शुक्रवार, १५ मे, २०१५

कॅाफी , पेरु आणि बरच काही .....

TATA Starbucks नावाच्या कॅाफीशॅापमध्ये दरवाजा उघडुन मी आतमध्ये एन्ट्री केली,,एसीची थंड झुळक आणि तिथल्या स्टापमधल्या सुंदर मुलींनी स्मितहास्य करुन स्वागत केल . मेन्युकार्ड न पाहताच मी अॅार्डर दिली , " एक रेग्युलर हॅाट कॅाफी ."

5-10 मिनीटांत टिपीकल मराठी मुलगी अॅाडर घेउन आली . पाहताक्षणी रिच वाटणारी,डोळ्यांवर महागडा चष्मा, जवळ आली त्यावेळेस परफ्युमचा सुगंध दरवळला,चेहयावर कॅास्मेटिक्सचा थर वाटत होता,चेहयावरुन ती एखाद्र्या सुखवस्तु घरातली वाटत होती . क्षणभर वाटल हीच असेल ती जगातली सर्वात समाधानी मुलगी.

एकटाच होतो,,,काउंटरशेजारच्याच टेबलवर बसलेलो,,कॅाफी पीत पीत सहजच तिला तिच्या जॅाब प्रोफाइलबद्दल विचारल,,तिने तिची दर्द भरी दास्तान सांगायला सुरवात केली , " प्रत्येक कॅाफीमागे एवढा एवढासाच एन्सिन्टीव्ह कसा मिळतो . सॅलरी कमी कशी आहे आणि तिने स्वतःला तिच्या इतर मैत्रिणीबरोबर कम्पेअर करुन मीच कशी मागे आहे,मागास आहे,मी तर वैतागलिये या जॅाबला,वर्कलोड जास्त असतो."...वगैरे ...वगैरे .....

मी अनोळखी असुन पण ती मला तिच्याबद्दल खुप काही सांगुन गेली.
आपल दुख: शेअर करायला कोणीही चालत . फक्त ऐकुन घेणारा माणूस असला म्हनजे झाल,प्रत्येक जण आपल मन मोकळ करुन टाकतो.

बील पे करेपर्यंत आम्ही बोलत होतो,, एका कॅाफीचे 141/- रुपये आजिबात काहीच घासाघीस न करता पे करुन मी तिथुन बाहेर पडलो . पण 141 रुपयांत आपण लोकल कॅाफीशॅापमध्ये कितीवेळा कॅाफी पिलो असतो . तिथे रेट किती स्वस्त पडला असता . घरी 141 रुपयांत कॅाफीच कस कस नियोजन झाल असत . याचा साधा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.

कॅाफीशॅापमध्युन बाहेर आलो ,
बाहेर एक पेरु विकनारी बाई होती . वयाने कॅाफीशॅापमधया मुलीएवढीच असेल ; पण मांडीवर छोट बाळ होत , तिचा अवतार खुप विचित्र होता,मळलेली साडी,विखुरलेले केस , पाऊस पडतोय , कशीबशी छत्री पकडुन पेरु विकायला बसलेली ती पेरुवाली .  एक पेरु मी 10 रुपयांना तिच्याकडुन विकत घेतला.ते 10 रुपये स्विकारताना तिच्या चेहर्यावरच दिसनार समाधान मी आयुष्यात कध्धीच नाही विसरनार.

खुप दिवसांपासुन साधारणपणे गेल्या 5-6 वर्षांपासुन पेरु विकत घेउन न खाल्ल्यामुळे पेरुचे पैसे जरा जास्तच घेतले असावेत अस मला वाटल . ते 10 रुपये देताना मनाला जरा रुखरुख वाटत होती . राहुन राहुन वाटत होत कि माझ्याकडुन जास्त पैसे घेतले गेलेत . मी काही बोललो नाहीं पण तिने कदाचित माझा चेहरा पाहुन माझ्या मनातल ओळखल असाव .मग तिच महागाईवर लेक्चर चालू झाल,महागाईबद्दल अगदी तळमळुन बोलत होती ती.
पण तिच्या चेहर्यावर समाधान खुप दिसत होत.

एका बाजुला आपण 5-10 रुपयांचा एवढा विचार करतो आणि दुसरीकडे एखाद्या चकचकीत मॅालमध्ये हाय-फाय ठिकाणी एखाद्या वस्तुचे मार्केट व्हॅल्युपेक्षा चांगले पाच दहा पट जास्त पैसे मोजतो , याच आपल्याला काहीच नाहीं वाटत.

अंड सेकंड थिंक , सुख आणि समाधानाच्या बाबतीत तर आपण खुप अज्ञानी , मागासलेलो आहोत , इतक सार ठिकठाक असुन पण रडनारी ती मुलगी आणि जिच्या बॅाडीलॅंग्वेज मधुन समाधान ओसंडुन वाहनारी ती पेरु विकनारी बाई  या दोघींच कम्पॅरिझन कस कराव हेच मला कळत नाहिये . आपण आपला विवेक कुठेतरी गमाऊन बसलोय .

नक्की आपल्याला काय मिळवायचय..??

समाधान मानल तर अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये आहे आणि नाहीं  मानल तर कुठेच कशातच नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा