

बच्चू

शूजपॅालिशसाठी वेटिंगला उभा होतो.खुप घाईत होतो.एक एक मिनीट थांबनही जड वाटत होत.
माझे शूज पॅालिश करायला घेनार तेवढ्यात एक साधी राहनीमान असलेला , साधारण चाळीशीच्या आसपास वय असनारा , सर्वसामान्या वाटनारा माणूस फाटक्या-तुटक्या चप्पल,बुट,सॅंडलचे तीन-चार जोड घेउन आला.जास्त पैसे मिळउन देनार काम असल्यामुळे सहाजिकच दुकानदाराने माझ्याअगोदर त्याच काम करायला हातात घेतल.

दुकानदाराच्या शेजारीच बसलेला तो.अगदी त्याचा बिजनेस पार्टनर असल्यासारख.मी खुप वैतागलो जवळपास माझा अर्धा तास त्या माणसामुळे वाया जानार होता.मी बाईकवर बसलेलो,माझा संयम शक्य तेवढा टिकउन त्या खाली जमीनीवर बसलेल्या माणसाकडे गॅागलच्या काळ्या काचांमधुन शक्य तेवढ्या तुच्छतेच्या नजरेने पाहत मनातल्या मनात म्हंटलो.

 " कहाँ कहाँ से चले आते हैं ."

त्याच काम झाल.इतका वेळ तो एकही शब्द बोलला नव्हता माझ्याशी.काय माहित मला बोलावस वाटत होत पण मी सुद्धा बोललो नाही.
जाताना खुप कृतज्ञपणे तो बोलला , " सॅारी हा बाळा,माझ्यामुळे तुला खुप त्रास झाला."
मला माझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारख वाटल.
कसतरीच वेड-वाकड तोंड करुन मी म्हंटलो , " इट्स् ओको ."

दुकानदाराने माझ शूज पॅालिश करायला सुरुवात केली , मी सहजच डावीकडे वळून पाहिल , i'm Shocking , दुकानापासुन 100 फूट अंतरावर त्या माणसची "Audi" उभी होती with Driver.आणि तो माणूस गाड़ीमध्ये बसत होता अर्थात मागच्या सीटवर.

दुकानासमोर सिग्नलला गाडी थांबली,त्याने पॅावर विंडोने काच खाली घेतली.अजुनही तो माणूस माझ्याकडे कृतज्ञतेनेच आणि स्माईल करुन पाहत होता.

त्याचा अवतार,हसरा चेहरा , साधी-सुधी राहनीमान , सौम्य भाषा,बायको-मुले,आईवडील यांच्या फाटक्या चप्पला,बूट आणि सॅंडल्स स्वतः रिपेअरिंगला घेउन येण्याच अॅटीट्यूड , दुकानदाराशेजारीच मांडी घालून बसणार्या , पन्नास लाखांची कार वापरनार्या , गाड़ी 100 फुट अंतरावर पार्क करनार्या , मला बाळा म्हननार्या त्या "मोठ्या" माणसाबद्दल मी मनातल्या मनात काय काय नको नको ते बोललेलो मला आठवल.

गाड़ी अजुनही सिग्नलला उभीच होती.मी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ मलाच खुप "तुच्छ" असल्यासारख वाटल...

अजुन खुप बच्चू आहे मी....

बुधवार, २७ मे, २०१५

ब्ला...ब्ला...ब्ला...😊

___________Incoming Call___________

ती : हाय सर...गुड मॅार्निंग ,आय अॅम नेहा , टॅाकिंग फ्रॅाम ••••• बॅंक..कॅन आय स्पीक टू विनायक सर..??
मी : ह्ममममम,, बोला.
ती : सर,तुम्ही लकी कस्टमर आहात आणि आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड अॅाफर करत आहोत..ही तुमच्याशी बोलण्यासाठी योग्य वेळ आहे का...??
मी : हो.
ती : तुम्ही •••• इथे जॅाब करता ना.??
मी : हो.
ती : तुमच पॅकेज •••• एवढ आहे ना..??
मी : हो.
ती : तुमच Salary account ••••• बॅंकेत आहे ना.??
मी : हो
 ती : आम्ही तुम्हाला Coral Credit card देत आहोत..,मी कार्डबद्दल information सांगतिये,व्यवस्थित ऐका..
या कार्डसाठी तुम्हाला.. 500/- annually changes पडतील....आम्ही तुम्हाला 1 लाख ते 1.50 पर्यंत credit limit देत आहोत...तुम्हाला आम्ही 2000 Points Free देत आहोत.. हे कार्ड वापरुन monthly 5 movie tickets buy one get one free मिळऊ शकता...एरोप्लेन आणि ट्रेन टिकिटवर •••%discount मिळेल...जर तुम्ही पहिल्या तीन महिन्यात •••• रूपयांची शॅापिंग केली तर तुम्हाला आमच्या बॅंकेकडून एक टाय गिफ्ट मिळेल..आणि annually charge मध्ये 100% discount मिळेल...every Friday ••••• पिझ्झा मध्ये ••% discount मिळेल............ब्ला......ब्ला......ब्ला....ब्ला.......ब्ला.
मी : हो का.
ती : मी तुमच्याकडे documents collect करण्यासाठी एक्झिकिटीव्हला कधी पाठऊ..??..टेन वर्किंग डेज् मध्ये तुम्हाला कार्ड मिळेल..
मी : नाही,,नको,,नो थॅंक्स् , माझ्याकडे already तुमच्या बॅंकेच क्रेडिट कार्ड आहे.
ती : ह्ममम

__________Call end __________

बिच्चारीच तोंड कस झाल असेल.

फक्त,, मला नकोये,अस म्हंटल तर ; का नको याचही Clarification द्याव लागत..
सुरवातीला अहो वगैरे रिस्पेक्टिव्ह बोलनार्या पोरी नंतर अरे तुरे करुन खुशाल गप्पा मारतात..
नंतर मुळ विषयावर येऊन एकदा वापरुन तर पहा,खुप छान अॅाफर आहे.

आणि पुन्हा ...... ब्ला....ब्ला......ब्ला......ब्ला....ब्ला....

सोमवार, २५ मे, २०१५

कोल्हा आणि कावळा

बिघडलेल्या वोडाफोन बिल पे मशीनच्या बाहेर..मोबाइलमध्ये डोक खुपसून net banking वर bill payसाठी unsuccessful try करत होतो.
सहज उजवीकडे पाहिल तर ती माझ्याकडे पाहुन स्माइल करत होती..कदाचित मला तसा भास झाला असेर अस समझून...मी पुन्हा मोबाइलमध्ये डोक खुपसल.

5-10 मिनीटांनंतर...
आता तर ती चालत चालत माझ्याच दिशेने येत होती.माझी चुळबूळ चालू झाली.
नाही ती माझ्याकडे येत नसेल आणि माझ्याकडे पाहतही नसेल, मी माझी स्वतःचीच समजूत काढत होतो.
मी आजुबाजूला पाहिल.मी एकटाच होतो.मग नक्कीच ही पोरगी माझ्याकडेच येत असनार.

 " प्लीज,मला बिल भरायला मदत करशील का.."
 " नाही ना मशिन बंद आहे,मीच नेट बॅंकींगवर ट्राय करतोय..पण सक्सेस होत नाहिये."
 " मग माझ पण बिल भर , मी तुला cash देइल ." ( ओळख ना पाळख.)
 " नाही होतये , net slow आहे ना."
 " शर्ट छान आहे तुझा." माझ्या कडे स्माइल करुन पाहत ती मला म्हनाली
" हो का." ( दिल गार्डन गार्डन हो गया )
 " तु गोरा आहेस ना,,म्हनुन तुला खुप सूट करतोय." ( what's..?? मी इतका गोरागोमटा आहे , हे मला आजच कळाल..)
मनात एव्हाना लड्डू फुटायला सुरवात झाली होती ; पण तस न दाखवता मी तिला Thanks म्हनालो.
 " माझ्याकडेची आहे असाच शर्ट , फक्त डिजाइनमध्ये थोडासा चेंज आहे ."
 " By the way मी मृणाल. " तिने शेक हॅंड करत हात पुढे केला.
 " मी विनायक. " तिचा मऊ हात हलकासा दाबत मी माझ introduction करुन दिल..
 " काय करतोस तु,,clg कि Job...???"
माझ्याकडूनही तिला same question विचारला गेला...
तिथेच बराच वेळ आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत उभे होतो... माझा mobile no मागत होती..मी तिला नंबर देण्यास नकार दिला.त्यामुळे तिनेच एका कार्डवर मला तिचा मोबाइल नंबर लिहून दिला..
तुझा contact number आहेच ना माझ्याकडे , मी तुला कॅाल करिन.आपण नंतर नक्की भेटू , अस Promise करुन मी तिला good bye केल.

मला लहानपणी शिकलेली छान छान गोष्टींच्या पुस्तकातली कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवली.
एका झाडावर कावळा बसलेला असतो , त्याच्या तोंडात पुरी असते..तेवढ्यात त्या झाडाखाली एक कोल्हा येतो..कावळ्याच्या तोंडातली पुरी पाहून कोल्ह्याच्या तोंडाला सुटत...पण पुरी मिळवणार कशी...??
मग कोल्हा झाडावर बसलेल्या कावळ्याची स्तुति करतो.अरे कावळेदादा तु किती छान गातोस रे,,कुठे होतास इतके दिवस..?? खुप दिवस झाले मी तुझ गाण ऐकल नाही...प्लीज माझ्यासाठी एक गाण गा ना...
मग कावळा कोल्ह्याने केलेल्या स्तुतिमुळे पाघळतो.. गाण गाण्यासाठी तोंड ( चोच ) उघडतो...कावळ्याची काव-काव सुरु होते..पुरी झाडाखाली बसलेल्या कोल्ह्यासमोर पडते....

मी कपाळावर हात मारुन घेतला ; कारण ती पोरगी एका •••••• बॅंकेत क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमध्ये जॅाब करत होती.....

माझा कावळा होता होता वाचला...

शुक्रवार, २२ मे, २०१५

attitude

अगदी सहजपणे बोलुन गेला तो ,काही खास अस नसल्यासारख , " माझ्या दोन्हीही किडन्या फेल आहेत , एक लहानपणापासुनच आणि दुसरी आत्ता एक वर्षांपुर्वी झाली . आठवड्यातुन दोनवेळा डायलिसीस कराव लागत . "

आणि माझी एक बावळट मैत्रिन , मला तिची दर्दभरी दास्तान सांगत होती , "मी जीवनाला खुप कंटाळलीये , मला मरावस वाटत , माझ कोणीच नाहिये...वगैरे . वगैरे..."

कारण तिच Boyfriend बरोबर भांडन झालेल.

सोमवार, १८ मे, २०१५

राबनारे हात आणि यशस्वी माणूस.

तुम्ही कोणीही असोत...

राजकारणी,उद्योजक , बॅास , मॅनेजर , employee...किंवा अजून कोणितरी.

यशाच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही पोहचला असाल , आणि जर तुम्हाला टिकून राहायचे असेल तर ज्या शिडीने तुम्ही वर चढून आलात त्या शिडीला कध्धीच लाथ मारु नका ,कारण आकाशाची ऊंची गाठायच्या प्रयत्नात मातीचा आधार सोडायचा नसतो.

काहीच ठराविक माणसं मोठी होतात.
शून्यातुन विश्व निर्माण करतात.हे सगळ एकटा करु शकतो का...???

हे सगळ टीम वर्क असत.एखाद्याच्या यशामागे शेकडो राबते हात असतात.त्या राब राब राबणार्या माणसांनाही माहित असत कि,आपल्याला मिळणार्या यशामुळे मान-सन्मान मिळनार नाही ; पण त्या माणसांच्या मनात समाधान असत . कि एका चांगल्या कामात आपण सहभाग घेतलाय.कोणासाठीतरी आपण जीव ओतुन काबाडकष्ट करतोय .

माणसांना जगताना अजुन हव काय असत यार...???
मोबदल्यापेक्षा सामाजिक स्थैर्य ( social security ) महत्वाच....

मी अस म्हनत नाहिये कि मिळणार्या यशामध्ये तुम्ही राब राब राबनार्या लोकांना  भागीदार करुन घ्या . ते राबनारे लोकही तशी अपेक्षा ठेवत नाहीत . तुम्हाला सपोर्ट करण्यातच ते स्वतःला भाग्यवान समझतात.

पण तुमच सुद्धा एक कर्तव्य बनत.

फक्त याची जाणीव ठेवा कि कोणीतरी आपल्यासाठी खुप कष्ट केलेत . आपल असन किंवा नसन ते केवळ आपल्या हाताखालच्या लोकांमुळेच आहे.
जी माणसं आपल्यासाठी देह-भान,तहान-भूक विसरुन निस्वार्थीपणे मैलों मैल चाललीत त्या माणसांसाठी जास्त नाही फक्त एक मैल चालायची तयारी ठेवा.

काम करणार्या माणसांना इतर स्वरुपात कामाचा मोबदला मिळतोच मिळतो.
पण ज्या सर्वोच्च स्थानावरिल व्यक्तिकडुन कृतज्ञतापुर्वक आपल्या कामाची दखल घेतली जाते , प्रेमाने दोन शब्द बोलले जातात , ही कृतज्ञता आणि ते प्रेमाने बोललेले दोन शब्द लाखो रुपयांच्या पॅकेजपेक्षा श्रेष्ठ ठरतात.

मला नाहीं वाटत कि मिळालेल भलमोठ्ठ सक्सेस कोणी एकटा पचऊ शकेल.

आपण काय कमवल आणि काय गमावल याच मोजमाप आपण किती माणसं जोडली(टिकवली) तसेच आपल्याला किती माणसं सोडुन गेली यावर ठरवल जात....

शनिवार, १६ मे, २०१५

तिला शोधतोय...

त्या मित्राने मला विचारल मला , " ए , काय रे..?? त्या भीक मागणार्या भिकार्या मुलीकडे अस का बघतोयेस..?? कि प्रेमात बिमात पडला कि काय तिच्या..?? "
मी स्माईल केल , त्याला वाटल कि मी " हो " बोलतोय.
तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला...

हो , पडतो प्रेमात आपण कशाच्यातरी, कोणाच्यातरी,त्यात काय एवढ..??

एका डायनिंग हॅालमध्ये जेवण करत होतो.दुपारची एकदम शांत वेळ.अधुन-मधून कोकिळेचा कुहू-कुहू आवाज येत होता.त्याचबरोबर लांबून कुठूनतरी लेडिजचा गाण्याचा आवाज येत होता,फक्त आवाज,या दोन आवाजांच छान combination जमलेल.
ऐकाव आणि ऐकतच रहाव अस वाटत होत. त्याला संगीताची,बॅकग्राऊंड म्युसिकची कशाकशाचीच जोड नव्हती.
इतका छान कि अस वाटत होत दूर कुठेतरी टेपरेकॅार्डर,लाऊडस्पीकर लावलाय.गाण कोणत होत ते इतकस नाही आठवत पण बहुतेक दळण दळताना म्हनतात ते जात्यावरच गाण असाव.

आवाज हळूहळू मोठा आणि जवळ जवळ येत होता.माझ्या हातातला घास हातातच राहिला.मी स्तबध आणि बेभान होऊन ऐकू लागलो.जसजसा आवाज जवळ जवळ येत होता तसतशी माझी उत्सुकता वाढत होती.
आता तर अगदीच जवळून दहा-बारा फुटांवरुन गाण्याचा आवाज येत होता,पण मध्ये ट्रक पार्किंग केल्यामुळे आणि भिंत असल्यामुळे माझी नजर तिथपर्यंत पोहचत नव्हती.

तस गाण्याबद्दल मला विशेष अस काही कळत नाही.
शाळेत आठवी-नववीला असताना हरिपाठ भजन-किर्तनाचा नाद होता.इतकीच माझी गाण्याबद्दलची पार्श्वभूमि.

ती गाण म्हननारी जर इंडियन आयडॅाल,सारेगमप अशा रिअॅलाटी शोच्या आॅडिशनला गेली असती तर आॅडिशन्स घेणार्यांने तिला गुणवत्ता पाहुन,गाण ऐकून 100% सिलेक्ट केल असत ; पण इथे सिलेक्शन करताना दुर्दैवाने कलागुण न पाहता स्पर्धकाचे कपडे,अवतार,मेक-अप,फॅन्सीपणा पाहिला जातो.हीच मोठी शोकांतिका आहे.

डायनिंग हॅालच्या दरवाजासमोर ती आली.
ती एक भीक मागणारी मुलगी होती.
अजंठा पिच्चरमधल्या सोनाली कुलकर्णीसारखाच तिचा अवतार होता.
गाण अजुन चालुच होत.तिथल्या एका वेटरने दिला एक-दोन रुपये चिल्लर देण्यासाठी खिशात हात घातला ; पण तिने पैसे न घेता नम्रपणे खुनेनेच चपाती -भाजी ची मागणी केली.मी पाहतच राहिलो,4-5 मिनीटे गाण चालु होत.इतका वेळ गाण ऐकण्यात कसा गेला ते कळालसुद्धा नाही.
गाण गात गातच ती निघून गेली.जशी ती दुर दुर जात होती तसतसा आवाज कमी कमी होत होता....


ती गेली तिचा आवाजही येईनासा झाला.पण अजुनही तो आवाज कानामध्ये घुमतोय.
काम माहित पुन्हा कधी तो मधुर आवाज , ते गाण ऐकायला मिळेल..??
यावेळेस त्या आवाजाबरोबर कोकिळेच combination नसल तरीही चालेल.

But i want listen .याच चौकात कुठेतरी ती मला गाणं गाताना दिसेल. अजुनही मनात एक वेडी आशा आहे .

हे मी माझ्या मित्राला कस समझाऊन सांगू..??

शोकेसमधल्या बाहुल्या.

1 BHK , 2 BHK फ्लॅट आहे का..??
कार आहे का..??
मुलाची Salery आणि income मजबूत आहे ना..??
तरच हे लग्न शक्य आहे.

24-25 वर्षांच्या मुलाकडुन लग्नाच्यावेळी एवढ्या अपेक्षा..??
काय जीव घेता काय आमचा..??
अरे म्हातारड्यांनो.तुम्ही समझता काय रे स्वत:ला..??
आधी स्वतःकडे पहा ना एकदा , तुमच स्वतःच घर वयाच्या कितव्या वर्षी झाल ते.
आणि हो , मुलींच्या आया समझतात काय स्वतःला..??
तुम्हीच नवर्याच्या डोक्यात प्रोग्रॅम डाउनलोड करता ना..??

जरा दुसरीकडे जरा वेगळ्या प्रकारे डोक चालवा ना.
मुलामुलींच्या नक्की अपेक्षा काय आहेत. मुलाच career development & कर्तबगारीच्या बाबतीत जरा नीट निरीक्षण करा.

आज एखाद्या मुलाकडे फ्लॅट , कार नसेलही ; पण येणार्या काळात त्या मुलाच्या प्रगतिचा रेशो कसा असेल याचा आढावा घ्या.

लक्षात घ्या , Success काय असच सहज मिळत नाहीं.
आणि तुमची मुलगी एखाद्या मुलाच्या आयुष्यात गेल्यावर ती त्या मुलाच्या यशामधील भागीदार असणारये.
तिला आयत्या घरात शोभेची बाहुली बनउन नवर्या मुलाकडे पाठऊ नका.

तिला स्ट्रगल करायला शिकवा..ज्याप्रमाणे तुम्ही मुलाकडुन अपेक्षा ठेवता ना अगदी तसच....

शुक्रवार, १५ मे, २०१५

कॅाफी , पेरु आणि बरच काही .....

TATA Starbucks नावाच्या कॅाफीशॅापमध्ये दरवाजा उघडुन मी आतमध्ये एन्ट्री केली,,एसीची थंड झुळक आणि तिथल्या स्टापमधल्या सुंदर मुलींनी स्मितहास्य करुन स्वागत केल . मेन्युकार्ड न पाहताच मी अॅार्डर दिली , " एक रेग्युलर हॅाट कॅाफी ."

5-10 मिनीटांत टिपीकल मराठी मुलगी अॅाडर घेउन आली . पाहताक्षणी रिच वाटणारी,डोळ्यांवर महागडा चष्मा, जवळ आली त्यावेळेस परफ्युमचा सुगंध दरवळला,चेहयावर कॅास्मेटिक्सचा थर वाटत होता,चेहयावरुन ती एखाद्र्या सुखवस्तु घरातली वाटत होती . क्षणभर वाटल हीच असेल ती जगातली सर्वात समाधानी मुलगी.

एकटाच होतो,,,काउंटरशेजारच्याच टेबलवर बसलेलो,,कॅाफी पीत पीत सहजच तिला तिच्या जॅाब प्रोफाइलबद्दल विचारल,,तिने तिची दर्द भरी दास्तान सांगायला सुरवात केली , " प्रत्येक कॅाफीमागे एवढा एवढासाच एन्सिन्टीव्ह कसा मिळतो . सॅलरी कमी कशी आहे आणि तिने स्वतःला तिच्या इतर मैत्रिणीबरोबर कम्पेअर करुन मीच कशी मागे आहे,मागास आहे,मी तर वैतागलिये या जॅाबला,वर्कलोड जास्त असतो."...वगैरे ...वगैरे .....

मी अनोळखी असुन पण ती मला तिच्याबद्दल खुप काही सांगुन गेली.
आपल दुख: शेअर करायला कोणीही चालत . फक्त ऐकुन घेणारा माणूस असला म्हनजे झाल,प्रत्येक जण आपल मन मोकळ करुन टाकतो.

बील पे करेपर्यंत आम्ही बोलत होतो,, एका कॅाफीचे 141/- रुपये आजिबात काहीच घासाघीस न करता पे करुन मी तिथुन बाहेर पडलो . पण 141 रुपयांत आपण लोकल कॅाफीशॅापमध्ये कितीवेळा कॅाफी पिलो असतो . तिथे रेट किती स्वस्त पडला असता . घरी 141 रुपयांत कॅाफीच कस कस नियोजन झाल असत . याचा साधा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.

कॅाफीशॅापमध्युन बाहेर आलो ,
बाहेर एक पेरु विकनारी बाई होती . वयाने कॅाफीशॅापमधया मुलीएवढीच असेल ; पण मांडीवर छोट बाळ होत , तिचा अवतार खुप विचित्र होता,मळलेली साडी,विखुरलेले केस , पाऊस पडतोय , कशीबशी छत्री पकडुन पेरु विकायला बसलेली ती पेरुवाली .  एक पेरु मी 10 रुपयांना तिच्याकडुन विकत घेतला.ते 10 रुपये स्विकारताना तिच्या चेहर्यावरच दिसनार समाधान मी आयुष्यात कध्धीच नाही विसरनार.

खुप दिवसांपासुन साधारणपणे गेल्या 5-6 वर्षांपासुन पेरु विकत घेउन न खाल्ल्यामुळे पेरुचे पैसे जरा जास्तच घेतले असावेत अस मला वाटल . ते 10 रुपये देताना मनाला जरा रुखरुख वाटत होती . राहुन राहुन वाटत होत कि माझ्याकडुन जास्त पैसे घेतले गेलेत . मी काही बोललो नाहीं पण तिने कदाचित माझा चेहरा पाहुन माझ्या मनातल ओळखल असाव .मग तिच महागाईवर लेक्चर चालू झाल,महागाईबद्दल अगदी तळमळुन बोलत होती ती.
पण तिच्या चेहर्यावर समाधान खुप दिसत होत.

एका बाजुला आपण 5-10 रुपयांचा एवढा विचार करतो आणि दुसरीकडे एखाद्या चकचकीत मॅालमध्ये हाय-फाय ठिकाणी एखाद्या वस्तुचे मार्केट व्हॅल्युपेक्षा चांगले पाच दहा पट जास्त पैसे मोजतो , याच आपल्याला काहीच नाहीं वाटत.

अंड सेकंड थिंक , सुख आणि समाधानाच्या बाबतीत तर आपण खुप अज्ञानी , मागासलेलो आहोत , इतक सार ठिकठाक असुन पण रडनारी ती मुलगी आणि जिच्या बॅाडीलॅंग्वेज मधुन समाधान ओसंडुन वाहनारी ती पेरु विकनारी बाई  या दोघींच कम्पॅरिझन कस कराव हेच मला कळत नाहिये . आपण आपला विवेक कुठेतरी गमाऊन बसलोय .

नक्की आपल्याला काय मिळवायचय..??

समाधान मानल तर अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये आहे आणि नाहीं  मानल तर कुठेच कशातच नाही

satisfaction.

" काय कशी आहे तब्येत ,बर वाटतय ना.?" मी बसता बसता विचारल.
" हो..थोडा आराम पडलाय आता."
" काय..??  कस काय झाल हे..?? " सगळेच विचारतात तसच मी विचारल.
" एका ठिकाणी एक्झिबीशनला गेलोलो , तिथे अर्धवट उघड्या ड्रेनेजमध्ये पाय अडकून (पायाकडे बोट करुन) या इथे नडगीच हाड क्रॅक झालय. "
" ओहहह ,मग आता किती दिवस चालनारये ही ट्रीटमेंट.??"
" या वेळेस जास्त वेळ लागेल."
" या वेळेस म्हनजे..??"
" हात-पाय मोडण्याचा मला बराच अनुभव आहे ,वयोमानानुसार हाडे ठिसूळ होतात."
" मग बिजनेसच कस काय चालत , तुम्ही अॅाफिसवर नसताना..??"
" आहेत माणसं , ते करतात हॅंडल. "
त्यांच्या मिसेस पाण्याचे दोन ग्लास घेउन आल्या , टी पॅाय वर ट्रे ठेऊन त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या आणि टी.व्ही च्या रिमोटचा ताबा घेतला.
आमच्या  गप्पा सुरु झाल्या,
सहजच मी त्यांना विचारल , " बोअर होत असेल ना..?? घरी कोण कोण असत.??"
" मी , मिसेस आणि आदिती ."
"तिघेच..??"
"तस , मी आणि मिसेस दोघेच असतो घरात , आदिती ( मिसेस कडे पाहत) हिच्या बहिनीची मुलगी , 3 महिन्यांपुर्वी आलिये आमच्याकडे , कॅालेजला जाते. "
"तुमची मुल माझ्याएवढीच असतील ना..??"
"नाही , आम्हाला मुल-बाळ नाही."
च्याआयला , असली फालतू विचारपूस करुन उगाच एखाद्याच्या जखमेवरची खपली काढल्यासारख वाटल मला , माझी चलबिचल चालु झाली , कधी,टी.व्ही कडे , तर कधी फॅनकडे,,इकडे तिकडे नजर फिरउन मी खिशातुन मोबाइल काढला आणि मोबाइल मध्ये डोक खुपसल.

माझी चलबिचल कदाचित त्यांच्या लक्षात आली असावी.,काठीला धरुन,कसातरी तोल सावरत,,लंगडतच ते माझ्याशेजारी येउन बसले,,दोन मिनटे कहीच ते काहीच बोलले नाहीत,,तेवढ्या वेळात त्यांच्या मिसेस तिथुन उठल्या आणि बाहेर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या.,,,ते अजुनही शांतच होते,,मला तर आता खुप guilty वाटत होत..माझी आणि यांची चार-सहा महिण्यांपासुनची ओळख..

मी विचार करुनच हैरान झालो,,गेल्या 20-25 वर्षात यांना कित्तीतरी लोकांनी ज्यांना माहित नसेल त्यांनी मुलांबद्दल विचारल असेल , टोमने मारणारे वेगळेच  , पुरुषांच जाउद्या , ते वेळ मारुन नेतात , पण स्त्रियांची मानसिकता वेगळी असते ना.
.................आणि त्यात भरीत भर म्हनुन मीही तेच विचारल.

तेवढ्यात आदिती किचनमधुन चाहा घेउन बाहेर आली , समोर चहा ठेउन अगदी हक्काने तिने त्यांच्याकडे पाचशे रुपये मागितले,,
तिने पैसे घेतले , पाठीला सॅक अडकवली. Activa ला स्टार्टर मारला आणि गेटमधुन बाहेर पडताना कॅालेजला मी जातीये अस सांगुन गेली.

" आदिती आमच्याकडे रहायला आली तेंव्हा सुरवातीला महिनाभर बसने जायची कॅालेजला,,म्हनुन हिच्यासाठी Activa बुक केली,,हिच्या बर्याचशा  मैत्रिणी गाड्या घेउन जातात ना कॅालेजला." वगैरे , वगैरे ,वगैरे......
ते आदितीबद्दल अगदी कौतुकाने खुप काही सांगत होते.
 आणि मी नुसताच ऐकत होतो..

" घरात मुलं नसतील तर आम्हाला करमत नाहीं. नेहमीच कोण ना कोणतरी आमच्याकडे रहायला असतच ,नातेवाईकांची मुल आमच्याकडे येतात ,जमेल तितके दिवस राहतात ,शिकतात , Job करतात , सेटल होतात , निघुन जातात "

हे सांगताना त्याच्या चेहर्यावर खुप समाधान दिसत होत...
आणि शेवटी आयुष्यात हेच समाधान महत्त्वाच......

गुरुवार, १४ मे, २०१५

जगण्यातील काही तत्व.

खुप दिवसांपासुन वाटलेल लिहाव याबद्दल,,अशाच काही माणसांकडुन जगण्याची काही तत्व शिकायची असतात.
काही माणसांची लायकीच ती असते, Officer Post मिरवताना लोकांच ( I talking about junior ) प्रेम कदाचित यांना पचत नसाव.यांना प्रेमाची आणि नम्रपणाची अॅलर्जी आहे का हेच मला कळत नाही .त्यांना कदाचित हे माहित नसाव कि प्रेम दिल्यानच प्रेम मिळत.एक माणूस म्हनुन जगताना Simply कस जगाव हे पण विसरुन जाव का...???

3 वर्षांपुर्वीची गोष्ठ , दोन उच्चपदस्थ अधिकार्यांचा कार अॅक्सेटंट झालेला,,कोणाचा,,कसा,कुठे जाताना झाला हे सध्या महत्त्वाच नाही,त्यांच्या कारने हायवेवर रस्ता सोडल्यामुळे 3-4 पलट्या खाल्ल्या,रस्त्याच्या बाहेर झुडपात कार गेल्यामुळे ते बचावले,,कार कदाचित डिव्हायडरला तोडुन पलिकडच्या Apposite लेनवरील गाड्यांवर आदळली असती तर कोणीच वाचल नसत...

नशीब वगैरे मी काही मानत नाही,पण सगळे म्हनतात कि ते दोघे नशीबाने वाचले , दोघांनाही मेजर डॅमेज झालेल,,,,,महिनाभर सुट्टीवर होते...
एवढा मेजर अॅक्सेटंट होउनही त्यांच्याबद्दल कोणालाच कसलीच काळजी वाटली नाही ..त्यांना हॅास्पिटलमध्ये बघायलासुद्धा कोण गेल नाही...प्रार्थना आणि दुवा करण लांबच राहिल . याउलट त्यावेळेस सगळे म्हणत होते कि, "गाडीने अजुन एक-दोन पलट्या मारल्या पाहिजे होत्या "

मला तेंव्हा अस म्हणणार्यांचा मनापासुन राग आलेला..च्याआयला,,कोणीतरी मृत्यूच्या दाढेतून परत आलय....अरे ते कसेही असुदेत,ती सुद्धा माणसेच आहेत,,आपण मदत करु नाही शकलो म्हनुन काय झाल,थोडीशी सहानुभूति तर दाखऊ शकतो ना ,,आपण समझतो इतकही कोणी वाइट नसत...Officer ने कडक आणि खड्डूस वागावच लागत,,ते एक रोल करतायेत,,,मीच स्वतःच्या मनाची समजूत घालत होतो..जग किती चांगल आहे,,सगळी माणस चांगलीच असतात,,वगैरे,वगैरे ,वगैरे....!

एखादा माणूस कितीही भेंचोद असुदेत, मृत्युच्या दाढेतुन वाचला असता माणसाचा सगळा माज जिरतो,,त्याचा जसा पुनर्जन्म होतो तशी त्या माणासाची विचारसरणीसुद्धा बदलते.....!!!!,,,अशी मरता मरता वाचलेली बरीचशी माणस पाहिलीयेत मी...हे लोक प्रत्येक क्षण आनंदाने जगतात..साहसा कोणालाच दुखावत नाहीत ..खुप प्रेमळ बनतात..
मला वाटलेल त्यांनी स्वत:मध्ये असाच काहीसा बदल घडवला असेल,,😊

पण आपल्याला तस कायतरी वाटून काय फायदा,,ज्याच त्याला कळाल पाहिजे,,,ते त्यांच आयुष्य आहे,त्यांच ते कसही जगतील...त्यांच अॅटीट्यूड त्यांच्यापाशी.
आता मध्यंतरी  त्यांच्याशी काही कामांमुळे पुसटसा अप्रत्यक्ष संपर्क आला,तीच गुर्मी,तोच माज,तीन वर्षांनंतरही त्यांचा माज पुर्वीपेक्षा दहापट वाढलाय,,काम असल कि Juniorबरोबर थोडसच गोड गोड बोलायच,,इतर वेळेस कुचक्यासारख only Bossing,Bossing,Bossing,तोंडावर सदानकदा बारा-तेरा वाजलेले,,जनु काही आख्ख्या जगाच टेंशन यांनाच आहे,दिलखुलासपणे हसण यांना कध्धीच माहित नाहीं.

मला आता कळाल कि ते लोक,, " गाडीने अजुन एक-दोन पलट्या मारल्या पाहिजे होत्या" अस का म्हनत होते ते..

पैसे, Image,मान-सन्मान, प्रतिष्ठा तर थोड्याबहुत प्रमाणात सगळ्यांकडेच असते , अगदी भिकार्यांनासुद्धा इज्जत असते.
ते दोघेजन आपल्यासाठी दुवा करणारे दोन माणसही जोडु नाही शकले...संकटकाळात इतरांकडुन सहजच मिळणारी थोडीशी सहानुभुतिसुद्धा नाही यांच्या नशिबात.
मला एक प्रश्न पडला,,मग या अधिकार्यांनी जीवनात नक्की काय कमावल...? ये जीना भी क्या जीना है ......बापरे.

मी तर एक धडा कायमचा शिकलो,,," आपल आयुष्य आपण मजेशीर जगायच, जगताना अस जगायच कि, कोणी आपल्यावर प्रेम नाही केल तरी चालेल,,पण कुणी आपला द्वेष तरी नाही केला पाहिजे."
                           

माझी किंमत..

ससूनच डेड हाऊस,सडलेल्या,भाजलेल्या,काही किडे पडलेल्या..हात-पाय..मुंडके तुटलेल्या.. आणि घाणेरडा उग्र वास येणार्या डेडबॅाडीज् .

शनिवारवाड्याजवळच सुर्या बर्न हॅास्पिटल..तिथले पहायलासुद्धा भिती वाटेल असे भाजलेले आणि विद्रुप दिसणारे ,त्यांच्यात बोलायला आणि विव्हळायलासुद्धा त्राण नसल्याने निपचित पडून राहिलेले , घोंगावणार्या माशाही हुसकाऊन लाउन शकत नाहीं इतके अशक्त झालेले पेशन्ट्स्,,त्यांचे अगतिक आणि असहाय्य असे खुणावणारे डोळे....

वारज्याच सिप्ला सेंटर,तिथले अखेरच्या घटका मोजत असलेले कॅन्सरचे पेशन्स्ट् , काहींचे तोंड सडलेले..हसण्या खेळण्याच्या वयात ब्रेन कॅन्सर झालेली लहान मुले.. food bypass करण्यासाठी नाका-तोंडात नळ्या टाकल्यामुळे दुर्दैवाने जे पाण्याची चवही घेऊ शकत नाहीं असे पेशंट्स्.

आणि कधीकधी तासन् तास स्मशानात बसून पाहिलेल्या सगळे गेल्यावर एकट्याच जळणार्या मयती..तिथे हंबरडा फोडणारे लोक.. हे सगळ खुप कमी वयात पाहिल्यामुळे मला खर्या अर्थाने आयुष्याची किंमत कळू लागलिये.......स्वतःच्या आणि दुसर्याच्यापण.