बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

बोहोनी

वॅावSSSS , खरच किती pretty वाटत ना आपण कोणासाठीतरी Lucky Person असल्यावर.

हायवेवरच्या एका निरा आणि सरबताच्या टपरीवर एकदा सरबत पिलेला.१० रु झाले.मी १०० ची नोट दिली.त्याच्याकडे सुट्टे नव्हते.
माझ्यासमोर गल्ला रिकामा करुन केविलवान तोंड करुन मला तो सरबतवाला विनवन्या करु लागला. " साहेब,बघा ना सुट्ट हायती का..?? बोहनीचा टाइम हाय."
मी त्याच्याकडे पाहून फक्त स्माइल केल,आणि त्याला विचारल , " किती झाले..?? "
" धा रुपये." तो उत्तरला.
मी सहज टपरीमध्ये डोकावल,मी येण्याअगोदरच नुकतीच त्याने टपरी उघडलेली. अजुन त्याची आवराआवरीच चाललेली.मीच त्याचा पहिला कस्टमर होतो.
अजुन त्याची घालमेल चालू होती.
" थोडा येळ थांबता का शेठ.मी म्होरच्या दुकानातन सुट्ट घिउन येतू."

शेवटी मला त्याची आगतिकता पाहून कसतरीच झाल.माझ्याशी तो शक्य तेवढ्या अबदीने बोलायचा प्रयत्न करत होता..कारण स्पष्ट होत.सकाळ सकाळी गिर्हाइकाबरोबर किरकीर व्हायला नको,पहिलाच व्यावहार उधारीचा नको.त्यामुळे दिवसभर धंद्याला नाट लागू शकते.

" एक आयडिया आहे ना राव." मी एकदम Excited होउन त्याला बोललो.
"आजिबातच सुट्टे नसतील तर ही शंभराची नोट तुमच्याकडेच ठेव. मी तासाभरात परत येउन माझे उरलेले ९० रुपये परत घेउन जातो."

१० रुपयाच्या सरबतासाठी मी त्याच्याकडे एक तासाच्या खोट्या बोलीवर १००रुपये ठेवले.एक तासानंतर मला तिथ येण खरच शक्य नव्हत.कारण मला त्या दिवशी खुप कामं होती.पुन्हा कधी त्या रोडने येण जाण होइल ते सुद्धा शक्य नव्हत.आणि कधी त्या रोडने गोलोच तर त्या ९० रुपयांची आठवण येइल कि नाही याचीची मला गॅरॅन्टी नव्हती. आणि मी तिथे नंतर कधीतरी गेलो तर तोच माणूस टपरीमध्ये असेल कि नसेल..??
किंवा मीच विसरलो तर..?? हे सगळ मला माहित असूनपण मी मुर्खासारखे तिथे ९० रुपये कुठल्या भरवशावर आणि का ठेवले हे माझ मलाच कळाल नाही.
माझ्यात व्यवहारिकपणा खुप कमी आहे याची मला जाणीव झाली.आणि इथुन पुढेही मी जर असाच ढिला हात सोडून मुर्खासारख वागलो तर माझी कध्धीच प्रगति होणार नाही.असे माझ्या खास मित्रांनी मला बोललेले शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले.

पण बाकि सरबत छान होता.कोल्हापुरात बागल चौकात एक सरबतवाला आहे.तिथे तीन वर्षांपुर्वी आम्ही सरबत पिलेला.त्याने एक वेगळाच फेव्हर शोधून काढलाय.लिंबू आणि कोकम मिक्स with सोडा..भारी लागतो.एकदा नक्की ट्राय करुन पहा..
मी तोच फेव्हर याच्याकडून घेतलेला.

असो....
काल दोन महिन्यांनंतर माझ त्या रोडने जाण झाल.का कुणास ठाउक पण सरबत प्यायची तीव्र इच्छा झालेली.त्याच टपरीसमोर थांबलो.टपरीतल्या माणसाने माझ्याकड पाहून मनमोकळेपणाने स्माइल केल.मी अॅार्डर द्यायला समोर जाणार तेवढ्यात माझा मोबाइल वाजला.बाजूला जाउन call receive केला.५-१० मिनिटे मोबाइल चालू होता.पुन्हा काउंटरजवळ गेलो.मला पाहून मी न सांगताच त्याने माझा आवडत्या फ्लेव्हरचा सरबत बनवलेला.त्याने अगदी आदरपूर्वक सरबताचा ग्लास पुढे केला.

त्याने मागच्या वेळेसचे १० रु आणि आत्ताचे १० रु या प्रमाणे मागील शंभराच्या नोटेमधले उरलेले ८० रुपये माझ्या हातावर ठेवत म्हनाला कि , " शेठ येत जावा कि असच अधन मधन बोहनीला."
मला जरा गोंधळल्यासारखच झाल.
" का रे..?? कशासाठी..?? " मी अच्छर्यचकित होउन विचारल.
" मागच्या टायमाला तुम्ही आलेला हिकड.त्यादिशी माह्या सगळा माल यक वाजूस्तवर संपला."
त्यादिवशी त्याच्या टपरीतली निरा एक वाजताच संपली.रोज पाच वाजता संपायची.सरबताची कस्टमर रोजच्यापेक्षा दुप्पट आले.त्याने पु्न्हा दुसर्या टपरीवरुन निरा मागउन घेतली.
एकंदरीत त्याला त्या दिवशी रोजच्यापेक्षा खुप फायदा झाला.

तिथुन निघताना मी खुप Happy होतो.
खर सांगू का..??
इतका आनंद मला जॅाब कन्फर्मेशनच्या वेळेस पण झाला नव्हता.
खरच खुप भारी and स्पेशल वाटत मला ज्यावेळेस माझ्यामुळे कोणीतरी happy असेल.

त्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मला असा खुप मोठा आर्थिक फटका वगैरे बसला नसता.मी ते ९० रुपये विसरुनसुद्धा गेलो होते.
त्यादिवशीच्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मी काय इतक मोठाही झालो नसतो.
पण फक्त ९० रुपयांतदेखील आपण दुसर्याला किती मोठ आनंद वाटू शकतो.याची मला प्रचिती आली.

सुख सुख आनंद आनंद आपण कशात शोधतो..??
इथे अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये तसेच इतरांच्या सुखात-आनंदात देखिल खुप खुप सुख-आनंद दडलेल आहे..तो मिळवता आणि वाटता आला पाहिजे....बस्स इतकच..

शेवटी शंकर-जयकिशनच एक गाण आठवल.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है
किसी की ...

(माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं ) \- (२)
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है

(रिश्ता दिल से दिल के ऐतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का ) \- (२)
के मर के भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है.