बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

नेत्यांच्या मागे फिरणार्या कार्यकर्त्यांसाठी...

तुम्ही म्हणाल कि हा येडा नुसता इतिहासामध्येत का डुबलेला असतो..?? Winston Churchill म्हनतो " The longer you look back , further you can look forward.."
 ( तुम्ही जितक्या खोलवर पाठीमागे पाहू शकाल तितक्यात जास्त तुम्ही भविष्याकडे डोकाऊ शकाल..)
त्यामुळे इतिहासची वर्तमानाळाशी सांगड घालून आणि इतिहासामधला नेमका अर्क काढून तो समाजासमोर मांडून त्याचा समाजाच्या हितासाठी आणि नितिवान-चारित्र्यसंपन्न समाज घडवण्यासाठी कसा किती फायदा होइल याविषयी छोटासा प्रयत्न करण्यास मी जास्त जागरुक असतो.
 .
 " हम लाएंगे सिवा को , जिंदा या मुर्दा . "
विजापूरच्या दरबारात शिवाजीला पकडायला अफजलखानाने पैजेचा विडा उचचलला . १०,००० पायदळ , १२,००० घोडदळ , तोफा , उंट , हत्ती घेउन अफजलखान निघाला .
 .
पुण्यातला बारा मावळाचा मुलूख हा मूळचा अदिलशाहीचाच मुलूख होता .शिवाजीच्या कारवायांमुळे त्रस्त अदिलशहाने पुण्यातल्या बारा मावळांच्या देशमुखांना आणि सरदारांना अफजलखानाच्या फौजेबरोबर मिळून बंडखोर शिवाजीचा पुर्ण पराभव करण्याचा सक्त आदेश दिला होता . खोपडे , मोहिते , घोरपडें असे सरदार घाबरुन अलरेडी अफजलखानाला जाउन मिळाले होते .
 .
भोरजवळील कारी या गावचे कान्होजी जेधे(देशमुख) मुळचे अदिलशहाने वतनदार . कान्होजी जेधेंना सुद्धा अदिलशहाकडून मावळातल्या सर्व वतनदारांबरोबर अफजलखानास येऊन मिळा . शिवाजीचा पराभव करुन समूळ फाडशा पाडा . खानाच्या सांगण्यावरुन नंतर तुमची योग्यता वाढवली जाईल असच फर्मान आल..
 .
कान्होजी आपल्या पाच मुलांसह शिवाजी कडे आले . शिवाजीला मदत करायची म्हंटल तर सहाजिकच बादशहाकडून मिळालेल्या वतनावर पाणी सोडाव लागणार होत . शिवाजी ने कोन्होजीला अदिलशाहीच वतन सोडणार का याबद्दल विचारल , कान्होजी हो बोलले .
पण त्याकाळी वतन जहागिरी या गोष्ठी खुप प्रतिष्ठेच्या होत्या . वतन जहागिरी कोणी इतक्या सहज सोडत नव्हत .
शिवाजीने पुन्हा एकदा कान्होजीला विचारल कि , खरच तुम्ही बादशहाचे वतन सोडत आहात का . आम्ही ते खर कस मानाव .
 .
कान्होजीने एक तांब्या भरुन पाणी मागितल . हातात बेल-भंडारा घेउन खंडोबाची शपथ घेतली , तांब्या उलटा केला आणि पाणी शिवाजीच्या पायावर सोडल .
काय माणसं होती त्याकाळात . शिवाजीने कान्होजीला कुठल अमिश दाखवल नव्हत . तुला सरदारकी देतो , तुला पंचहजारी मनसबदार करतो , तुला जहागरी-वतन देतो . शिवाजीने मावळ्यांना केवळ विश्वास दिला आणि जपला . केवळ एक तांब्याभरुन पाण्याला साक्षी ठेउन एक ऐतिहासिक डील झाल..
 .
अफजलखान प्रकरणाच्या वेळेस कान्होजी जेधे इतक्यावरच थांबले नाहीत , त्यांनी बारा मावळांमधले सगळी देशमुख मंडळी , मारणे , शिळीमकर , बांदल , शितोळे , पायगुडे , पासलकर , जगतात , ढमाले असे लोक स्वराज्याच्या बाजूने उभे केले . पुढे या लोकांचा स्वराज्य विस्तारासाठी बराच उपयोग झाला.
 .
अफजलखान कपटी होता , त्याच्यापासून कान्होजीच्या कुटुंब कबिल्यास धोका झाला असता याबद्दल शिवाजी महाराज जाणून होते .
त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिने शिवाजी महाराज कान्होजीला पत्रामध्ये लिहतात , " वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुद्दा मनास आणणे. तसेच तुमचा काबिला कारीस आहे, तो ढमढेऱ्यांचे तलेगावास पाठवा . "
पुढे शिवाजी महाराज कान्होजीला शपथ देतात , " तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.”
 .
शत्रुपासून आपल्या माणसांच संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते.
शिवाजी महाराजांनी कान्होजीचा कुटुंब कबिला तळेगाव ढमढेरेला बाबाजी ढमढेरेंकडे पाठवायला लावला..
 .
नाहींतर आजकालच्या नेत्यांना फक्त लढाईच्याच वेळेसच कार्यकर्त्यांची आठवण येते , आजने नेते कार्यकर्त्यांच्या दुख:चसुद्धा राजकीय भांडवल करतात . नेते कार्यकर्त्यांना गरजू अज्ञानी लाचार कस ठेवता येइल याची खुप काळजी घेत असतात . सुडाच राजकारण सुरु झाल कि नेत्यांच्या भांडणामध्ये कार्यकर्त्यांचे कुत्रे हाल होतात . यात नेते सेफ असतात . इथ फक्त कार्यकर्त्यांचाच बळी जातो . परस्पर विरोधी पक्षांमधील कार्यकर्त्यांमधील भांडणाची आग सतत धडधडत ठेउन या आगीत स्वत:ची राजकीय डाळ शिजवण्यात नेते एक्सपर्ट असतात .
 .
मी वरती कान्होजी जेधेंचा उल्लेख केलाय . कान्होजी अदिलशाही सोडून स्वराज्यात आलेत . पुढे अफजलखान भेटीत आपल्या जीवाच काही बरवाईट झाल नंतर चिडलेल्या अदिलशाही सरकारकडून निच्छित सुडाच राजकारण होउन कान्होजी जेधेंच आणि त्यांच्या कुटुंबकबिल्याच काय होणार याची किती पुरेपूर कल्पना शिवाजी महाराजांना होती ते या प्रसंगामधून दिसून येते .
 .
मला सांगा आजचे किती नेते कार्यकर्त्यांवर अस इतक प्रेम करतात . आता तुम्ही म्हनाल कि अमुक तमुक नेता माझ्या सुख-दुख:त नेहमी सामिल होतो .
पण नुसत लग्न मयती वाढदिवस अॅटेंड करुन खरच भागत का हो..??
सत्य म्हनजे कार्यकर्त्यांची लग्न मयती वाढदिवस अॅटेंड करणे ही राजकारण्यांची केवळ एक राजकीय गरज असते .
 .
नेते देणग्या , वर्गणी आणि कार्यकर्त्यांना मटन दारु पार्ट्या देउन हजारो लाखो रुपये खर्च करतात पण ही त्यांची पॅालिटिकल इन्वेस्टमेंट असते , यात नेत्यांचे कार्यकर्त्यांच्या प्रति प्रेम बिम काय नसत...
 ( कार्यकर्त्यांवर खर्च केलेले पैसे नेत्याने कुठल्या मार्गाने कमवलेले असतात हे सगळ्याच कार्यकर्त्यांना चांगल्याप्रकारे माहित असते , तरी पण हे कुत्र्यासारखे मटन खायला आणि दारु प्यायला नेत्याच्या मागे मागे फिरत असतात हा भाग वेगळा.. )
 .
आता थोड चिंतन करु...
समझा एखाद्या कार्यकर्त्याच्या जीवाच काही बरवाइट झाल , राजकारणातून पोलिस केसेस अंगावर पडल्या , जेल झाली किंवा इतर काही कारणांमुळे कार्यकर्त्याचा इनकम सोर्स बंद झाला तर त्या कार्यकर्त्याचा प्रिय नेता त्याच्या घरी महिन्याचा किराणा माल भरुन देतो का..??
मुलांच्या शिक्षणाची फी भरतो का..??
घरात भाजीपाला आणून देतो का..??
घाराचे आणि बॅंक लोनचे थकलेले हफ्ते भरतो का..??
जस शिवाजीने कान्होजीच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तशीच एखादा नेता त्याच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेतो का..??
 .
तुम्ही कुठल्याही नेत्याचे कार्यकर्ते असूद्यात...
जशी शिवाजी महाराजांनी कान्होजीच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली तशी तुमचा नेता तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी घेत असेल तरच तुमच्या प्रिय नेत्याच्या मागे फिरा.
 ............ जर तुमचा प्रिय नेता तुमच्यासकट तुमच्या फॅमिलीची काळजी घेणारा आणि तुम्हाला सुरक्षितता देण्याच्या मानसिकतेचा नसेल तर योग्य वेळीच अशा लबाड धूर्त नेत्यांपासून दूर व्हा...
 ......अन्यथा नंतर तुमच्या हातात पच्छातापाशिवाय काहीच उरलेल नसेल..
 _____________________
.
संदर्भ - जेधे शकावली , जेधे करीना , सभासद बखर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा